Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत सर्वांची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्यातील कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. बुधवारी थोरात कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली. थोरात कारखाने कायमच सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे हित जपले असून, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही कारखान्याकडून ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळणार आहे. याशिवाय कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. शफिक चौघुले असे आरोपीचे नाव असून, त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ नुसार तीन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड, तर कलम ५०६ नुसार एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, ३० सप्टेंबर २०१८ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक गंगाधर भागा वाळुंज हे एमएच १७ एजी २०१६ क्रमांकाचा उसाने भरलेला ट्रक कवठे मलकापूर येथील युटेक शुगर फॅक्टरीमध्ये घेऊन जात असताना साकूर परिसरात ट्रक व पिकअप वाहनाच्या चालकांमध्ये…
माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो. 9822733708) संगमनेर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वसलेले राजापूर हे गाव आज तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे. म्हाळुंगी नदीच्या तीरावर वसलेल्या या सात ते आठ हजार लोकसंख्येच्या गावाने आपला ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकासाची कास धरली आहे. क्रांतीचा इतिहास जपणारे गाव- राजापूरचा इतिहास हा केवळ भूगोलापुरता मर्यादित नाही. स्वातंत्र्यानंतर १९५० साली तत्कालीन सरकारने दुष्काळातही शेतकऱ्यांवर सक्तीची धान्य लेव्ही लादली होती. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉ. सहाणे मास्तर, कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. विष्णु हासे आणि कॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेली साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे. अशा कठीण प्रसंगात सरकारने पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ न घालवता तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी काही जण पुढे सरसावले आहेत. मात्र, धरण उभे करताना आणि पाण्याचा थेंब दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमका कोणाचा घाम गाळला गेला, हे संगमनेर-अकोलेच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असा तुफान टोला लगावत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी श्रेयवाद्यांचे बुरखे फाडले आहेत. देशभरात चंदाचोर, वोटचोरीचे पेव फुटलेले असताना अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा आता क्रेडिट चोरीच्या घटना समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी निळवंडे धरणावरून आता जिल्ह्याच्या राजकारणात श्रेयवादाची नवी रणधुमाळी पेटली आहे. निळवंडे धरण म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटची भिंत नाही,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी बिनधास्तपणे कब्जा मारल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, प्ले ग्राउंड, प्रायमरी स्कूल, मॅटर्निटी होम, हायस्कूल आणि म्युनिसिपालटी मार्केट यांसारखी महत्त्वाची आरक्षणे आहेत, तीच जमीन आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. काही खासगी लोकांनी या मालमत्तेवर आपला दावा सांगत लाखो रुपयांची मोठी आर्थिक माया गोळा करण्याचे काम चालविले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता प्रशासनाला दणका देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. सरकारी मालमत्तेचे रक्षणदार असलेले संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे यासंदर्भात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि थेट मतचोरीच्या गंभीर आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी संगमनेरमध्ये तीव्र जनक्षोभ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा तीव्र धिक्कार करत, लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नियोजनबद्ध आयोजनाखाली पार पडलेल्या या आंदोलनाला माजी खासदार चंद्रकांत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि थेट मतचोरीच्या गंभीर आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी संगमनेरमध्ये तीव्र जनक्षोभ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा तीव्र धिक्कार करत, लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नियोजनबद्ध आयोजनाखाली पार पडलेल्या या आंदोलनाला माजी खासदार चंद्रकांत…
आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि अनपेक्षित धनलाभ संभवतो. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. वृषभ- आजचा दिवस थोड सांभाळून चालण्याचा आहे. कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका आणि मोजकेच बोला. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि शक्यतो वादविवाद टाळा. मिथुन- आजचा दिवस आपल्याला संमिश्र फल देणारा आहे. मनात चालू असलेली द्विधा मनःस्थिती दूर होईल. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. कर्क- आजचा दिवस आनंददायी वातावरणात जाईल. नोकरीच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी (१४ ऑक्टोंबर) होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते हा शुभारंभ सोहळा पार पडणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. ऊस उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि राज्यातील नावलौकिक प्राप्त थोरात कारखान्याचा यंदाचा ६० वा गळीत हंगाम आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. राज्यात दिशादर्शक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने पंचनाम्यांचे सोपस्कार करत वेळ न घालवता सरसकट सर्व दुष्काळग्रस्तांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे, अशी आग्रही मागणी करत सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करत असून, आता घोषणांची नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा या विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मोठ्या आवाजामुळे कान कायमस्वरूपी बहिरे होण्याचा आणि लेझर किरणांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे ध्यानात ठेवून प्रत्येकाने अशा धोक्यांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अमृता सागर जोर्वेकर यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नमो सेवा संकल्प उपक्रमातून शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत कान, नाक आणि घसा तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरादरम्यान डॉ. जोर्वेकर यांनी ३५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. विशेष म्हणजे, या तपासणीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने २०२४ या वर्षासाठीची शासनमान्य ग्रंथ निवडसूची नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या अधिकृत यादीत संगमनेर येथील प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांच्या चार पुस्तकांचा एकाच वेळी समावेश करण्यात आल्याने अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुण्याच्या प्रसिद्ध ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘शिक्षण नामा’, ‘परिवर्तनाची वाट’, ‘विनोबाची शिक्षण छाया’ आणि ‘शिक्षण शोध’ या चारही पुस्तकांची निवड राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीने केली आहे. एकाच लेखकाची, एकाच विषयावरील आणि एकाच प्रकाशकाची चार पुस्तके एकाच वेळी शासनमान्य सूचीत समाविष्ट होण्याची ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे मळगंगा माता नवरात्रोत्सवानिमित्त कन्याकुमारी ते सावरगाव तळ आणलेल्या पवित्र ज्योतीचे स्वागत करताना ते बोलत होते. खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खताळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मदतीचा हात दिला जाईल. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर यंदा पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी…
आजचे राशिभविष्य – मेष – जुनी रखडलेली कामे आज तुमच्या समोर येतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे योग्य चीज होईल. कार्यालयात वरिष्ठाचे सहकार्य लाभेल. संकट किंवा गरजेच्या वेळी मित्र मदतीसाठी धावून येतील. दिवसाचा उत्तरार्ध हसण्याखेळण्यात आणि आनंदात जाईल. वृषभ – विद्यार्थ्यांनी मनातील सर्व प्रकारचा आळस झटकून टाकणे गरजेचे आहे. तुम्ही घरातील वेगवेगळ्या कामांमध्ये पूर्णपणे गुंग होऊन जाल. घराची स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याकडे तुमचा अधिक कल असेल. आजचा संपूर्ण दिनक्रम अत्यंत व्यस्त स्वरूपाचा राहील. भविष्यात फायदेशीर ठरणारा गुंतवणुकीचा एखादा उत्तम पर्याय तुम्हाला गवसेल. मिथुन – तुमच्यामधील उपजत हस्तकलेला आज चांगला वाव मिळवून द्या. जवळच्या अंतराचा प्रवास घडण्याचे योग जुळून येत आहेत. आज तुमचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे आगारातील एकूण पर्यावरणपूरक बसेसची संख्या ११ वर पोहोचली असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर आगारासाठी एकूण २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. आमदार अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या आधुनिक बसेस आगाराला उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ६ बसेस संगमनेरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते, या बस सध्या पुणे, पंढरपूर आणि तुळजापूर या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावत आहेत. आता नव्याने दाखल झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशातील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली. केंद्र सरकारच्या कथित मतचोरीविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीच्या वतीने नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन ते सर्वोच्च न्यायालयादरम्यान भव्य आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख खासदारांनी व आमदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नवी दिल्लीत पार पडलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वोच्च…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथेच प्रस्तावित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही जण एमआयडीसी घारगाव किंवा बोटा येथे होणार अशा वावड्या उठवून केवळ स्टंटबाजी करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता आमदार सत्यजित तांबे यांना लगावला. कौठे मलकापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि औद्योगिक विकासाला गती मिळावी, यासाठी कौठे मलकापूर येथे एमआयडीसी उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईच्या एका छायाचित्राने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे छायाचित्रकार राजू शिंदे यांनी टिपलेल्या या हृदयद्रावक फोटोवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे केवळ एक छायाचित्र नसून देशातील लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचे जिवंत निदान आहे, अशा शब्दांत राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेच ते छायाचित्र https://www.facebook.com/share/p/1CiLNqcxKP/ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे छायाचित्र शेअर करत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या कारभारावर…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि वादापासून दूर राहा. मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मनातील दुविधा दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. कर्क – आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी राहील. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. घरगुती…
