Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही म्हणून तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागायची आणि तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडणार असेल, तर सामान्य जनतेने न्यायासाठी नेमके कोणाकडे जावे? प्रशासनाची निर्मिती जनतेची सेवा करण्यासाठी झाली आहे की सामान्य माणसाला कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावण्यासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित करत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी तालुक्यातील गलथान आणि गैरजबाबदार प्रशासकीय कारभाराविरोधात ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ अभियान राबविण्याचा आक्रमक इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होण्याऐवजी केवळ कागदोपत्री माहिती, अहवाल आणि आश्वासनांचा खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.…

Read More

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे योग्य कौतुक होईल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस तुम्हाला घर, कुटुंब आणि आर्थिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहे. करिअरच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक आणि फायदेशीर राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून राज्य महामार्ग क्र. ७१ वरील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृतकाल रस्ते विकास आराखड्यांतर्गत एकत्रित तरतुदीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर बसस्थानक, पीडब्ल्यूडी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे दिल्ली नाकामार्गे प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा या प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या सुधारणेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना या निधी मंजुरीमुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या कामामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर) भव्य दसरा सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. शहराची तब्बल शंभर वर्षांची सीमोल्लंघनाची परंपरा जपत यंदाचा उत्सव अत्यंत दणक्यात साजरा केला जाणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, मनमोहक सजावट, भव्य पौराणिक देखावे, समूह नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि लक्षवेधी रावणदहन हे यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. विशेष म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करतानाच निसर्गाचे रक्षण व्हावे, या हेतूने उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मालपाणी फार्मतर्फे मोफत वृक्षभेट दिली जाणार आहे. दसरा म्हणजे विजय, मांगल्य आणि नव्या सकारात्मक संकल्पांचा उत्सव मानला जातो. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची परंपरा ही केवळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगाची हवा खाणाऱ्या आरोपीची न्यायालयाने अखेर निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर येथील जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय अ. देशपांडे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. जे. एच. वामन यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि पुराव्यांमधील त्रुटी या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरल्या. संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेला ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन), ३७६(३) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर पडलेले आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मित्र तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. सुरुवातीला एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेला हा संपर्क व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत पोहोचला. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सवर एकमेकांना पाहताना नावे सांगून ओळख पटवावी लागली, मात्र या अनोख्या भेटीने प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले आणि मित्रभेटीची तीव्र ओढ निर्माण झाली. या भावूक ओढीतूनच ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉटेल वसंतसुत, भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी दोन दिवसीय भव्य गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात रंधा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील, या विश्वासाने शिवसेना-महायुतीचे आशिष कानवडे व भागवत कानवडे यांच्या पुढाकाराने गावातील असंख्य नागरिक व महिलांनी हा प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे, पूजा धराडे, राजू धराडे, निवृत्ती धराडे, अंकुश दिघे, रामनाथ भोजने, संतोष धराडे, संतोष दिघे, नामदेव धराडे, सखाराम दिघे, अमित कोरडे, रामा भुतंबरे, दीपक धराडे, गणेश धराडे, संजय धराडे, जालिंदर धराडे, अर्जुन धराडे, सागर धराडे, सखुबाई धराडे, संगीता दिघे, संगीता कोरडे, चंद्रभागा कोरडे, नेहाबाई धराडे, मंगला कोरडे, हिराबाई दिघे, मंदाबाई कोरडे, सोनाबाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव याची १० महिन्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून, अद्याप डीएनए अहवाल न मिळाल्याचा युक्तिवाद बचावासाठी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरला. घटनेची पार्श्वभूमी अशी, डिसेंबर २०२५ मध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील आंबी खालसा परिसरात मुळा नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि वेगाने तपास करत या प्रकरणी डिसेंबर २०२५ मध्ये तीन संशयित आरोपींना…

Read More

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड बातमी मिळू शकते किंवा प्रिय व्यक्तीसोबत उत्तम संवाद साधण्याची संधी प्राप्त होईल. दिलेले वचन पाळण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार असून, काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणावरही बेधडकपणे विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व कष्टांवर भरोसा ठेवा. आरोग्याची कोणतीही हेळसांड करू नका. मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक ठरेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अनुकूल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरणे (ता. संगमनेर) येथे घडली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरणे येथील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या व मूळच्या कोल्हार येथील रहिवाशी असलेल्या ३५ वर्षीय महिलेने इक्विटास बँकेतून जानेवारी २०२६ मध्ये कर्ज घेतले होते. निलेश सोपान देशमुख (रा. चैतन्य नगर, संगमनेर) याने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिवसभरात वारंवार फोन करून कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दबाव टाकला. हप्ता न भरल्यास बघून घेण्याची आणि घरातील सामान उचलून नेण्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात आयोजित ‘ब्रिक्स पारंपरिक व स्वदेशी खेळांच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात’ संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी भारतीय योगपरंपरेचे अप्रतिम दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात योगासन प्रात्यक्षिकांसाठी महाराष्ट्राच्या १५ खेळाडूंच्या पथकाची निवड करण्यात आली होती. यामध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील आर्यन खरात, प्रणव साहू, अंश मयेकर, रोहन तायडे, तृप्ती डोंगरे, रुद्रांक्षी भावे, प्रांजल व्हन्ना व देवांशी वाकळे या आठ विद्यार्थ्यांसह पुण्यातील ध्रुवची विद्यार्थिनी नीरल वाडेकर आणि माजी विद्यार्थिनी तन्वी रेडीज अशा एकूण १० जणांचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याने प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा लालफितीचा कारभार न करता स्थानिक परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घ्यावेत. पिण्याचे पाणी आणि टँकरची मागणी करणाऱ्यांना अडवणूक न करता मागेल त्याला त्वरित टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी…

Read More

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी चांगली वार्ता कानावर पडेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि नातेसंबंधांमधील विश्वास अधिक दृढ होईल. वृषभ – दिवसभरात लहान प्रवास घडण्याचे योग आहेत. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल ज्यामुळे कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे लागेल आणि मनातील इच्छेबाबत तुम्ही आग्रही राहाल. मिथुन – बोलताना विषयास अनुसरून आणि विचारपूर्वक बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत विशेष दक्ष राहावे लागेल आणि कठीण कामे तुम्ही सुलभतेने पार पाडाल. कर्क – दिवसाची सुरुवात अत्यंत आनंददायी होईल. दैनंदिन दिनक्रमात काही बदल घडवून आणाल. अतिउत्साहाने कोणतीही कामे करू नका तसेच भागीदारीत आंधळा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत सर्वांची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्यातील कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. बुधवारी थोरात कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली. थोरात कारखाने कायमच सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे हित जपले असून, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही कारखान्याकडून ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळणार आहे. याशिवाय कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. शफिक चौघुले असे आरोपीचे नाव असून, त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ नुसार तीन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड, तर कलम ५०६ नुसार एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, ३० सप्टेंबर २०१८ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक गंगाधर भागा वाळुंज हे एमएच १७ एजी २०१६ क्रमांकाचा उसाने भरलेला ट्रक कवठे मलकापूर येथील युटेक शुगर फॅक्टरीमध्ये घेऊन जात असताना साकूर परिसरात ट्रक व पिकअप वाहनाच्या चालकांमध्ये…

Read More

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो. 9822733708) संगमनेर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वसलेले राजापूर हे गाव आज तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे. म्हाळुंगी नदीच्या तीरावर वसलेल्या या सात ते आठ हजार लोकसंख्येच्या गावाने आपला ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकासाची कास धरली आहे. क्रांतीचा इतिहास जपणारे गाव- राजापूरचा इतिहास हा केवळ भूगोलापुरता मर्यादित नाही. स्वातंत्र्यानंतर १९५० साली तत्कालीन सरकारने दुष्काळातही शेतकऱ्यांवर सक्तीची धान्य लेव्ही लादली होती. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉ. सहाणे मास्तर, कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. विष्णु हासे आणि कॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा असलेली साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे. अशा कठीण प्रसंगात सरकारने पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ न घालवता तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी काही जण पुढे सरसावले आहेत. मात्र, धरण उभे करताना आणि पाण्याचा थेंब दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमका कोणाचा घाम गाळला गेला, हे संगमनेर-अकोलेच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असा तुफान टोला लगावत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी श्रेयवाद्यांचे बुरखे फाडले आहेत. देशभरात चंदाचोर, वोटचोरीचे पेव फुटलेले असताना अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा आता क्रेडिट चोरीच्या घटना समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी निळवंडे धरणावरून आता जिल्ह्याच्या राजकारणात श्रेयवादाची नवी रणधुमाळी पेटली आहे. निळवंडे धरण म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटची भिंत नाही,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी बिनधास्तपणे कब्जा मारल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, प्ले ग्राउंड, प्रायमरी स्कूल, मॅटर्निटी होम, हायस्कूल आणि म्युनिसिपालटी मार्केट यांसारखी महत्त्वाची आरक्षणे आहेत, तीच जमीन आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. काही खासगी लोकांनी या मालमत्तेवर आपला दावा सांगत लाखो रुपयांची मोठी आर्थिक माया गोळा करण्याचे काम चालविले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता प्रशासनाला दणका देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. सरकारी मालमत्तेचे रक्षणदार असलेले संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे यासंदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि थेट मतचोरीच्या गंभीर आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी संगमनेरमध्ये तीव्र जनक्षोभ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा तीव्र धिक्कार करत, लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नियोजनबद्ध आयोजनाखाली पार पडलेल्या या आंदोलनाला माजी खासदार चंद्रकांत…

Read More