Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील मदिनानगर भागात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत गोवंश कत्तलीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (१७ नोव्हेंबर २०२६) सकाळी ९:१५ ते १०:१५ या वेळेत संगमनेर शहरातील मदिनानगर, गल्ली नं. ०२ मधील मतीन बशीर कुरेशी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या खात्रीशीर खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी मतीन बशीर कुरेशी (वय १८ वर्षे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात सध्या प्रत्यक्ष विकासकामांपेक्षा गावोगावी बॅनरबाजी करून विकास झाल्याचे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी या दिखाऊपणातून बाहेर पडून प्रत्यक्ष विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सडेतोड सल्ला माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांवर स्वतःच्या नावाचे लेबल लावून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप वर्पे यांनी केला. तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नांतून सुरू असलेल्या कामांचेही श्रेय स्वतःकडे घेऊन टेंभा मिरवणे थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. वडगावपानमधील ॲसिड हल्ल्याचा आरोपी अजूनही मोकाट असल्याचा मुद्दा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४०० किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि अंमलदार अतुल लोटके, गणेश लबडे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, संभाजी कोतकर यांचे पथक संगमनेर शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. संगमनेर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने नवीन रोड (इंदिरा गांधी मार्ग) आणि बस स्थानकासमोर आज मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. बाळासाहेबांनी मराठी…
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे अस्तित्व काळाच्या मर्यादा ओलांडून पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहते. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असेच एक झंझावाती व्यक्तिमत्त्व! बाळासाहेब म्हणजे केवळ एक नेता नव्हते, तर मराठी माणसाच्या अस्मितेचा बुलंद आवाज होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी जिद्द, हिंदुत्वाविषयीची ठाम भूमिका, मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याची निर्भीड वृत्ती आणि कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे! १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाला संघटित होण्याची ताकद दिली. सामान्य माणसाच्या मनातील असंतोषाला त्यांनी संघर्षाची दिशा दिली. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना न राहता ती प्रत्येक शिवसैनिकाच्या स्वाभिमानाची, निष्ठेची आणि अस्मितेची ओळख…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले, आपण मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना प्राधान्य देत आहोत असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच सभा मंडपासह जगदंबामाता मंदिर अशा सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात लवकरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून, गावोगावी बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाईल. आपण कशा पद्धतीने काम करतो…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे थेट अॅक्शन मोडमध्ये आले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष बैठक घेत पोलिसांना धारेवर धरले. गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी विनानंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी दुष्काळी परिस्थितीची झळ पाहता चोरी व घरफोड्यांच्या घटनांमध्ये आणखी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही मंगळवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या सामूहिक निर्णयानुसार, मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी हे बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आणि जिल्ह्यातील चारही कर्मचारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष अंकुश सांगळे आणि कार्यकारी सचिव रविंद्र सूर्यपुजारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी…
प्रवीण बागडे काही माणसे काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, तर काही माणसे काळालाच आपली दखल घ्यायला भाग पाडतात. त्यांच्या विचारांशी सहमत असणारे आणि असहमत असणारे असे दोन्ही वर्ग असतात; परंतु त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणे कोणालाही शक्य नसते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे अशाच वादळी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांच्या आवाजात आक्रमकता होती, शब्दांत धार होती, भूमिकेत ठामपणा होता आणि राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची विलक्षण क्षमता होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करताना, केवळ एका राजकीय नेत्याला अभिवादन करणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, आमदार रोहित पवार यांना संयमाचा सल्ला दिला आहे. सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावरील आपल्या विस्तृत पोस्टमधून राजकारणातील वाढत्या निष्ठूर प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे आणि परस्परांमधील विश्वासाचे नाते आपण अतिशय जवळून पाहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांतील राज्याच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्र…
मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळाव्यात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे हिताचे राहील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत, जो फलदायी ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मिथुन – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. अभ्यासात मन लागेल आणि यश संपादन कराल. मित्रपरिवाराची साथ लाभेल. नवीन विचारांमुळे कामात नाविन्य आणू शकाल. संध्याकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. कर्क – आज कौटुंबिक जीवनात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात दत्तदिमंदिराजवळ एका जुन्या घरात घरफोडीची घटना घडली आहे. योगेश शांताराम जोशी (वय ३६ वर्षे, व्यवसाय: शेती, रा. जोर्वे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दिनांक १४ नोव्हेंबर) रात्री नऊ ते १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी गावातल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या जुन्या घराच्या सुरक्षा भिंतीवरून आत प्रवेश केला. कडी लावलेल्या दरवाज्याची कडी काढून कपाटाच्या लॉकचे नुकसान करत चोरांनी कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि वैयक्तिक रोख रक्कम असा एकूण ४२,५०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय…
मेष – आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात, ज्या तुम्ही तुमच्या नेतृत्त्वगुणांमुळे सहज पार पाडाल. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगणे हिताचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबींमध्ये आजचा दिवस संमिश्र असून अनावश्यक खर्च टाळणे योग्य राहील. वृषभ – आज आर्थिक लाभाची नवीन दारे उघडताना दिसतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली जुनी कामे मार्गी लागल्याने मनाला विलक्षण शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मंगल कार्याची किंवा प्रवासाची योजना आखली जाऊ शकते. व्यावसायिक लोकांसाठी दिवस अत्यंत लाभदायक असून भागीदारीतील व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या ‘अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने’ राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा यशाचा झेंडा फडकवला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट हरित परिसर पुरस्कार’ (बेस्ट ग्रीन कॅम्पस अवॉर्ड) आणि ‘उत्कृष्ट नवोपक्रम व स्टार्टअप परिसंस्था पुरस्कार’ (बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम अवॉर्ड) असे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार महाविद्यालयाला प्रदान करण्यात आले आहेत. गोवा येथील हॉटेल रोनिल जेडी हयात येथे २ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, आयएसटीईकडून या स्वायत्त महाविद्यालयाला मागील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची ६० दिवसांची मुदत संपली असली, तरी अद्याप समितीचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, समितीच्या कामकाजातील सकारात्मक प्रयत्न आणि तज्ज्ञ संस्थांचा सल्ला घेण्याच्या भूमिकेमुळे आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याची तयारी आमदार सत्यजीत तांबे यांनी दर्शवली आहे. मात्र, प्रकल्पाबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी बाधित शेतकरी, स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रकल्पाचे समर्थक यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी जनसुनावणी झालीच पाहिजे, या मागणीवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावर यापूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान दोन प्रमुख मागण्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिलांच्या योजनांचे मानधन रखडल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून, किसान सभेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, मात्र अनेक दिवस लोटूनही ही मदत मिळाली नाही. तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचे तीन हप्ते थकीत असून, लाडकी बहीण योजनेतील ८१ लाख महिलांचे मानधन बंद झाले आहे आणि नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. अकोले ते मुंबई काढलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले बायपास परिसराजवळ कॉलेजला जाण्यासाठी उभ्या असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जनतगर पश्चिम गल्ली क्रमांक ०३ येथील रहिवासी असलेल्या प्रिया सुनील कुडेकर (वय ४१, धंदा: नोकरी) या महिला शिक्षिका असून त्या आपली सहकारी शिक्षिका सुनंदा देशमुख यांच्यासह कॉलेजवर जाण्यासाठी शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रघुनंदन मॉल, अकोले बायपास, संगमनेर येथे थांबल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले.…
प्रवीण पुरो- देशातील ४७५१ शहरांमध्ये स्वच्छतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावणाऱ्या नवी मुंबईचं करावं तेवढं कौतुक कमीच. नवी मुंबईच्या या अभिनंदनास्पद कामगिरीने साऱ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने ताठ झाली आहे. राजकारणाच्या क्रूर खेळीने गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबई हे शहर स्वच्छतेच्या पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारापासून वंचित राहिलं होतं. ‘काहीही करा, पहिल्या क्रमांकाचा अधिकार सोडा’, असंच जणू केंद्र सरकार या शहराला सांगत होतं. सत्तेची गणितं काही औरच असतात, याचा अनुभव नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सातत्याने येत होता. यामुळे प्रयत्न करूनही हे शहर पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारापासून वंचित होतं. केवळ आपल्या पक्षाचा मक्ता इतक्याशा सबबीखाली नवी मुंबईवर अन्याय झाला आणि हा पुरस्कार इंदूरसारख्या शहराला बहाल करण्यात…
आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि ऊर्जेने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीतून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. प्रेम जीवनात गोडवा वाढेल आणि जोडीदाराची साथ मिळेल. वृषभ- आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ असून, जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि काही शुभ कार्याचे आयोजन हो L शकेë. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाचा योग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आनंदवाडी शिवारात शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी उसाच्या ट्रॅक्टर आणि डंपरच्या अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडीत नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात घडला. पुण्याकडून येणाऱ्या मालट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोर उभ्या असलेल्या एसटी बससह तब्बल १० ते १२ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंदनापुरी घाटातील लेनवर एका उसाचा ट्रॅक्टर व डंपरमध्ये किरकोळ अपघात झाला होता. या अपघातामुळे घाटामध्ये अचानक वाहतूक जाम झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. याचदरम्यान पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारा मालट्रक (क्रमांक एमएच ३४ बीजी ३३८६)…
