Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी केवळ शासनच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जोपासना व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या नाशिक रामशेज उपपीठातून निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी सोहळ्याचे संगमनेर-सिन्नर सरहद्दीवरील कर्हे घाट येथे अहिल्यानगर जिल्हा भक्त मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. घुलेवाडी येथील मुक्कामानंतर ही दिंडी आळेफाट्याकडे मार्गस्थ होत असताना चंदनापुरी येथील सिद्धू लॉन्स येथे दर्शन व महाप्रसादासाठी थांबली होती. याप्रसंगी आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर बीबे, लिंबू आणि कवड्या ठेवून जादूटोणा व अघोरी कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगेश सुभाष गोंदके याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळकेवाडी येथील रहिवासी ज्योती बाळासाहेब कडू यांचे पती मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. कडू यांच्या शेताजवळच संशयित आरोपी मंगेश गोंदके याचे शेत आणि घर आहे. आरोपी गोंदके याने दोन वर्षांपूर्वी कडू यांच्या शेतातील वालवडीची दोरी कापून नुकसान केले होते, तर सहा महिन्यांपूर्वी कडू…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सौहार्द राहील. आरोग्य उत्तम राहील, तरीही आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयमाने मार्ग काढता येईल. आर्थिक व्यवहारात काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास मनःशांती मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये इतरांचे ऐकून घेऊन निर्णय घेणे हिताचे ठरेल. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवता येईल. मिथुन- आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केवळ पुस्तक प्रकाशित करून थांबून चालणार नाही. आजच्या काळात पुस्तकाचे ऑडिओ स्वरूप तयार करण्याबरोबरच त्यातील छोट्या-छोट्या कथा, प्रसंग आणि विचार रील्स तसेच लघु व्हिडिओंच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आजचा जमाना रील्सचा आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे असलेला समृद्ध वैचारिक आणि ऐतिहासिक ठेवा प्रभावीपणे समाजापर्यंत नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. राहुल कोसंबी यांनी अनुवादित केलेल्या ‘जवाहरलाल हाजिर हो’ या पुस्तकाचे प्रकाशन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वेगवेगळ्या ५०० राजांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले. बलाढ्य आणि जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील गोरगरीब व सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची नैतिकता व निर्भयता ही मूल्ये जगासाठी अनुकरणीय असून, महात्मा गांधींमुळे संपूर्ण जगात भारताची मोठी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी व गांधी भजनांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या आणि बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण उर्फ माऊली दत्तात्रय गणगे (वय ३२, रा. सुरेगाव दही, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगर जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – “देशाला ‘विश्वगुरू’ बनल्याच्या घोषणा ऐकवल्या जात आहेत; पण प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताची भूमिका पाहिली तर अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच आज देश म्हणतोय—मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!” असा घणाघाती आरोप संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला. “महात्मा गांधींकडे सत्ता, सैन्य किंवा अण्वस्त्रे नव्हती; पण त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या ताकदीसमोर ब्रिटिश साम्राज्याला झुकावे लागले. आज भारताकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था, प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि अण्वस्त्र क्षमता असूनही जागतिक पातळीवरील अनेक प्रसंग सरकारच्या परराष्ट्र धोरणाची परीक्षा घेत आहेत.” पाकिस्तानसोबतच्या संघर्षानंतरचा प्रश्न- “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन…

Read More

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे नेतृत्वगुण इतरांना प्रभावित करतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या, निष्काळजीपणा टाळा. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुमच्या कामात संयम आणि सातत्य ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायात धनलाभाचे योग बनत आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. मिथुन – आजच्या दिवशी बुद्धिमत्ता आणि चातुर्याने तुम्ही कठीण प्रश्न सहज सोडवू शकाल. नवीन काम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शेती पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा, शेतकऱ्याला हेक्टरी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल तसेच मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेचे संकट निर्माण झाले असून, त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणारी सुतारवाडी, पायरवाडी, कौठे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले आहे. “मुख्यमंत्र्यांनी धमक्या देणे सोडून द्यावे, तुम्ही तीन महिने आत टाकले तरी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आम्ही ‘पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ’!” असे थेट आव्हान दिपके यांनी मुंबई प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत दिले. केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनीच ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर ठपका ठेवल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि अकोले या सरळ मार्गानेच गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली आहे. जर सरकारने आणि काकोडकर समितीने जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात तीव्र आंदोलन उभारून थेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वे रोखू, असा थेट इशारा तांबे यांनी दिला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून या प्रश्नावरून आता आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनानंतर डॉ. अनिल काकोडकर समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-  मुंबईत सोमवारी झालेल्या एका अपघात प्रकरणी माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पश्चिम मध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. मुंबईतील खार पश्चिम येथील सीडी रोड-16 वा रोड जंक्शनवर २८ सप्टेंबरच्या सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात बीएमसी कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (४१) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नॅन्सी (३७) गंभीर जखमी झाल्या. ७१ वर्षीय माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या भरधाव इर्टिगा कारने अय्यप्पन यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ…

Read More

आजचे राशिभविष्य –  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही लीलया पेलू शकाल. व्यवसायात आर्थिक लाभाचे चांगले योग दिसत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची साथ उत्तम राहील, तरीही धावपळीवर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण वाढल्यामुळे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते, त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रिय व्यक्तीसोबत मतभेद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील प्राचीन, जागृत व नवसाला पावणारे श्री वरदविनायक मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. परिसरातील अनेक भाविकांनी अनवाणी पायी येऊन श्री वरदविनायकाचे दर्शन घेत नवसपूर्ती केली. अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता प्रभातगीत गायनाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी प्रणव परशुरामी यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. दिवसभर जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची सुरक्षा विचारात घेता, नगरपरिषदेच्या ताफ्यात दोन नवीन अत्याधुनिक अग्निशामक वाहने दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत या वाहनांच्या खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संगमनेरकरांच्या सुरक्षेत मोठी भर पडली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे होते. हीच गरज ओळखून नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची क्षमता वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तातडीने राज्याचे नगरविकास मंत्री तथा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जयहिंदचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात सकाळी १५७ विद्यार्थ्यांची गांधीवेषातील प्रभात फेरी, भजन संध्या आणि दुपारी ‘जवाहरलाल हाजीर हो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता यशोधन कार्यालय येथील मैदानापासून महात्मा गांधींजींची वेशभूषा केलेल्या १५७ विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता संगमनेर बस स्थानक येथे गांधीजींच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना अलीकडील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत थोरात आणि त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. सुजय विखे यांनी थोरातांना वाकून नमस्कार केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “पराभूत होऊनही बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही?” हा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून विचारला जात असेल, तर त्याचे उत्तर केवळ निवडणुकीच्या निकालात शोधता येणार नाही, असे मत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे वडील, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  दिलीप खेडकर यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल १०२ टक्के (दुप्पट) म्हणजे १३ कोटी ३० लाख ९१ हजार ६९६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे. २८ वर्षांच्या कालावधीची चौकशी- दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते व मे २०२३ मध्ये…

Read More

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक व्यवहारात लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही संयमाने त्यावर मात कराल. आर्थिक बाबतीत थोडे नियोजनबद्ध चालणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांच्या बाबतीत सावध राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल. मिथुन- आज तुम्हाला सर्व क्षेत्रांत यश मिळण्याचे योग आहेत. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने तब्बल ९२ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बारामती येथील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० रुपये दराच्या तब्बल १८४१९ बनावट नोटा, ५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली फोक्सवॅगन कार (MH 14 DF 0365) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश…

Read More