Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, २६ जानेवारी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संगमनेरचे भूषण आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकुट लाभला आहे. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रघुवीर खेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला जो सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध कलावारसा समर्थपणे पुढे नेत रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककलेला नवी ओळख, नवे परिमाण आणि नवी उंची मिळवून दिली. सोंगाड्याच्या हजरजबाबी भूमिकेपासून वगनाट्यातील दमदार अभिनय तसेच पारंपरिक लावणी नृत्य आणि अष्टपैलू सादरीकरणातून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर…
डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर संतोषभाऊ… आज आई पाहिजे होती… एक हुंदका बाहेर पडला आणि क्षणभर आम्ही दोघेही नि:शब्द झालो… रघुभाऊ फोनवर बोलत होते. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मागील पंचावन्न वर्षांचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवास आठवत भाऊ बोलत होते. सन २०१५ पासून तमाशा लोककलेला पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. सुरुवातीची अनेक वर्षे कांताबाई सातारकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की पद्मसाठीचा अतिशय क्लिष्ट असा फॉर्म भरायला सुरुवात व्हायची. यासाठी सुरुवातीला माझे मित्र ज्ञानेश्वर केदार यांच्या मदतीने अविनाश वर्पे यांच्याकडे हे काम चालायचे. पुढे या सगळ्याचा सराव झाला. दरम्यान कोविडमध्ये कांताबाई गेल्या. नंतर…
संगमनेर, २५ जानेवारी | अनंत पांगारकर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या ३३ लाखांच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते, तोच शनिवारी पुन्हा संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून १० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील अनियंत्रित कत्तलखाने बंद करण्याचे धाडस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी जोर धरत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.…
संगमनेर | प्रतिनिधी आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, स्व. कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर हे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवरांसह देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, समाजसेवा, विज्ञान आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पद्म पुरस्कार सोहळा विशेष ठरला आहे, कारण राज्यातील चार व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई खेडकर आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. कृषी क्षेत्रात कापूस…
नाशिक | २५ जानेवारी २०२६ पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर, आता नाशिकमध्ये शेतकरी संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी नाशिकमधून सुमारे ५५,००० शेतकऱ्यांचा भव्य ‘लाँग मार्च’ मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या महामोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, इंद्रजित गावीत आणि उमेश देशमुख यांसारखे दिग्गज नेते करत आहेत. हा लाँग मार्च मुख्यत्वे दोन मोठ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आला…
नाशिक | प्रतिनिधी कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत असतानाच, या आजाराच्या उपचारांमधील सर्वात मोठा अडसर हा निदानासाठी लागणारा खर्च ठरत आहे.भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण केवळ आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करतात. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आता मोफत करण्यात आल्या आहेत. कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून,या सुविधेचा लाभ आतापर्यंत…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत असलेल्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सत्तेचा किती हव्यास आहे, याचं चित्र दिवसगणिक पहायला मिळत आहे. विशेषत: सत्ताधार्यांना पडलेला हव्यास इतका विकृत आहे, की कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या पक्षाकडेच एकवटली पाहिजे, असा पण या पक्षांचा दिसतो आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्या पक्षांची आहे. यात कोणाही राजकीय पक्षाची मागे राहायची तयारी नाही. जो तो सत्तेसाठी हपापलेला आहे. हे हपापलेपण पाहून मतदारही आपण यांना निवडून देऊन गैर तर केलं नाही ना, असा प्रश्न स्वत:लाच विचारू लागला आहे. विशेषत: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या हव्यासाची विकृती अधिकच डोकं वर काढू लागली आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय…
आजचे राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. आर्थिक बाबतीत थोडे नियोजन आवश्यक आहे, विनाकारण खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा. दुपारनंतर काही चांगली बातमी मिळण्याची…
नाशिक – नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच…
संगमनेर – संगमनेर शहरात चॉपरने हल्ला करून एका तरुणाचा हात निकामी केल्याच्या गंभीर प्रकरणात, संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी हा निर्णय दिला असून, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. घटनेचा पार्श्वभूमी आणि पोलिसांचा आरोप संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १०२५/२०२५ नुसार, निशांत उर्फ बंटी नंदू आरगडे आणि वैष्णव आव्हाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडिताच्या हातावर चॉपरने जोरदार वार केला होता, ज्यामध्ये पीडिताने आपल्या डाव्या हाताचा पंजा गमावला.…
संगमनेर: पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची वज्रमुठ बांधली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली हजेरी महत्त्वाची ठरली. हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कोते बोलत होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने…
श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात…
मुंबई (वडाळा): मुंबईतील वडाळा पूर्व येथील आनंदवाडी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईक असलेल्या चार महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या वृद्धेच्या मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्योत्सना राजेंद्र जाधव (४३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ किशोर दादू वाघमारे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतजमिनीशी संबंधित वाद न्यायालयात सुरू आहे. तसेच मुंबईतील वडाळा येथील घराशी संबंधितही हा वाद…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाच्या मदतीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ६ हजार किलो गोमांस, जिवंत जनावरे आणि दोन पिकअप वाहनांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या न्यू सेवा सॉ मिलच्या समोरील एका…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानात आरोपी पप्पू ऊर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीची ३ फूट लांबीची ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख आणि संगमनेरमधील साळी समाजाचे मार्गदर्शक, जेष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पासाहेब मुरलीधर केसेकर (वय ६१) यांचे शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एक निष्ठावान शिवसैनिक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आप्पाशेठ हक्काचा आधार होते. त्यामुळे अनेकांचे हॉटेल ओंकारेश्वर हे न्याय मागण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. सर्व समाज घटकातील नागरिकांशी त्यांचा मोठा स्नेह होता. धर्मवीर, हिंदू हृदय सम्राट अशा पदव्या त्यांना संगमनेरकरांनी दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने केवळ साळी समाजाच्याच नव्हे तर संगमनेर करांचे मोठे नुकसान…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा ठरेल, मात्र ही धावपळ फलदायी असेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे किंवा नवीन जबाबदारीचे संकेत मिळत आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण घरातील सुशोभीकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी असलेले जुने मतभेद आज संपुष्टात येतील. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. वृषभ – व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. प्रलंबित देणी परत मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; विशेषतः पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ असून घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज मनामध्ये थोडी अस्वस्थता जाणवू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळून…
