Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आयुष्यात स्थैर्य आणि व्यावहारिक विचार घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी कष्टांचे कौतुक होऊन प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. अवाजवी खर्च टाळून आर्थिक नियोजन करणे हिताचे राहील. वृषभ – आज आत्मविश्वासात वाढ होऊन रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील, मात्र अतिआत्मविश्वास आणि आळस टाळणे आवश्यक आहे. मिथुन – मालमत्तेसंबंधीचे जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. कर्क – व्यावसायिक योजना पुढे नेण्यासाठी आजचा काळ अतिशय अनुकूल आहे. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास मोठा फायदा होईल. सिंह – मन प्रसन्न राहील आणि ठरवलेली सर्व कामे नियोजनानुसार सुरळीत पार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या पाच दिवसांत चोरीच्या तीन धाडसी घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी पानोडी येथील जाधव वस्तीवर भरदिवसा ‘गुरु माऊली’ किराणा दुकानात पाणी मागण्याच्या आणि ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओरबाडून नेले.  पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पिंपरी लौकीच्या दिशेने दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरले. या संपूर्ण प्रकारात चोरट्यांच्या हिमतीपेक्षाही आश्वी पोलिसांच्या निष्काळजी आणि ढिम्म कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भरदिवसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ५ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडवरील लवणवाडी पाटीजवळ कच्च्या रस्त्याच्या आडोशाला अंधारात थांबलेल्या या संशयितांना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, यामध्ये दोन काळया रंगाच्या आलिशान विनाक्रमांक कार (हुंदाई क्रेटा आणि टाटा हॅरियर), २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे, ६ मोबाईल, लोखंडी टॉमी आणि मिरची पूड अशा मुद्देमालाचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी, दलित व श्रमिकांचे खंदे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्र सेवा दल आणि साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीला आणि सामाजिक भानाला चालना देणारी ही स्पर्धा बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला (मालपाणी हेल्थ क्लबजवळ), तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता ३ री ते ४ थी, ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी, ९ वी ते १० वी, ११ वी ते १२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण आघात केला आहे. नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या मदतीसाठी आलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा विद्युत तारेचा तीव्र धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धांदरफळ बुद्रुक येथे मंगळवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे धांदरफळ आणि प्रवरानगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. ललिता सुनील थेटे (वय ६०, रा. भगवतीपूर, प्रवरानगर) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे. धांदरफळ बुद्रुक येथील तोरकडी कुटुंबातील नातेवाईकाच्या दशक्रिया विधीनिमित्त त्या तीन-चार दिवसांपूर्वीच मदतीसाठी आल्या होत्या. बुधवारी पार पडणाऱ्या विधीच्या आदल्या दिवशी सर्व पाहुणे-रावळे एकत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिशिंगणापूर परिसरातील हॉटेल ब्लू ऑरगॅनिक रसवंती सेंटरजवळ रचलेला सापळा यशस्वी ठरवत, ५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह एका आरोपीस अटक केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक २० ऑगस्ट रोजी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने धडक कारवाई करत अनिल सिताराम सावंत (वय ३०, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर/राहाता: रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने दिलेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जीवनाशी झुंज देत आहे.  हा थरारक अपघात १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी को-हाळे शिवारातील उपाध्ये वस्तीजवळ घडला. या घटनेनंतर जखमींना मदत न करता थेट काढता पाय घेतल्याने संगमनेर येथील नामांकित डॉ. सत्यजित निघुते यांच्यावर राहाता पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचऱ्याचे साहित्य घेऊन संगमनेरच्या दिशेने जाणारा टाटा ७०९ टेम्पो बंद पडल्यामुळे चालकाने तो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टेम्पो दुरुस्तीचे काम सुरू असतानाच समोरच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या माफियांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक मोहीम राबवत जोरदार दणका दिला आहे.  पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गुन्हे शाखेने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ९४ लाख ६८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. जिल्ह्यात अवैध गुटखा व मावा विक्रीचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे निर्देश दिले होते. या सूचनांचे गांभीर्याने पालन करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ पोलीस…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून तुमचे कौशल्याने कौतुक होईल. आर्थिक बाबतीत प्रगती दिसून येईल आणि जुनी येणे वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सलोखा राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे मन शांत ठेवून निर्णय घेणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा बजेट बिघडू शकते. जोडीदारासोबत संवाद साधल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग येत आहेत, परंतु काळजीपूर्वक प्रवास करा. मिथुन- आज तुम्हाला विविध क्षेत्रात यश मिळण्याचे चांगले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर शहर व परिसरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेला अटकाव घालण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांच्या वतीने उद्या, शुक्रवारी एका भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नशा मुक्त अभियानाअंतर्गत आयोजित या उपक्रमाद्वारे ‘ड्रग फ्री श्रीरामपूर’चा नारा देण्यात येणार असून, या रॅलीत श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे. ही भव्य जनजागृती रॅली उद्या सकाळी साडेसात वाजता आर.एन.बी. कॉलेजच्या क्रीडांगणावरून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथील उत्सव सभागृहात २२ ते २५ ऑगस्टदरम्यान चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी आणि कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच शनिवार २२ आणि रविवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९.०० या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे सुमधुर प्रवचन होणार आहे. त्यानंतर सोमवार २४ आणि मंगळवार २५ ऑगस्ट रोजी प्रख्यात प्रेरक व्याख्याते आणि गीता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, उपाध्यक्षपदी निलेश शिंदे तर सुनील राहणे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आठवणी आणि जीवनातील प्रत्येक क्षण कायमस्वरूपी आनंदी ठेवण्यासाठी फोटो हे अत्यंत महत्त्वाचे असतात. संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. व्यापारी असोसिएशन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला पद्मश्री रघुवीर खेडकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डी. बी. राठी सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर पार पडलेल्या असोसिएशनच्या वार्षिक बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ फोटोग्राफर काशिनाथ गोसावी, प्रवीण दिघे, ओंकार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. वृषभ – आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. मानसिक शांततेसाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. मिथुन – तुमच्या बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यामुळे आज तुम्हाला मोठे यश मिळू शकते. नवीन लोकांशी झालेली भेट भविष्यात लाभदायक ठरेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या थकीत रकमेपोटी दिलेला चेक वटला नसल्याने दाखल झालेल्या धनादेश अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीला सहा महिने कारावास आणि सुमारे साडेसहा लाख रुपयांची भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी दिला. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील ज्वेलर्स व्यावसायिक आशिष सुभाष वर्मा यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून ४० लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज घेतले होते. या कर्जाची मुद्दल व व्याजासह थकबाकी रक्कम भरण्यासाठी त्यांनी पतसंस्थेला ३,२४,०५१ रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, आशिष वर्मा यांच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने संबंधित बँकेने तो धनादेश अनादरित (बाऊन्स) करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कौठे मलकापूर (संगमनेर):  संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध दर्शवत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. सौर प्रकल्पाचे काम तातडीने बंद करून सर्व साहित्य जागेवरून हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन चिघळल्याने पोलिसांनी भाजप तालुकाध्यक्षासह १० ते १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. साकूर पठार भागातील हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौठेमलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत ठिकाणी खतसाठा करून शेतकऱ्यांना बिल न देता युरियाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला. या कारवाईदरम्यान ३ हजार ७२४ रुपये किमतीच्या युरियाच्या १४ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित दुकानदारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनापुरी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्रात युरियाची गाडी उतरवून त्याची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याची पक्की माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या पथकांनी मंगळवारी एकाच दिवशी संगमनेर शहर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ११ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, एकूण ४४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेवून येणारा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाइकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घ्या. वृषभ- आज तुम्हाला कामात थोडे धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक पुढे जाणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात बराच फायदा होऊ शकतो आणि नवीन सहकार्य सुरू होऊ शकते. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमधील दीड हजार विद्यार्थिनींना वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘मुक्कामार’ अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले असून, एकविरा फाउंडेशन आणि मुक्कामार फाउंडेशन यांच्यात नुकताच याबाबतचा महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री तथा मुक्कामार फाउंडेशनच्या संस्थापक इशिता शर्मा आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार पार पडला. यावेळी बोलताना अभिनेत्री इशिता शर्मा यांनी देशातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे हा कलंक असून, मुलींनी स्वतः…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल कायम गुणवत्तापूर्ण राहिली असून, जगातील बदलांनुसार नवीन अभ्यासक्रम राबवत हे विद्यापीठ गुणवत्तेच्या जोरावर देशात अग्रगण्य ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.  अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे आयोजित अमृतवाहिनी विद्यापीठाच्या शानदार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रिमोटद्वारे विद्यापीठाच्या फलकाचे व अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. रोहित दुबे पाटील, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख,…

Read More