Author: Annant Ppangarkar

शिर्डी, दि. ०४ –  पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्‍कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्‍यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्‍य असून मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी‌ ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. राहाता शहराचे आराध्‍यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्‍थानाचा दर्जा प्राप्‍त करुन दिल्‍याबद्दल पालकमंत्री विखे यांचा विश्‍वस्‍त मंडळाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. तसेच वीरभद्र महादेव मंदिराच्‍या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्‍या कोनशिलेचे अनावरण करण्‍यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, मुकुंदराव सदाफळ, देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष साहेबराव निधाणे, ॲड.रघुनाथ बोठे, उपाध्‍यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्‍यक्ष…

Read More

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी –  संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा फसवी ठरली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालकमंत्र्यांनी संगमनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे बोलले जात आहे. यावरून पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेर तालुक्याच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. अशा शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, तो निधी अद्याप का मिळाला नाही अशी विचारणा केली…

Read More

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमनेरमध्ये दहा ई टॉयलेट व शहरातील जोर्वे नाक्यावर भव्य क्रीडांगण विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी मंजूर झाल्याने ही कामे सुरू होत असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. आमदार तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाच्या अनेक योजना सातत्याने राबविल्या गेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून संगमनेरला वैभवशाली संगमनेर शहराची ओळख मिळाली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेला विविध पारितोषिक मिळाली आहे. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी यासाठी १० ई टॉयलेटसाठी १ कोटीचा निधी,…

Read More

अनंत पांगारकर संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन व विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ एक कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा खोटी ठरली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे ही बाब उघड झाली. तांबे यांनी बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही त्यावर…

Read More

मुंबई दि. ०४ फेब्रुवारी – विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने निवडणुकीच्या काही महिने आधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची घोषणा करत या योजनेचा बहिणींना लाभ देणे सुरू केले होते. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचं मोठ योगदान असल्याचं सांगितलं जातं. मात्र सत्तेमध्ये येतात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचं आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचं सांगितलं जातं. तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली…

Read More

कोल्हार (ता. राहाता) येथे जनसेवा फाउंडेशनच्यावतीने संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व धनश्री विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक, ज्याने उपस्थितांना विशेष आनंद दिला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

Read More

अहिल्यानगर दि. ०४ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जाहीर केल्याप्रमाणे पुतळ्यासाठी तातडीने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तांबे यांनी समितीच्या बैठकीत केली असता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकते यासाठी सरकारकडे देखील मार्गदर्शन मागविल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संगमनेर मध्ये बस स्थानकाच्या जागेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सध्या राजकारणात अडकल्याचे दिसत आहे. नुकत्याच पालकमंत्री राधाकृष्ण…

Read More

मुंबई, दि.३ :  राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. महायुती सरकार जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीकरीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे.…

Read More

मुंबई, दि. ०३ : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल…

Read More

संगमनेर दि. ३ फेब्रुवारी :   नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत. या मार्गावर ३९,५०० वृक्षांची लागवड होणार असून त्याचे पाच वर्षांसाठी संगोपन देखील ठेकेदार करणार आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे-नाशिक रस्त्याच्या…

Read More

शिर्डी दि. ३ फेब्रुवारी – शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने साईबाबांची शिर्डी या गुन्हेगारी कृत्यामुळे हादरून गेली आहे. या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर…

Read More

अहिल्यानगर दि. ३ फेब्रुवारी –  महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलेच महागात पडलं आहे. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली. यानंतर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात…

Read More

संगमनेर दि. २ फेब्रुवारी – शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने चोरांचा तपास लावण्यात संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्या गुन्हे करू लागले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर, घरफोड्या करणाऱ्यांनी, दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार…

Read More

संगमनेर दि. २ फेब्रुवारी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा. कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते, असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवोद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर विश्वस्त डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एम. ए.…

Read More

संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रख्यात लेखक असलेल्या शरद तांदळे यांनी आज रामाच्या काळात ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी लिहिली आहे. आगामी बळी या पुस्तकाचे ते लेखन करत असून ‘बळी’देखील क्रांतिकारक पुस्तक असेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मेधा महोत्सवाच्या आनंद पर्वाचे सुरुवात झाल्याची घोषणा केली. संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य…

Read More

संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रत्येक तरुणांमध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात. सुप्त गुणांच्या रूपाने प्रत्येकामध्ये दडलेला हा राजहंस आपल्याला माहित नसतो. त्यामुळे बऱ्याचदा तो माहिती करून देण्यासाठी मेधा महोत्सवाचा खूप उपयोग होत असतो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमध्ये रविवारी दोन दिवस चालणाऱ्या आणि तरुण-तरुणींसाठी आकर्षण ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला प्रारंभ झाला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रख्यात उद्योजक व लेखक शरद तांदळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले, अनेक दिवस ज्या उत्सव,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक दि. – २ रविवारी पहाटे नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटामध्ये खासगी लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी असून ४२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तसेच हा अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नितेश राणे यांना महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय व बंदरे यामध्ये खूप काम करण्याचा वाव आहे. ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवा. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर लक्ष दिले तर उत्तम होईल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना सुनावले आहेत. मंत्री राणे यांनी ‘परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी, त्याने कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल’, अशी हास्यास्पद मागणी केली होती. मात्र राणे यांची ही मागणी फेटाळत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सामाजिक भान राखले असल्याचे सांगत रूपवते यांनी हे सरकार जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…

Read More

शहाणा होईल तो माणूस कसला, अशी बोली म्हण आहे. मरणासाठी तो कुठल्याही संकटाची तमा बाळगत नसतो. वाईच्या मांढरादेवीच्या गडावर घसरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संकटाची तमा जे बाळगत नाहीत, त्यांना काही सांगून डोकं चालवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. याने मरण आलंच तर आदळआपट करायची आणि गप्प बसायचं. प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति असंच म्हणता येईल. सारासार विचार करणारा माणूस तिथे मरायला जाणार नाही. ज्याला श्रध्देचं ठिकाण मानलं जातं तिथेच अशा घटना घडतात. मात्र श्रध्दा म्हणून कोणी कोणाला वाचवायला येत नाही. पवित्र स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो, असं मानायच्या ठिकाणी ३० जण मोक्षाला गेले. असा मोक्ष…

Read More

अहिल्यानगर दि. १ – जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले. यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. १९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत…

Read More