Author: Annant Ppangarkar

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अकोले तालुक्यातील चांदगिरवाडी (एकदरा) येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींचे अपील संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी अकोले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली २ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडाची कारवाई कायम ठेवणारा निकाल दिला आहे. रामदास खंडू भांगरे, दामू खंडू भांगरे आणि विष्णू खंडू भांगरे (सर्व रा. चांदगिरवाडी, अकोले) अशी शिक्षा कायम झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ७ फेब्रुवारी २००४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपींनी जमिनीच्या जुन्या वादावरून फिर्यादी तुळशीराम भांगरे यांच्या घरासमोर…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर चाप लावण्यासाठी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर आणि राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि सतीष भवर यांच्या…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  लेखणीला विचारांची दिशा देणारे, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची हिंमत बाळगणारे, संगमनेर तालुक्याच्या पत्रकारितेचा मानदंड असलेले संवेदनशील ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेस परिवाराच्यावतीने आज हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला. पांगारकर सर म्हणजे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ते एक विचार आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या काळात अनेक वेळा पुण्यनगरीसह राज्यातील नामांकित दैनिकांचे विभागीय प्रतिनिधी, उपसंपादक, ब्युरो चीफ म्हणून जबाबदारी सांभाळत, वंचित, शोषित, पीडितांच्या व्यथेला वाचा फोडली. त्यांच्या लेखणीत नेहमीच पुरोगामी महाराष्ट्राची, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची झलक राहिली आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याची आणि समाजाच्या शेवटच्या घटकासाठी लिहिण्याची त्यांची भूमिका आजच्या काळात…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पवित्र श्रावण महिन्यात एकीकडे नागरिकांचे धार्मिक विधी, गृहप्रवेश, भंडारा आणि पूजा-अर्चा यांसारखे कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे संगमनेर शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोणताही वादळ-वारा किंवा पाऊस नसताना महावितरणचा निष्क्रियपणा उघड झाला असून, अखंडीत वीजपुरवठा देण्यास वीज महामंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे. सध्या ग्रामीण भागात तीन-तीन तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू असून संगमनेर शहरातही विजेचा लपंडाव कायम आहे. अचानक वीज गायब…

Read More

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न होतील. घरातील वातावरणात आनंद राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा काळ अत्यंत शुभ आहे. आरोग्याची उत्तम साथ लाभेल, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण खर्च वाढल्यामुळे काहीसा ताण निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. कौटुंबिक बाबींमध्ये संयम बाळगावा लागेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांच्या सहवासात मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या दृष्टीने…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांच्या देखत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे समर्थक संदेश बाळासाहेब देशमुख यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय २८, रा. खांडगाव) या तरुणाच्या गालावर चापटा मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संदेश देशमुख यांच्याविरुद्ध एनसीआर (N.C.R.) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास खांडगाव येथील शेतकरी प्रसाद गुंजाळ हे नेहमीप्रमाणे खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील पटांगणात बसलेले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीस संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.  ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. आरोपी काशिनाथ रामनाथ गिऱ्हे हा दारूच्या नशेत फिर्यादी इंदुबाई बारकु गिऱ्हे यांच्या घराच्या दारात आला होता. “तुझ्या पतीने मला गावातून येताना आईवरून शिवीगाळ…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारने मान्यता दिल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोजापूर पूर चारीद्वारे तालुक्यातील अवर्षण प्रवर्षण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, असल्याने लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाकरीता वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याबाबत मंत्री…

Read More

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक कामात संयम बाळगण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ आज आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमाने तुम्ही त्यावर मात कराल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. प्रवासाचे योग बनत आहेत. कर्क कामाच्या ठिकाणी तुमच्या…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न विचारात घेऊन संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे पाझर तलावातून पाणी सोडण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोहारे-कासारे परिसरात गेल्या काही दिवसांपासून खरीप पिकांना पाण्याची अत्यंत गरज भासत होती. तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला होता. यामुळे संतप्त व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा वसंत पवार या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने पळताना शेततळ्यात पडल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुःखाकुल पवार कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या अत्यंत कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडून मिळणारी सर्व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. कृष्णाच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडून एकाच दिवशी ६ विविध ठिकाणी यशस्वी छापे टाकले असून, यामध्ये सुमारे ५ लाख ९५ हजार ९१५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, गुटखा आणि माव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १५ आरोपींवर विविध कलमांन्वये एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांची चार विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी, भिंगार कॅम्प,…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कोपरगाव- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपला बडगा उगारला असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख २ हजार रुपयांच्या दोन ट्रॅक्टरसह वाळू उपशाचे साहित्य जप्त केले असून घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर ट्रॅक्टर मालकांसह अन्य तिघे जण पोलिसांची चाहुल लागताच फरार झाले आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक व तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा प्रकल्प नाही; तो पुढच्या अनेक दशकांच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे या रेल्वेचा मूळ मार्ग — पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक असाच कायम राहावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी संगमनेरमध्ये सभा झाल्या, बैठका झाल्या, निवेदने देण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, आंदोलने झाली आणि रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. कारण या प्रकल्पाचा मार्ग बदलला तर केवळ रेल्वेचे काही किलोमीटर बदलणार नाहीत;…

Read More

Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे कर्ज भरणं अवघड झालं तर? अगदी गंभीर आजारात कर्जाचे अखेरचे एक-दोन हप्ते भरणं अशक्य झालं तर बँकेचे अधिकारी काय करतात? त्यातच कर्जदार व्यक्ती ते कर्ज भरू न शकल्यास म्हणजे ती मृत्यू पावल्यास हे अधिकारी त्या कर्जदाराचं आणि त्याच्यासाठी तारण राहणाऱ्या व्यक्तीचं काय करतात? या प्रश्नाचं उत्तर एकच, ते म्हणजे कोणत्याही मार्गाने वसुली! ती करण्यासाठी प्रसंगी दादागिरी, ती प्राप्त करण्यासाठी बळजबरीची वसुली. सामान्य माणूस अक्षरशः हतबल होतो. इतक्याशा पैशांसाठी तो वाकतो. त्याला आपल्या इभ्रतीची काळजी असते. ती जाऊ नये म्हणून तो आणखी कर्ज काढतो आणि खाईत…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येईल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यातील योजनांना योग्य दिशा देईल. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, परंतु अवाजवी खर्च टाळावा. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. वृषभ – कुटुंबात सहकार्य आणि प्रेमाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या विशेष प्रकल्पावर लक्ष केंद्रित कराल. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. कायदेशीर किंवा जुन्या न्यायालयीन प्रकरणांतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. मिथुन – मानसिक शांतता आणि संतुलनासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील, परंतु घाईघाईत कोणताही अयोग्य…

Read More

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही जवानांना मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात तसेच त्यावर तत्परतेने तोडगा काढता यावा, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रभागनिहाय बैठकांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे संगमनेरकरांना आपल्या हक्काच्या व्यासपीठावरून थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पालिका गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली. हा कोणताही नेहमीचा ‘जनता दरबार’ नसून, शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तयार केलेले एक सक्षम कार्यचौकट आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनासारख्या दैनंदिन नागरी समस्यांवर संबंधित प्रभागातील नगरसेवक…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर:  स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत राहुरी येथील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील दुचाकी व मंगळसूत्र चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोहन अनिल उर्फ यासीनखाँ भोसले (वय २०, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचे इतर तीन साथीदार सध्या फरार आहेत. २५ ऑगस्ट २०२६ रोजी राहुरी फॅक्टरी परिसरातील शाहुल जॉन वंजारे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे…

Read More