Author: Annant Ppangarkar
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. विभागाने तब्बल ४७ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदांवर पदोन्नती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही आनंदाची बातमी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या प्रलंबित होत्या, यामुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत होता. महसूल विभागाने यंदा दिवाळीपूर्वीच ही पदोन्नती देऊन अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या शासन आदेशानुसार, पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत…
श्रीरामपूर – श्रीरामपूरच्या स्थानिक राजकारणात मोठा राजकीय ‘बदल’ झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभावी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष राहिलेले प्रकाश चित्ते यांच्यामुळे शिंदे गटाला शहरातील ओबीसी मतदारांचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा मजबूत आधार मिळेल. सूत्रांनुसार, आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट भाजपसोबत युती न करता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे. या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदासाठी…
आज नरक चतुर्दशी असल्याने आणि दिवाळीचा सण असल्याने अनेक राशींसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि लाभदायक ठरू शकतो. ग्रह-नक्षत्रांची स्थिती आज काही राशींसाठी विशेष शुभ योग घेऊन येत आहे. मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. भाग्याची साथ मिळाल्याने आर्थिक लाभात वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मोठ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. क्रोध आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. आज गायीला गूळ खाऊ घाला. वृषभ (Taurus): आजचा दिवस भाग्यवर्धक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभाचे योग आहेत. धैर्य आणि मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मोलाचे ठरतील. नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ…
संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला हे १.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित…
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे अस्त्र उपसत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज (१९ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बोगस मतदार याद्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महायुतीमधील आमदारांपर्यंत सर्वांचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवून त्यांची पोलखोल केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्थानिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास ९६ लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेत. असे होणार असेल…
देशाच्या आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने मतनोंदीपासून यादीतील मतदारांची नावं काढून टाकण्याचा केलेला घोळ सामान्य मतदारांच्या अधिकाराचा उघडपणे उपमर्द करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्य घटनेच्या कलम 326 अन्वये देशातील 18 वर्षं पूर्ण करणार्या व्यक्तीचा मतदानाचा अधिकार अबाधित आहे. मतदार यादीतील नाव नोंदवण्यापासून त्यात बदल लोकप्रतिनिधी कायद्याच्या 1950 अंतर्गत तर अपात्रतेचे नियम हे 1951 अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहेत. या कायद्यान्वये एखादी व्यक्ती कारावासात असेल, मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळत नाही. मतदाराला मतदानाचा मिळालेला घटनात्मक अधिकार कायदेशीर मानला गेला आहे. जो आजच्या निवडणूक आयोगाला मान्य नाही, असंच दिसू लागलं आहे. केंद्रिय निवडणूक आयोग आणि राज्यांच्या निवडणूक आयोगाविषयी…
आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जुळून येत आहे. चंद्र आज कन्या राशीत स्थित आहे. मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल आणि कामात उत्साह जाणवेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता असल्याने वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्ही तुमच्या विचारसरणी आणि गोड बोलण्याने इतरांना प्रभावीत कराल. यामुळे लोकांशी संबंधात सुसंवाद निर्माण होईल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर देणे महत्त्वाचे आहे. प्रेम संबंधात गोडवा आणि भावनिक शांतीचा अनुभव येईल. मिथुन: आज मनाची स्थिती थोडी द्विधा राहील…
संगमनेर – संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, निष्पाप नागरिकांना लुटून मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. शहरप्रमुख सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेरमध्ये रात्री-अपरात्री नागरिक सुरक्षित नाहीत. काही सराईत गुन्हेगार निष्पाप नागरिकांना अडवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल आणि दागिन्यांची हिसकाहिसका करतात, आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण करतात. अशा प्रकारच्या अनेक घटना पोलिसांत नोंदवलेल्या असतानाही कारवाई होत नाही. शुक्रवारी रात्री शुभम भोईर या तरुणाला साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर राहुल सोनवणे, अनिकेत मंडलिक साई सूर्यवंशी व आणखी एकाने…
संगमनेर: शुक्रवारी रात्री घोडेकर मळ्यामध्ये म्हाळुंगी नदीच्या पुलावर गुन्हेगारांकडून घरी परतणारा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग १३ मधील रहिवाशांनी एकत्रित येत सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण कापड दुकानातील काम संपवून घरी परतत असताना साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर काही सराईतानी त्याला अडवले. त्याच्याकडून पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुभम भोईर याने विरोध करताच, या गुन्हेगारांनी त्याला जबर मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या गुन्हेगारी कृत्यामुळे संगमनेर…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यात झपाट्याने विकास करत असलेल्या संगमनेर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक मोठी गरज आता पूर्ण झाली आहे. दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक गाठावे लागत होते, मात्र ही कुचंबना आता थांबली आहे. संगमनेरकरांची वाढती मागणी आणि मनोरंजन क्षेत्रातील उणीव लक्षात घेत, मालपाणी उद्योग समूहाने शहरात अत्याधुनिक मालपाणी मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे. अगदी महानगरांच्या तोडीच्या सुविधांनी सज्ज असलेल्या या मल्टिप्लेक्सचे शानदार उद्घाटन शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोंबर) मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून (शनिवार) हे चित्रपटगृह नवीन चित्रपटांसह लोकसेवेत रुजू झाले असून, संगमनेरमध्ये मनोरंजनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली…
अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात राज्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अपहृत मुलीची सुटका झाली असून, तिच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी मिळून येत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना मुलीचा तात्काळ शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन मुलीचा शोध घेण्याचे आदेश…
आज धनत्रयोदशी असल्यामुळे काही राशींना विशेष धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. मेष (Aries) – आजचा दिवस आनंददायक आणि उत्साही असेल. तुमच्या जोडीदाराला प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. नोकरीमध्ये यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करा. अध्यापन, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना यश आणि पदोन्नतीचे योग आहेत. धनलाभाचे योग आहेत, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus) – आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि आरामदायी असेल. कामाची वेळेवर पूर्तता आणि प्रभावी आत्मविश्वासाच्या बळावर तुम्हाला दिवसभर शांतता व समाधान मिळेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक ताण कमी होईल. मिथुन…
अहिल्यानगर – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला. सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठिशी कर्डिले नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार, प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण…
संगमनेर – शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे. भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केली. राजहंस दूध संघ येथे आज (शुक्रवार १७ ऑक्टोंबर) वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध…
संगमनेर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, कर्डिले यांच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी आणि ‘ग्रामीण शहाणपण’ असलेले लोकनेते हरपले आहेत. अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री म्हणून काम केलेले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांची भावना जाणणारे नेतृत्व होते, असे थोरात यांनी नमूद केले. तसेच, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रभावी ठरले. मुद्देगिरीने बोलणारे आणि माणसांची कदर करणारे नेतृत्व गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड…
संगमनेर – वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने आता संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शहराच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरून काढत, या उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ची उभारणी केली आहे.आज (शुक्रवार, दि. १७) सायंकाळी या मल्टिप्लेक्सचा भव्य शुभारंभ होत आहे. या नव्या मल्टिप्लेक्समुळे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक येथे करावी लागणारी ‘वारी’ आता थांबणार आहे. ‘गाय छाप’मुळे देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती घडवली आहे. शिर्डी येथील वॉटरपार्कपासून सुरू झालेला हा प्रवास आशिया खंडातील…
संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांबे म्हणाले की, ‘प्रस्थापित नसतानाही आपल्या कर्तृत्वाने दोन दशकांहून अधिक काळ अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे कर्डिले साहेबांचे जाणं अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारं आहे. दुःख व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले तांबे… प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि…
अहिल्यानगर: भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून कर्डीले यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे शिवाजीराव कर्डीले यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तेथे आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. राहुरीच्या आमदारकीसोबतच शिवाजीराव कर्डीले यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही होते. अनेकदा…
आजचा दिवस धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण एकादशी आणि दिवाळीची सुरुवात यानिमित्ताने होत आहे. आज रमा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आज वसूबारस आहे. मेष (Aries): व्यस्तता आणि धावपळ राहील पण आर्थिक लाभ होतील. व्यवसायाच्या योजना भविष्यात फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. अतिउत्साहात जास्त खर्च टाळावा. वृषभ (Taurus): मित्रांच्या भेटीचे योग आहेत. मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुन (Gemini): व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सर्जनशील कामात यश आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कर्क (Cancer):…
संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी घाटात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणाजवळ साईड गटारीच्या अंदाज न आल्याने बसच्या डाव्या बाजूची चाके गटारात गेल्याने बस एका बाजूला पलटी झाली. मात्र शेजारीच डोंगर असल्याने ती डोंगरावर कलल्यामुळे या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस जेव्हा चंदनापुरी घाटातून प्रवास करत होती, तेव्हा धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली. अपघात होताच…
