Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यात आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उघडपणे समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडून बोलताना अनावधानाने झालेल्या एका किरकोळ भाषिक चुकीचे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली आक्रमक भूमिका मांडत, ज्येष्ठ महिला नेत्यावर चिखलफेक होत असतानाही काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी गप्प का, असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी कतारी यांनी विरोधकांच्या बेछूट आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी करत विरोधकांच्या आरोपांना अत्यंत जळजळीत आणि चोख उत्तर दिले आहे. राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, ज्यांना कसलेही भान नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विशेष चर्चेत आले आहे. आपली भूमिका मांडताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,…

Read More

शनिवार, ११ जुलै २०२६ चे राशिभविष्य मेष ♈ आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायक आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. नवीन योजना आखण्यासाठी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मनामध्ये अनेक दिवसांपासून असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता नांदेल, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. वृषभ ♉ आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळे देणारा ठरेल. आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठेही गुंतवणूक…

Read More

मुंबई:  सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के तट्टू’ किंवा ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.  मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘कुत्रे’ किंवा ‘भाड्याचे तट्टू’ यांसारखे शब्द शोभा देत नाहीत, कारण ही टपोरी लोकांची भाषा आहे. लोकशाहीत सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचा जनतेला आणि विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करून फडणवीसांना ‘डिझास्टर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ नियमित पाणी तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा संगमनेरकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. शहरातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यासंबंधीचे निवेदन देत तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी मान-सन्मान वाढवणारा आणि उत्तम ठरेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. आपल्या मतांविषयी तुम्ही आग्रही राहाल. मात्र, आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील आणि काही नवीन मोठे प्रकल्प तुमच्या हाती येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत काही जुन्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण टाळा. मिथुन – गेल्या अनेक दिवसांपासून चालत…

Read More

संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश येण्याची चिन्हे असून संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार तांबे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आणि अकोले परिसरासाठी नव्या निकषांनुसार स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करत परिवहन मंत्र्यांनी नव्या शासन अध्यादेशातील निकषांच्या आधारे संगमनेरसाठीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुख्य व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, सध्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी झाली असून शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. असे असताना २००९ च्या योजनेबाबत २०२६ मध्ये विधानसभेत अत्यंत खोटे, चुकीचे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करण्याचे काम येथील नवीन लोकप्रतिनिधी करत आहेत. पालिका निवडणुकीत घरातील उमेदवारासह सर्वच जागांवर सपाटून मार खाल्ल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच हे आरोप केले जात असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. या चौकशीतून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे विरोधक तोंडघाशी पडतील, अशी घणाघाती टीका माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: संगमनेर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगार रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या जाणता राजा मार्गावरील, स्टेट बँकेसमोरील इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारण्यात येत असून, लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे. ​आजवर कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या संगमनेरमधील हजारो कामगारांना किरकोळ तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नाशिक किंवा अहिल्यानगर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. या लांबच्या प्रवासामुळे कामगारांचा मोठा वेळ आणि पैसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख (गुड्डू इंजिनिअर) यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रशासकीय कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे हायटेक पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुजम्मील शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे. या मागणीच्या पूर्ततेकडे आता संगमनेरकरांचे लक्ष याकडे लागले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामे, आर्थिक बाबी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर खडाजंगी चर्चा होत असते. अशा वेळी सभागृहात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नक्की काय भूमिका मांडतात, हे प्रत्येक नागरिकाला घरबसल्या कळावे यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन आश्वी: पावसाळा सुरू होताच आश्वी खुर्द आणि परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचे दर्शन घडू लागले असून, रविवारी सकाळी एका शेतकरी दाम्पत्याला मृत्यूचा थरारक अनुभव आला. आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) आणि त्यांच्या पत्नी योगिता क्षिरसागर (वय ३८) हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गायींसाठी चारा कापत असताना, त्यांच्या अवघ्या दोन फुटांवर ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून कोसळली. सुदैवाने या तारेला रबराचे आवरण असल्याने आणि दाम्पत्य काही अंतरावर असल्याने एक मोठा अनर्थ टळला. मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडताना मोठा स्फोट झाला आणि हवेत ठिणग्या उडाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही अवघड कामेही सहज सोपी कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कामात चुका होणार नाहीत. ​वृषभ – आज तुमचे मन थोडे विचलित राहू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ​मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. तुमच्या प्रभावी बोलण्याने लोक प्रभावित होतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याचे योग असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  श्रीरामपूर:  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सन २०२५ व २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत आरोपींवर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ व ५६ च्या तरतुदीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर:  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज, (मंगळवारी ७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत. हवामान विभागाने अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालुक्यामध्ये आधीच काही भागांत अतिवृष्टी झाली असल्याने निर्माण झालेली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज (मंगळवारी) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे घाटातील मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या येणारी-जाणारी वाहने एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या रस्त्यावरील मोठे दगड आणि मलबा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज चंद्र बाराव्या स्थानी असल्याने आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. इतरांच्या कामात नाहक हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी आणि कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार आज करू नयेत. ​वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. चंद्र लाभ स्थानात असल्यामुळे धनवृद्धी आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी नवीन करार किंवा सौदे यशस्वी होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. ​मिथुन – नोकरी आणि व्यवसायामध्ये आज आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामगिरीवर प्रसन्न राहतील, ज्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोठ्या प्रमाणावर चोरी (अपहार) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, याप्रकरणी संगमनेरमध्ये ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात २५ जून २०२६ रोजी या दान चोरीप्रकरणी एफआयआर क्रमांक ९०/२०२६ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, हा गुन्हा केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून यामुळे संपूर्ण…

Read More