Author: Annant Ppangarkar
आजचे राशीभविष्य: गुरुवार, १९ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होऊन वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने चालल्यास मोठे लाभ होतील. मिथुन: आज तुम्हाला बौद्धिक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक ठरेल.…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या भ्याड हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे शिवसेनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीडित विद्यार्थिनीला तातडीने उत्तम वैद्यकीय उपचार आणि शासनाकडून भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी वडगाव पान आणि तळेगाव फाटा परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी महामार्ग अडवत जोरदार ‘रास्ता रोको’ केला आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संतापजनक…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानासाठी एकूण १५७.६० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या मोठ्या निधीतून संगमनेर शहराच्या वाट्याला ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते.…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शालेय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड या शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आपला तीव्र निषेध नोंदवला. प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस ठाण्यावर नेलेल्या मूक मोर्चेकर्यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपाधीक्षक कार्यालयाचे मोरे आणि नायब तहसीलदार माळवे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काल एका अल्पवयीन मुलीवर ॲसिडसदृश पदार्थाने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नसला तरी दहा पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२४(१) आणि १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सायबर…
आजचे राशीभविष्य – बुधवार, १८ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात प्रगतीचे योग असून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. मिथुन: बौद्धिक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमची कल्पनाशक्ती आणि निर्णयक्षमता वाढीस लागेल. प्रवासाचे योग असून तो प्रवास सुखकर होईल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. कर्क: आजचा दिवस संमिश्र…
संगमनेर, प्रतिनिधी- वडगाव पान (संगमनेर) येथील एका तेरा वर्षीय शालेय मुलीवर अज्ञात इसमाने केलेल्या निर्घृण ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. या घटनेचा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पीडित मुलीची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. गुन्हेगाराला तातडीने शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना- या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शालेय विद्यार्थिनीवर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. गुन्हेगार हा कोणत्याही जाती-धर्माचा नसून तो केवळ गुन्हेगार असतो. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला तात्काळ पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलीस सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे संगमनेरची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. तालुक्यातील घटनांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १८ व १९ मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब व लोखंडी कुंपणाजवळ उभे राहू नये. वीज कोसळण्याची शक्यता असल्याने या काळात विजेच्या उपकरणांचा…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा आणि त्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवण्याच्या प्रयत्नांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात बेताल आरोप करून त्यांना शांत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यापुढे सक्रिय विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रा. पवार हे महाराष्ट्रात मराठीला खऱ्या अर्थाने राजभाषा, व्यवहारभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्यासाठी, तसेच मराठी विषय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकभाषेच्या चळवळीचे महत्त्वाचे नेते व संघटक आहेत. मराठी भाषेचा मुद्दा हिंसक राजकीय अस्मितेत न अडकवता, या विषयावरील सरकारचा खोटेपणा आणि दांभिकपणा उघड करण्याचे मोठे कार्य त्यांनी…
आजचे राशिभविष्य, मंगळवार, १७ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल आहे, मात्र घाईने निर्णय घेणे टाळावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रात काही बदल संभवतात जे भविष्यात फायदेशीर ठरतील. मिथुन आजचा दिवस धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात काही अडथळे येऊ शकतात, परंतु संयम राखल्यास यश नक्की मिळेल. सामाजिक कार्यात…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील रणखांब येथे एकतर्फी प्रेमातून एका २१ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, आरोपी तरुणाने स्वतःवरही हल्ला करत शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जनार्दन गोरक्ष साळवे (वय २८, रा. पिंपरणे) असे या माथेफिरू आरोपीचे नाव असून, घारगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जनार्दन हा पीडित तरुणीचा नात्याने चुलत मेहुणा लागतो. त्याचे या तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी प्रेम होते. पीडित मुलगी पिंपरणे येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेली असताना आरोपीची तिच्यावर…
संगमनेर, प्रतिनिधी- एका दुर्दैवी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या ३३ वर्षीय इलेक्ट्रिशियनच्या वारसांना तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची विक्रमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, प्रदीर्घ कायदेशीर लढाईला सामंजस्याने पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीने पुन्हा एकदा सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे आपले ब्रीद सार्थ ठरवले आहे. सदर घटनेची पार्श्वभूमी अशी की, मे २०१९ मध्ये एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे पत्नी, लहान मुलगा आणि वृद्ध आई-वडील अशा संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. आपल्या हक्काच्या न्यायासाठी या कुटुंबाने २०२२ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणात…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (शहरी) २.० अंतर्गत संगमनेर नगरपालिका हद्दीत सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली. तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निमित्ताने मोठे यश मिळाले आहे. आमदार तांबे यांनी २ फेब्रुवारी रोजी या निधीसाठी विशेष मागणी केली होती. शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वर्दळ लक्षात घेता स्वच्छतेच्या सुविधा वाढवणे…
शिर्डी, विशेष प्रतिनिधी- साधु-संतांचा अपमान केल्याच्या कारणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत संगमनेर मधील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या अवघडपीर सतनाथजी महाराज (चितेगाव, नाशिक) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेनेचे माजी पदाधिकारी अशोक सातपुते यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, अशोक सातपुते यांनी सतनाथजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ही बाब निदर्शनास येताच भाविक आणि शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी तत्काळ शिवसेना सचिव व माजी खासदार…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या भावनांना वाट करून देताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत हतबलतेने भाष्य केले आहे. सामान्यांच्या संसाराला आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांचा उल्लेख करताना, आज दुर्दैवाने त्यांनाच न्याय मिळत नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये मिटकरी यांनी अत्यंत गंभीर विधान करताना एका ‘अदृश्य शक्ती’चा उल्लेख केला आहे. जर अशीच घटना इतर कोणासोबत घडली असती आणि अजित पवार पूर्ण ताकदीनिशी मैदानात असते, तर…
आजचे राशीभविष्य: सोमवार, १६ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. नातेवाईकांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा, जेणेकरून मतभेद टाळता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल,…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – संगमनेरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवकांचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी प्रस्तावित नर्सिंग कॉलेजला तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती करत हे महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आरोग्य व्यवस्थेला हक्काचे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मांडला. मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, औषधांचा अपुरा साठा आणि डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांमुळे सर्वसामान्यांना उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संगमनेरचा विस्तार पाहता स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारांसाठी…
मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजवले असून, यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामतीचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. आयोगाच्या या घोषणेमुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली असून, ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी…
