Author: Annant Ppangarkar
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमनेरच्या भूमीत एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य क्रांती घडली आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या ट्युलीप गार्डनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे वेधले गेले आहे. माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आणि धाडसी प्रयोगातून साकारलेले हे गार्डन सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. उष्ण हवामानातील यशस्वी प्रयोग- ट्युलीप ही फुले प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यासारख्या अतिथंड हवामानातच फुलतात. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान हे सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. मात्र, हीच संकल्पना महाराष्ट्रात, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या तुलनेने उष्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. तालुक्यातील ४३९ कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या १५२९ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, लवकरच नवीन रॅक उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काही भागांत खत टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. युरियाचे वितरण टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी- शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी दुपारी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घारगाव (ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील रहिवासी आशालता मनोहर आहेर या आपल्या पतीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरमार्गे अकोल्याला जात होत्या. शनिवारी दुपारी संगमनेर बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आणि बसमध्ये चढण्याच्या गडबडीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांहून अधिक वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने चोरले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच आहेर यांनी तातडीने…
बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या देशातील महत्वाच्या महामंडळात सर्वाधिक बदनाम झालेल्या मध्यप्रदेशच्या व्यापम घोटाळ्याला केंद्राने राबवायला घेतलेल्या कौशल्य विकास योजनेने मागे टाकलं आहे. हा घोटाळा म्हणजे मोदी सरकारच्या ‘तुमभी खाओ, मै भी…’ या नीतीचं उत्तम उदाहरण होय. कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेल्या व्यापमने आजवर अनेकांचे जीव घेतले. त्यात हात ओले झालेले जसे होते तसे या घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी घेतलेले अधिकारीही होते. देशात आजवर झाला नाही, असा भ्रष्टाचार या महामंडळात झाला. ज्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात हा घोटाळा झाला ते आज देशाचे कृषीमंत्री आहेत. शिवराजसिंग चौहान हे त्यांचं नाव. महाराष्ट्रात जसं एमपीएसस्सीचं काम चालतं तसं मध्यप्रदेश सरकारच्या अधिकृत परिक्षा मंडळाचं काम व्यापमद्वारे चालतं. या महामंडळामार्फत…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे मानसिक प्रसन्नता राहील. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्या. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळणे हिताचे ठरेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक सुदृढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस बौद्धिक प्रगतीचा आहे. सर्जनशील कामांमध्ये तुम्हाला रस वाटेल. जुन्या मित्रांशी गाठभेट झाल्यामुळे मन आनंदी राहील. व्यवसायातील नवनवीन संधी…
संगमनेर, प्रतिनिधी- जादुटोणा करून ‘सर्व चांगले करून देतो’ असे आमिष दाखवून एका कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संमोहनाचा वापर करून आरोपीने फिर्यादीच्या आईकडून सुमारे ५ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि पशुधन लांबवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत खुर्द (हाळदा वस्ती) येथील रहिवासी शरद कैलास डोंगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सन २०१४ मध्ये आरोपी बाळासाहेब पोटे आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादीच्या घरी जाऊन ‘तुमचं सर्व चांगलं करतो’ असे सांगून जादुटोणा करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपये आणि एक बकरी नेली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या आईशी संपर्क वाढवून…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा अनेक इन्व्हेस्टर कंपन्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाच्या कंपनीकडून विनापरवाना मोठी आर्थिक गुंतवणूक स्वीकारली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पथकाने व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सतिष डोळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदिप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव…
संगमनेर, प्रतिनिधी- व्यापाऱ्यामार्फत केरळ आणि तामिळनाडू राज्यात विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता, सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परराज्यातील दोन व्यापारी पेढ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम रमेश बोचरे (रा. कुसुर, ता. जुन्नर) यांनी आपला कांदा माल केरळमधील एस. के. ट्रेडर्स आणि तामिळनाडूतील श्री मरियम ट्रेडर्स यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, संबंधित व्यापाऱ्यांनी मालाचे पैसे न देता त्या रक्कमेचा अपहार केला. यामध्ये एस. के. ट्रेडर्सकडून १३ लाख ७० हजार रुपये आणि श्री मरियम ट्रेडर्सकडून ५ लाख ७० हजार रुपये येणे बाकी होते. हा व्यवहार डिसेंबर…
अहिल्यानगर: राजूर आणि अकोले परिसरातील विद्युत रोहित्रांमधील कॉपरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे कॉपर आणि गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १५,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कोहंडी (ता. अकोले) येथील धरणाजवळील एक विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी उघडून त्यातील ३,५०,००० रुपये किमतीची कॉपर चोरून नेली होती. याप्रकरणी स्वप्नील सुरेश कोकणे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अकोले परिसरात अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी…
संगमनेर, प्रतिनिधी- “काम केलंय, कमाल करूया” ही केवळ घोषणा नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रबळ व्हिजन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांनी केले. नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मालपाणी यांनी शहराच्या विकासासाठी वैयक्तिक जबाबदारीवर भर दिला. ते म्हणाले की, ‘व्हिजन २.०’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, कारण प्रगती ही केवळ प्रशासकीय निर्णयावर अवलंबून नसून ती लोकसहभागातून निर्माण होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, शहराने माझ्यासाठी काय केले…
संगमनेर, प्रतिनिधी – लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली. संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी…
संगमनेर, प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या लोकशाहीत विचारांची देवाणघेवाण आणि निरोगी राजकीय स्पर्धा अभिप्रेत होती. मात्र, आज राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते अत्यंत विदारक आहे. सत्तेसाठीची ही जीवघेणी स्पर्धा आणि निष्ठावंतांचा गळा घोटण्याची वृत्ती महाराष्ट्राला एका चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य करतानाच संगमनेरच्या सुसंस्कृत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील हा ट्रेंड संगमनेरमध्ये येऊ न देता संगमनेरने आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे…
संगमनेर, प्रतिनिधी – स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते, या विचारांना स्मरून मी संगमनेरच्या सेवेसाठी सज्ज आहे, असे भावनिक उद्गार संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी काढले. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे…
संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता याच विकासप्रक्रियेत भर घालत संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आमदार तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ‘अभय योजना’ अखेर सुरू झाली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना सुमारे २ कोटी रुपयांच्या शास्तीकरातून मुक्तता मिळणार आहे. अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट- नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर कराचा मोठा बोजा पडत होता. अनेकदा नागरिक शास्तीची रक्कम भरत असूनही ती घरपट्टीमध्ये समाविष्ट केली जात नव्हती, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा तांत्रिक…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम संधी मिळेल. तुमच्या स्वभावातील जिद्द आणि आत्मविश्वास यामुळे कठीण कार्ये सहज साध्य होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे आहे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्चावर मर्यादा घालणे भविष्यातील बचतीसाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी पाळा. मिथुन: नशिबाची साथ लाभल्यामुळे आज तुमचे मनोबल वाढलेले दिसेल. व्यवसायात नवीन प्रयोग किंवा करार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती…
संगमनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘घरकुल’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या. संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आ. खताळ म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील नागरिक…
नेवासा | महाराष्ट्र संवाद न्यूज वीज चोरीच्या कारवाईत तडजोड करून दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) या दोन लोकसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे नेवासा शहरात राहते घर व पाण्याचा प्लांट आहे. २२ डिसेंबर…
संगमनेर, प्रतिनिधी- येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत असला तरी, नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर शहरात कडक बंदी घालून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघाच्या’ (RGSS) वतीने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. RGSSने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नायलॉन मांजा हा प्लास्टिक मिश्रित आणि अविघटनशील असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्याला हा मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडत असून मानवी जीव धोक्यात आला…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेला विकासाचा ‘धडाका’ आता कोट्यावधी रुपयांच्या दाव्यात रूपांतरित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना मोठी गती मिळाली आहे. ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते मजबूत करण्यासाठी आ. खताळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेतून १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात तुटणारा गावांचा संपर्क आणि…
