Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांच्या देखत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे समर्थक संदेश बाळासाहेब देशमुख यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय २८, रा. खांडगाव) या तरुणाच्या गालावर चापटा मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संदेश देशमुख यांच्याविरुद्ध एनसीआर (N.C.R.) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास खांडगाव येथील शेतकरी प्रसाद गुंजाळ हे नेहमीप्रमाणे खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील पटांगणात बसलेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीस संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. आरोपी काशिनाथ रामनाथ गिऱ्हे हा दारूच्या नशेत फिर्यादी इंदुबाई बारकु गिऱ्हे यांच्या घराच्या दारात आला होता. “तुझ्या पतीने मला गावातून येताना आईवरून शिवीगाळ…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारने मान्यता दिल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोजापूर पूर चारीद्वारे तालुक्यातील अवर्षण प्रवर्षण भागातील जलसाठे भरून देण्याच्या निर्णयामुळे ३५ पाझर तलाव भरले जाणार असून, असल्याने लाभक्षेत्रातील ६०६.६३ हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भोजापूर मध्यम प्रकल्प हा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाकरीता वरदान ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्याबाबत मंत्री…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक कामात संयम बाळगण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक…
आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ आज आर्थिक बाबींमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमाने तुम्ही त्यावर मात कराल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. प्रवासाचे योग बनत आहेत. कर्क कामाच्या ठिकाणी तुमच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न विचारात घेऊन संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे पाझर तलावातून पाणी सोडण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोहारे-कासारे परिसरात गेल्या काही दिवसांपासून खरीप पिकांना पाण्याची अत्यंत गरज भासत होती. तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला होता. यामुळे संतप्त व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा वसंत पवार या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने पळताना शेततळ्यात पडल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुःखाकुल पवार कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या अत्यंत कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडून मिळणारी सर्व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. कृष्णाच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडून एकाच दिवशी ६ विविध ठिकाणी यशस्वी छापे टाकले असून, यामध्ये सुमारे ५ लाख ९५ हजार ९१५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, गुटखा आणि माव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १५ आरोपींवर विविध कलमांन्वये एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांची चार विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी, भिंगार कॅम्प,…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कोपरगाव- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपला बडगा उगारला असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख २ हजार रुपयांच्या दोन ट्रॅक्टरसह वाळू उपशाचे साहित्य जप्त केले असून घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर ट्रॅक्टर मालकांसह अन्य तिघे जण पोलिसांची चाहुल लागताच फरार झाले आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक व तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा प्रकल्प नाही; तो पुढच्या अनेक दशकांच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे या रेल्वेचा मूळ मार्ग — पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक असाच कायम राहावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी संगमनेरमध्ये सभा झाल्या, बैठका झाल्या, निवेदने देण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, आंदोलने झाली आणि रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. कारण या प्रकल्पाचा मार्ग बदलला तर केवळ रेल्वेचे काही किलोमीटर बदलणार नाहीत;…
Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे कर्ज भरणं अवघड झालं तर? अगदी गंभीर आजारात कर्जाचे अखेरचे एक-दोन हप्ते भरणं अशक्य झालं तर बँकेचे अधिकारी काय करतात? त्यातच कर्जदार व्यक्ती ते कर्ज भरू न शकल्यास म्हणजे ती मृत्यू पावल्यास हे अधिकारी त्या कर्जदाराचं आणि त्याच्यासाठी तारण राहणाऱ्या व्यक्तीचं काय करतात? या प्रश्नाचं उत्तर एकच, ते म्हणजे कोणत्याही मार्गाने वसुली! ती करण्यासाठी प्रसंगी दादागिरी, ती प्राप्त करण्यासाठी बळजबरीची वसुली. सामान्य माणूस अक्षरशः हतबल होतो. इतक्याशा पैशांसाठी तो वाकतो. त्याला आपल्या इभ्रतीची काळजी असते. ती जाऊ नये म्हणून तो आणखी कर्ज काढतो आणि खाईत…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येईल. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यातील योजनांना योग्य दिशा देईल. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, परंतु अवाजवी खर्च टाळावा. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. वृषभ – कुटुंबात सहकार्य आणि प्रेमाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या विशेष प्रकल्पावर लक्ष केंद्रित कराल. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. कायदेशीर किंवा जुन्या न्यायालयीन प्रकरणांतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. मिथुन – मानसिक शांतता आणि संतुलनासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील, परंतु घाईघाईत कोणताही अयोग्य…
Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही जवानांना मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात तसेच त्यावर तत्परतेने तोडगा काढता यावा, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रभागनिहाय बैठकांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे संगमनेरकरांना आपल्या हक्काच्या व्यासपीठावरून थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पालिका गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली. हा कोणताही नेहमीचा ‘जनता दरबार’ नसून, शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तयार केलेले एक सक्षम कार्यचौकट आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनासारख्या दैनंदिन नागरी समस्यांवर संबंधित प्रभागातील नगरसेवक…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत राहुरी येथील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील दुचाकी व मंगळसूत्र चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोहन अनिल उर्फ यासीनखाँ भोसले (वय २०, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचे इतर तीन साथीदार सध्या फरार आहेत. २५ ऑगस्ट २०२६ रोजी राहुरी फॅक्टरी परिसरातील शाहुल जॉन वंजारे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा विक्रेत्यांविरोधात जोरदार धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ७ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २,९९,९९० रुपये किमतीचा अवैध पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून एकूण १४ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांना…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन हिक्किम: जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘हिक्किम’ पोस्ट ऑफिसमधून भारताच्या पंतप्रधानांना एक थेट पत्र पाठवण्यात आले आहे. वाढती असहिष्णुता, नफरत आणि सामाजिक विभाजनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संगमनेर येथील वकिल समीर लामखडे यांनी पत्राद्वारे केली आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत संगमनेरमधील वकिलाने लिहिलेलं हे पत्र चर्चेत आलं आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. मात्र, सध्या देशात ज्या प्रकारे असहिष्णुता आणि नफरतीचे वातावरण पसरत आहे, तसेच लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेवर गंभीर…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड टाळा. वृषभ- आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. नवीन आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन करारांची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन- आजचा दिवस तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची परीक्षा घेणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर सहजरीत्या मात कराल. प्रवासाचे योग…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. नेवासा येथील कुख्यात लष्करे टोळीतील प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रधान…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नेपाळमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या धडकताच संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची धडधड वाढली होती. संगमनेरच्या घुलेवाडी येथील निर्मला गुंजाळ यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत २४ ऑगस्टला नेपाळला गेलेले ४५ पर्यटक या प्रलयात अडकल्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने सर्व पर्यटक पूर्णपणे सुखरूप असून ते आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनीही प्रशासनाचा पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. २६ ऑगस्टच्या दुपारनंतर नेपाळमध्ये महाप्रलयाने थैमान घातल्याच्या बातम्या वाहिन्यांवर झळकताच पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. संगमनेरमधील निवृत्त शिक्षक हिरालाल पगडाल यांच्यासह अनेक भाविकांचे नातेवाईक चिंतेत…
