Author: Annant Ppangarkar
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्याच्या जनतेने ४० वर्षे प्रेम दिले, आम्ही कष्टाने निळवंडे धरण, थेट पाईपलाईन आणि रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. मात्र, आता हाच विकासाचा वारसा उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू असून ज्यांनी रेल्वे पळवली, त्यांना ओळखा आणि तालुका वाचवण्यासाठी वेळीच एकत्र या, असे प्रखर आवाहन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर सेवा समितीच्यावतीने गणेशनगर येथे आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष व उमेदवार असलेले…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाला मोठे यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले. सुरुवातीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात आलेल्या बिबट्यानंतर पुन्हा एका बिबट्याला गुंगीचे औषध (डॉट) देऊन पकडण्यात आले, तर एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या जवळेकडल मध्ये तीन वर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जवळेकडलग येथील अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. शासनाने या घटनेची गंभीर दखल…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ‘संगमनेर मॉडेल’ राज्यासमोर ठेवणारे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून राजापूर येथे ग्रामविकास २५१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार ही ओळख जपत लोकनेते बाळासाहेब थोरात…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदनाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून झडती घेतली. या धडाकेबाज कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता. गुरुवारी (१८ डिसेंबर) एलसीबीचे…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील राहाता वगळून उर्वरित संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजीच केंद्रांवर दाखल होणार आहेत. निवडणूक कामात कोणताही अडथळा येऊ…
मेष: कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी संवाद वाढवा. मिथुन: नवीन कामाची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्क: आजचा दिवस धावपळीचा ठरेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. व्यापार-उद्योगात फायदा होईल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. कन्या: नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरासाठी काही खरेदी कराल. तूळ: प्रवासाचे योग आहेत. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वृश्चिक: आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुपित गोष्टी कोणाशीही…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम आयडीवरून मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह सब-टायटलसह काही व्हिडिओ आणि मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टमध्ये दोघांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते…
अकोले (प्रतिनिधी): अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: ग्राम विकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, तालुक्यात रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे निर्माण करून सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला. या निधीतून चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर पिंपरणे…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. पठार भागातील साकुर व बोटा परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने या भागातील दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिघात शासकीय अथवा खाजगी स्वरूपातील औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्याच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांना यासंदर्भात पत्र पाठवले. त्या पत्राची दखल घेत…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी एका निनावी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि सखोल तपासणी केली. मात्र, सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने हा केवळ एक खोडसाळपणा आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून आता कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आणि तातडीने पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर पोलिसांनी वेल्हाळे शिवारात मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत ८ जिवंत बैलांची सुटका करण्यात आली असून, टेम्पोसह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. मंगळवारी, (दि. १६ डिसेंबर) रात्री १०:५० च्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वेल्हाळे शिवारातून एका आयशर टेम्पोमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अनाधिकृत वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, राहुल…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हा आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्यानंतर, संगमनेर शहराच्या शिरपेचात आता मानाचा राष्ट्रीय तुरा रोवला गेला आहे. आगामी २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत संगमनेरमध्ये सहाव्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. योगासन भारत आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेसाठी संगमनेर सज्ज झाले असून, ध्रुव ग्लोबल स्कूलमधील क्रीडा संकुलात हा योगसाधनेचा महाकुंभ भरणार असल्याची माहिती योगासन भारतचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. पाच दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवासाठी देशातील २८ राज्यांमधून ७०० हून अधिक नामांकित योगासनपटू, त्यांचे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज): संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत सुरू असतानाच एका दुर्मिळ घटनेत नर आणि मादी बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजऱ्यात एकाच वेळी अडकल्याची घटना घडली आहे. मिलनाच्या उद्देशाने एकत्र आलेली ही जोडी जेरबंद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. मिर्झापूर (संगमनेर) येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा मिलनाच्या ओढीने आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे वनविभागाच्या…
मेष : आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. वृषभ : आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन : तुमच्या संवाद कौशल्यामुळे आज कठीण कामे सोपी होतील. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कर्क : आज थोडे भावूक राहाल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले ठरेल. सिंह : तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कन्या : नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. तूळ : जोडीदाराशी असलेले संबंध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात मंजूर झालेली आणि नंतर राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली रस्ते कामे पुन्हा मार्गी लागली आहेत. एकूण ३०.५७० किलोमीटरपैकी १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राज्य सरकारने नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील चार मोठ्या ग्रामीण भागांतील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. राजकीय वळणांनंतर कामांना पुन्हा संजीवनी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील ८ महत्त्वाचे रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय…
अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले… पदराखाली दोन काळजाचे तुकडे घेऊन माऊली माहेरी आधार शोधायला आली होती पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वीरगाव (ता. अकोले) येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्या बहीण-भावंडांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी मातेचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील एका शेतातील विहिरीत दोन बालके पडल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेत पीयूष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन निष्पाप जीवांचा करुण अंत…
अहिल्यानगर (महाराष्ट्र संवाद न्यूज): बनावट नाव, पत्ता आणि कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांचा मोठा गैरप्रकार शेवगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, या चौघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की,…
मेष – आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे चीज होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यात गोडवा ठेवा, ज्यामुळे वादाचे प्रसंग टळतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्यावर लक्ष द्या. मिथुन – नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल. प्रवासाचे योग आहेत जे फायदेशीर ठरतील. कर्क – नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सिंह – आज नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेशाशी…
सदनिका घोटाळा प्रकरण: मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दणका; २ वर्षांची शिक्षा कायम, मंत्रिपद धोक्यात!
नाशिक: राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा कायदेशीर दणका दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली दोन वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंड सत्र न्यायालयाने कायम ठेवला असून, कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांचेही अपील फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे नेमके प्रकरण?- हे संपूर्ण प्रकरण १९९५ सालातील असून नाशिक शहरातील व्ही.यू. अपार्टमेंटमधील सदनिकांशी संबंधित आहे. शासनाकडून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना…
