Author: Annant Ppangarkar
दैनिक राशीभविष्य: २४ फेब्रुवारी २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. आर्थिक आघाडीवर काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र, घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ आज तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे नियोजित बजेटनुसार चालावे. व्यवसायात मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. संवादातील गोडव्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. आरोग्यासाठी योगासने आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मिथुन तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान…
संगमनेर | अनंत पांगारकर सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाची नितांत गरज आहे. या महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असून, त्यांना नाकारणे म्हणजे आधुनिक भारताच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखे आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले. संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर रविवारी व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या व्याख्यानासाठी जनसमुदायाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते, तर व्यासपीठावर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या विशेष अर्थसंकल्पीय बैठकीत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीला शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी तीव्र विरोध दर्शवला. पालिकेच्या या बैठकीत जनसामान्यांवर लादल्या जाणाऱ्या संभाव्य दरवाढीवरून जोरदार चर्चा झाली, यामध्ये सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्यांची बाजू लावून धरत या दरवाढीला तीव्र विरोध दाखविला. यासंदर्भात त्यांनी, नगराध्यक्ष, पीठासन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे आपला लेखी विरोध सादर केला. या अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वीच शहरात मोठ्या प्रमाणावर करवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. संगमनेर नगरपालिकेतील एकमेव विरोधी नगरसेविका सूर्यवंशी यांच्यासह व्यापाऱ्यांनी या दरवाढीबाबत आधीच चिंता व्यक्त करत आपला विरोध नोंदवला होता. वाढत्या लोकभावनेची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी संबंधितांची बैठक…
संगमनेर, प्रतिनिधी – सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य आणि आदर्श संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ बुधवारी (२५ फेब्रुवारी) होणार आहे. सकाळी ९ वाजता आयोजित या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दिलासा दिला आहे. यंदाच्या हंगामातही कमी पर्जन्यमान आणि ऊस टंचाईचे आव्हान असताना, कारखान्याने यशस्वीरित्या गाळप पूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात एकीकडे पोलीस कडेकोट बंदोबस्त आणि रूटमार्च काढून आपण सज्ज असल्याचे मिरवत असताना, दुसरीकडे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात नशेबाजांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून किरकोळ कारणावरून इंदिरानगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील रहिवासी आणि रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित वाळके याच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की रोहित वाळके यामध्ये गंभीर जखमी झाले असून…
संगमनेर, प्रतिनिधी – रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे. यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे. विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५०…
दैनिक राशीभविष्य: २३ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे हिताचे ठरेल. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. मिथुन: तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागेल अशा काही घटना आज घडू शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पेलू शकाल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल आणि एखादा सुखद प्रवास घडण्याची…
संगमनेर, प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत. मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – लोकशाहीमध्ये ग्रामसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे एका तरुणाला मूलभूत पाणी प्रश्नावर आवाज उठवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून बाजार समितीच्या संचालकाने तरुणाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धांदरफळ खुर्द येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पियुष ठोंबरे या तरुणाने, आमच्या घरी नळाचे पाणी का येत नाही? असा साधा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुला पाहून घेईन, अशी…
जगाला हादरवून सोडणार्या जेफ्री एपस्टिनच्या भुताने भारताला हैराण करून सोडलं आहे. बाहेर येणार्या एकेका गोष्टीने जग हदरतो आहेच. पण स्वत:ला संस्कृती आणि परंपरेचा पायिक समजणार्या भारताचं आणि इथल्या राजकारण्यांचं नाव बाहेर येऊ लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. फाईलमध्ये आपलं नाव येऊ नये म्हणून सत्ता ज्या प्रकारे अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे, ते पहाता हे देशाच्या अस्तित्वासाठी अतिगंभीर होऊ शकतं. एपस्टिनच्या फाईलमध्ये अडकलेला एका राष्ट्राचा प्रमुख इतर देशांना कसा ब्लॅकमेल करतो, हे भारताच्या सत्ताधार्यांना लक्षात आलं नसेल तर दुर्देवच. असल्या विकृतीच्या मागे लागल्यावर देशाचं भलं होईल, असं ज्यांना वाटतं ते त्याहून अधिक विकृतीने पछाडलेत असंच म्हणायला हवं. ज्या महिला पत्रकाराने हे प्रकरण…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठ्या नफ्याचा ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण…
संगमनेर, प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या खंबीर पावलांमुळे संगमनेर नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील ‘अमृत’ शहरांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – दैनंदिन जीवनातील धावपळ विसरून नागरिकांनी आनंदाचे क्षण अनुभवावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून, हे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. हा उपक्रम उद्या रविवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ७ ते १० या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर, राजपाल क्लॉथ स्टोअर ते जाणता राजा मैदान या दरम्यान पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध खेळ, गाणी, गप्पा आणि…
संगमनेर: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भोजदरी येथील शेतकरी महेश गणपत हांडे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १३ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या शेतातील आणि शेततळ्यातील विद्युत पंप तसेच कॉपरची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा…
अहिल्यानगर : शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली संत्री चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोराला नगर तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामध्ये चोरीची संत्री, रिकामे कॅरेट आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दशमीगव्हाण येथील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी त्यांच्या शेतात संत्री विक्रीसाठी नेण्याकरिता ११० रिकामे कॅरेट ठेवले होते. १९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून संत्र्यांची चोरी केली. २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता शेतकरी शेतात गेले असता, त्यांना ९८ कॅरेटसह झाडांवरील फळे चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेतात टेम्पोच्या टायरचे निशाण आढळल्याने त्यांनी…
अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या अभिषेक कळमकर फरार असल्याचे समजते. फिर्यादीनुसार, शिरूर तालुक्यातील पीडित युवती तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. नोकरीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कळमकर यांनी तिला कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावले. एमआयडीसी परिसरातील स्वतःच्या शाळेत कामाला लावून देतो असे सांगून त्यांनी पीडितेचा विश्वास…
झरेकाठी वार्ताहर: संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर अहिल्यानगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आकांक्षा बोल्हेगाव फाटा येथील एमआयडीसीमध्ये कंपनीच्या कामासाठी जात असताना, एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता मोठी असून डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर संबंधित मोटरसायकल चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकांक्षाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली…
आजचे राशीभविष्य: २१ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण वादाचे प्रसंग टाळण्यासाठी शब्दांवर ताबा ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल आणि मुलांकडून एखादी शुभवार्ता समजू शकते. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि नवीन योजना…
