Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारणे किंवा राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असले, तरी सर्वांचे अंतिम ध्येय हे संगमनेरचा विकास हेच असले पाहिजे, राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित असावे आणि सभागृहाच्या आत शिरताना ते उंबरठ्यावरच सोडून केवळ शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर, नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पहिली विशेष सभा पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना मार्गदर्शन करताना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. आमदार तांबे यांनी नगरसेवकांना सुरुवातीलाच संगमनेर नगरपालिकेच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली…
मेष : मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल आणि जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा काळ अनुकूल आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक वातावरण अतिशय आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील, मात्र बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळलेले बरे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत. आज दानधर्म केल्याने मानसिक…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरमध्ये चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून, सामान्य नागरिक आता घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. घुलेवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुलेवाडी येथील रहिवासी सुरेखा तुकाराम मधे यांचे घर चोरट्याने लक्ष्य केले. घराच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्याने घरातील पेटीचे कुलूप शिताफीने फोडले. या पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीच्या या सत्रामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सुरेखा मधे…
संगमनेर, प्रतिनिधी – मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक साहित्य आणि माहिती गहाळ झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही केवळ साहित्याची चोरी नसून बहुजन महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप करत, यासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) कार्यकर्त्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२० या दरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मंत्रालयातून गायब झाली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी जर ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पिंपरणेमध्ये (संगमनेर) प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ६० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण सात जणांना अटक केली आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, पिंपरणे गावच्या शिवारात नदीपात्राच्या दक्षिण बाजूला असलेल्या पुलाजवळ ताहीर शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करून चोरून वाळू वाहतूक करत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) पहाटे १२:४५ च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी नदीकाठी…
संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आता नव्या कारभाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या टीम मध्ये ‘संगमनेर सेवा समिती’चे नूरमोहम्मद शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, स्वीकृत नगरसेवक म्हणून रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत हे निर्णय घेण्यात आले. विकासाचा नवा फॉर्म्युला आणि ‘संगमनेर २.०’ व्हिजन – माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या निवडी करताना शहराच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे.…
ओतूर – युद्धजन्य अशा जागतिक अस्थिर परिस्थितीतही भारत आर्थिकदृष्ट्या ‘रायझिंग स्टार’ असून २०२५-२०३० पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असा आशावाद ओतूर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. नाशिक येथील आर्थिक विश्लेषक समीर नाईक व सुनील कडलग यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रविवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी राज लॉन्स येथे आयोजित या चर्चासत्राची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वक्ते समीर नाईक, सुनील कडलग, डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. शशांक फापाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओतूर डॉक्टर असोसिएशनचे…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामाचा उत्साह टिकून राहील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असून जुनी येणी वसूल होण्याची दाट शक्यता आहे. वृषभ: आज व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आज हिताचे ठरेल. मिथुन: तुमची कल्पकता आणि बुद्धिमत्ता आज कामाच्या ठिकाणी चमकणार आहे. मान-सन्मान वाढेल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेले निर्णय मार्गी लागतील. कर्क: आज सरकारी कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन…
संगमनेर/बोटा – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सिन्नर, अकोले आणि संगमनेर मार्गेच जावा, या मागणीसाठी आज बोटा (ता. संगमनेर) येथे विकास क्रांती सेना आणि विविध संघटनांच्या वतीने सुमारे अडीच तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण-पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रेडिओ दुर्बिणीच्या लहरींना अडथळा निर्माण होऊ शकतो, असे कारण सांगत रेल्वे प्रशासनाने हा मार्ग बदलून पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेर आणि…
नक्की तारीख आठवत नाही, पण तो २००६ चा काळ होता. शिक्षणाचे दिवस होते आणि मी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. कामाला लागून जेमतेम १०-१२ दिवस झाले असावेत. एक दिवस अचानक कामाचे नियोजन बदलले आणि गेस्ट हाऊस इन्चार्ज थिटमे साहेबांनी मला सांगितले, “तुला आज नाईट शिफ्ट करून उद्याची जनरल ड्युटीही सांभाळायची आहे.” मी होकार दिला. रात्रभर जागून सकाळी पुन्हा कामासाठी सज्ज झालो. साधारण साडेनऊची वेळ असेल, एका गाडीचा हॉर्न वाजला. मी धावतच बाहेर गेलो आणि गाडीचा दरवाजा उघडला. समोर साक्षात आदरणीय भाऊसाहेब थोरात (दादा) उभे होते! त्यांना इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. पांढऱ्या…
