Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा प्रश्न विचारत पोस्ट केली. या पोस्टला प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. ‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. मात्र, या प्रतिक्रियेतून त्यांनी या रेल्वे मार्गाशी जोडलेल्या सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल पण, रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या तरूणांसाठी हीच उपजीविका आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील; मात्र आघाडी झाली किंवा नाही झाली तरी निमोण गटात शिवसेना शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते-पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणि ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ हे सूत्र घराघरात पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाप्रमुख अमर कतारी व भीमाशंकर पावसे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या ‘झंझावात दौऱ्याला’ आणि आढावा बैठकांना धडाक्यात सुरुवात झाली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ‘जेन झी’ ही आपल्या राष्ट्राची मोठी संपत्ती व शक्ती असून, प्रगतीची पालखी या युवाशक्तीच्या बलशाली खांद्यांवरच पुढे न्यायची आहे. त्यामुळे तरुणाईने शिव्यांची नव्हे तर संतांच्या ओव्यांची संगत धरावी, असे आवाहन कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात आयोजित ‘मन:शांती व जीवनविकास व्याख्यानमाला’ सलग पाचव्या वर्षी सुरू असून, या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ या विषयावर त्या बोलत होत्या. या दीड तासाच्या कीर्तनाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा व्याख्यानादरम्यान परांजपे यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महान व्यक्तींचे दाखले दिले. अवघ्या ३९…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: वृत्तपत्रामध्ये विरोधी बातम्या छापल्याच्या रागातून आणि अपघाताच्या कारणावरून पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर सावेडी येथील पत्रकार सुशिल थोरात (वय ४९) यांच्या कारला २० ऑगस्ट २०२६ रोजी सोनू कोहक याने मोपेडवरून धडक दिली होती. या अपघाताच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या लावल्याच्या रागातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी पहिलवानाने पत्रकार थोरात आणि त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सोनू…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची साथ उत्तम मिळेल. वृषभ आज मनात प्रसन्नता राहील आणि विचार सकारात्मक बनतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. मिथुन आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे डोके शांत ठेवून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. या निर्णयामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला असून, पठारभागातील हजारो स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर भव्य औद्योगिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही अजिबात निराश न होता जगाला आशेची संजीवनी देणारे संत ज्ञानेश्वर माऊली हेच आजच्या युगातील युवकांचे खरे आदर्श असायला हवेत, असे प्रतिपादन कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मनःशांती व जीवनविकास’ या पाचव्या सलग व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात त्या बोलत होत्या. ‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांच्या रसाळ व ओघवत्या प्रवचनातून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असल्याचे सांगत, माणसाजवळ आर्थिक धनासोबत विचारांचे धन असेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जन आरोग्यम संचलित जाणीव फाउंडेशनच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार, दंडकारण्य अभियान पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात समाज रत्न पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात टीचर आयकॉन पुरस्कारांचा समावेश आहे. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने ‘संगमनेर २०२६ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर…
प्रवीण पुरो जेनझींच्या जंतरमंतरवर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचं कवित्व कमी होण्याचं नाव घेत नाहीये. या आंदोलनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अनन्वित अत्याचार आणि क्रूर कारवाई करूनही विद्यार्थ्यांनी राखलेल्या संयमाने हे आंदोलन यशस्वी पार पडलं. ‘राजीनामा आमच्या सरकारच्या कोषात नाही’, अशा मग्रुमीत असलेल्या मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे नाक घासावं लागलं आणि गैर वागणार्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. मंत्र्याच्या राजीनाम्याने सारं काही अलबेल, असं मानण्याचं कारण नाही; मात्र वाह्यात मंत्र्यांना ताळ्यावर आणण्याचा मार्ग शाबूत आहे, याची जाण सत्ताधार्यांना करून देण्याची आवश्यकता होती. या एका राजीनाम्याने सत्तेची घमेंड मोडलीच, पण केंद्रात आणि राज्याराज्यात सत्तेच्या नशेने बेफाम झालेल्यांनाही या आंदोलनाने जमिनीवर…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सौहार्द टिकून राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचे नियोजन विस्कटू शकते. नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा, नम्रता ठेवल्यास कामे सहज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवल्याने मन शांत होईल आणि नवा ताण दूर होईल. मिथुन – आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा ठरेल. नवीन योजनांवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | पंकज पडवळ संगमनेर शहरातील लॉ कॉलेजच्या पाठीमागील भागात असलेल्या घुलेवाडी परिसरातील एकता चौकात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अघोरी व तांत्रिक वस्तू टाकण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. हा परिसर उच्चशिक्षित नागरिक, व्यावसायिक आणि शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखला जातो. अशा सुशिक्षित भागातच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी एकता चौकात संशयास्पद वस्तूंचा खच पाहायला मिळतो. यापूर्वी अनेकदा येथे चपलांचे ढीग, शेंदूर लावलेले नारळ आणि कणकेचे पेटते दिवे आढळून आले आहेत. शनिवारी सकाळी या प्रकाराने अधिकच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगावातून पळवून आणलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची दरेवाडी येथून सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले / संगमनेर: कुंभेफळ येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या अंकुर प्रशांत कोटकर या तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. बालकाच्या आई, आजी, आजोबा आणि शेतातील कामगारांनी तातडीने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला आणि बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अंकुरवर प्रथम सुगाव येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पोपट कोटकर, बबन झोळेकर आणि वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी बालकाची विचारपूस केली. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सारोळे पठार शिवारात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकून ५ आरोपींना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, तीन मोटारसायकली आणि पाच मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सारोळे पठार गावाच्या शिवारात बबन मुरलीधर फटांगरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा हार-जितीचा जुगार खेळत आहेत. बातमीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह छापा टाकला असता, त्या ठिकाणी पैशांची पैज लावून जुगार खेळणारे…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आयुष्यात स्थैर्य आणि व्यावहारिक विचार घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी कष्टांचे कौतुक होऊन प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. अवाजवी खर्च टाळून आर्थिक नियोजन करणे हिताचे राहील. वृषभ – आज आत्मविश्वासात वाढ होऊन रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील, मात्र अतिआत्मविश्वास आणि आळस टाळणे आवश्यक आहे. मिथुन – मालमत्तेसंबंधीचे जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. कर्क – व्यावसायिक योजना पुढे नेण्यासाठी आजचा काळ अतिशय अनुकूल आहे. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास मोठा फायदा होईल. सिंह – मन प्रसन्न राहील आणि ठरवलेली सर्व कामे नियोजनानुसार सुरळीत पार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या पाच दिवसांत चोरीच्या तीन धाडसी घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी पानोडी येथील जाधव वस्तीवर भरदिवसा ‘गुरु माऊली’ किराणा दुकानात पाणी मागण्याच्या आणि ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओरबाडून नेले. पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पिंपरी लौकीच्या दिशेने दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरले. या संपूर्ण प्रकारात चोरट्यांच्या हिमतीपेक्षाही आश्वी पोलिसांच्या निष्काळजी आणि ढिम्म कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भरदिवसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ५ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडवरील लवणवाडी पाटीजवळ कच्च्या रस्त्याच्या आडोशाला अंधारात थांबलेल्या या संशयितांना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, यामध्ये दोन काळया रंगाच्या आलिशान विनाक्रमांक कार (हुंदाई क्रेटा आणि टाटा हॅरियर), २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे, ६ मोबाईल, लोखंडी टॉमी आणि मिरची पूड अशा मुद्देमालाचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी, दलित व श्रमिकांचे खंदे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्र सेवा दल आणि साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीला आणि सामाजिक भानाला चालना देणारी ही स्पर्धा बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला (मालपाणी हेल्थ क्लबजवळ), तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता ३ री ते ४ थी, ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी, ९ वी ते १० वी, ११ वी ते १२…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण आघात केला आहे. नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या मदतीसाठी आलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा विद्युत तारेचा तीव्र धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धांदरफळ बुद्रुक येथे मंगळवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे धांदरफळ आणि प्रवरानगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. ललिता सुनील थेटे (वय ६०, रा. भगवतीपूर, प्रवरानगर) असे या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे. धांदरफळ बुद्रुक येथील तोरकडी कुटुंबातील नातेवाईकाच्या दशक्रिया विधीनिमित्त त्या तीन-चार दिवसांपूर्वीच मदतीसाठी आल्या होत्या. बुधवारी पार पडणाऱ्या विधीच्या आदल्या दिवशी सर्व पाहुणे-रावळे एकत्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिशिंगणापूर परिसरातील हॉटेल ब्लू ऑरगॅनिक रसवंती सेंटरजवळ रचलेला सापळा यशस्वी ठरवत, ५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह एका आरोपीस अटक केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक २० ऑगस्ट रोजी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने धडक कारवाई करत अनिल सिताराम सावंत (वय ३०, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे…
