Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण केली जात असून, भविष्यात स्थानिक तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या सुमारे एक कोटी रुपये निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या कामाचा आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह कपिल पवार, प्रमोद राहाणे, जनार्दन आहेर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विखे म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने…
एखाद्या संस्थेला किती महत्व द्यायचं याचं मापदंड नसल्याने बिनकामाच्या संस्थांचं महत्व कमालीचं वाढतं. पात्रता नसताना महत्व मिळाल्याने या संस्थांना आभाळ ठेंगणं होतं. आणि या संस्था देशाची इभ्रत रस्त्यावर घालवायला मोकळ्या होतात. सत्ताधार्यांनी मोठ्या गाजावाजाने प्रोजेक्ट केलेल्या गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीचं असंच काहीसं सुरू आहे. इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांना बदनाम करणं, त्या संघटनांविरोधी निदर्शनं करणं, त्यांच्यावर दगडं फेकणं असल्या राजकारणासाठी ज्यांचा वापर खुबीन केला जातो, अशा काही मोजक्या संस्थांमध्ये गलगोटीया युनिव्हर्सिटीचा अंतर्भाव होतो. विरोधकांना जो कोणी धडा शिकवेल त्यांच्यासाठी हिरवा गालीचा अंतरण्याचे उद्योग सत्ताधार्यांनी 2014 पासूनच सुरू केले आहेत. याची फळं गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीने नुकतीच देशवासीयांना चाखवली. हा केवळ राजकीय खेळ नाही. युनिव्हर्सिटी…
दैनिक राशीभविष्य: १ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल. प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, तर व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही वचन देताना विचारपूर्वक द्या. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यातील चिंता कमी होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन गुंतवणुकीचे विचार मनात असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला आज वाव मिळेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. कामाच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – सत्ता आणि पद हे केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ते जनसेवेचे एक पवित्र माध्यम आहे, हाच विचार घेऊन संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी त्यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून उद्या येत्या १ मार्चपासून ते प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. निवडून आल्यानंतर अनेकदा लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संपर्क कमी होतो, अशी तक्रार नागरिकांमध्ये असते. मात्र, योगेश जाजू यांनी याला छेद दिला आहे. मी तुमच्या मताने निवडून आलो असलो, तरी खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे,…
संगमनेर, प्रतिनिधी – शहर परिसरात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३२ किलो ८४५ ग्रॅम गांजा जप्त करून खळबळ उडवून देणाऱ्या पोलीस कारवाईला आता कायदेशीर प्रक्रियेत एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या परवेझ दाऊद शेख याला संगमनेरच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ११ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री संगमनेर शहर पोलिसांनी ‘गोल्डन सिटी’ परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोठी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या मोठ्या साठ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act)…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात रविवारी (१ मार्च) राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या दौऱ्यात चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच हिवरगाव पावसा येथील निळवंडे प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्यावरील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या सी.आर. एस्केप कामाचे लोकार्पण होणार असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यान बसवण्यात आलेल्या नव्या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.…
प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सरपंच कल्पना मैड, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत,…
संगमनेर, प्रतिनिधी – मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती असल्याचे सांगत, तिच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक व कवींना सोबत घेऊन आपण एक ‘संगमनेर पॅटर्न’ तयार करू, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात संगमनेरमधील नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी काव्यसंमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र…
संगमनेर, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे. समितीच्या या नूतन कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्षल जेधे आणि विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, किरण वर्पे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. समितीच्या कामात गती आणण्यासाठी…
आजचे राशीभविष्य: शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तूची खरेदी करण्याचे बेत आखाल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. व्यवसायात सावधानता…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचा हमीभाव, बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आपली भूमिका मांडली. शेती क्षेत्राबद्दल बोलताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारने ‘एआय फॉर ॲग्री’ सारख्या उपक्रमांतून तंत्रज्ञानावर भर दिला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधे आणि पाण्याचा वापर ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादन खर्च घटेल. मात्र, तंत्रज्ञानापेक्षाही शेतकऱ्यांसाठी ‘हमीभाव’ हा अधिक महत्त्वाचा विषय आहे. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि शासकीय विभागांमधील अनागोंदी कारभारावरून आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी विशेषतः अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. संगमनेर तालुक्यातील सामान्य जनता, शेतकरी आणि रुग्णांच्या हितासाठी त्यांनी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, हा विभाग थेट गोरगरीब आणि कष्टकऱ्यांशी जोडलेला असतानाही तिथे अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे. अनेक अन्न योजना स्थगित किंवा मर्यादित केल्यामुळे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून, गरजू…
अहिल्यानगर: सोशल मीडियावर सध्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हे पत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. या पत्रकाद्वारे असा दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्या मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत दिली जाईल. या अफवेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने यासंदर्भात महिला व बाल विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागाकडून अधिकृत माहिती घेतली असता, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे…
पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ग्राफिक डिझायनर असलेला मुख्य सूत्रधार जेरबंद
कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत. मालेगाव: येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव परिमंडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २०० बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची सुरुवात २३ जानेवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेत एका फायनान्स कंपनीचे…
आजचे राशिभविष्य मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करतील. व्यापारात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जीवनसाथीसोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करावा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आज धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य आहे, पण बाहेरचे अन्न खाणे टाळावे. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. घाईघाईत…
संगमनेर: अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’च्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला ‘लॉग मार्च’ आता अत्यंत आक्रमक वळणावर पोहोचला असून, अहिल्यानगर लांब आहे, आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे. गुरुवारी हा मोर्चा संगमनेर येथून निझर्णेश्वरच्या दिशेने रवाना झाला असून, शुक्रवारी (दि. २७) मागण्या मान्य होईपर्यंत थेट पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर (वाडा) मुक्काम ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे एकेकाळी पुणतांब्यातून ऐतिहासिक शेतकरी संप सुरू झाला होता, त्याच धर्तीवर आता आहार कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप लोणीतूनच सुरू केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेल्वेचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ऐतिहासिक फेरबदल करण्यात आले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणे निश्चित मानले जात होते. वरळी डोम येथील सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आणि हात उंचावून पाठिंबा दर्शवला. या निवडीनंतर प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना एका खऱ्या सेनापतीची उपमा दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरच्या तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. समजलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे लाचेच्या मागणीवर ठाम होता. अखेर कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४…
संगमनेर, प्रतिनिधी – प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार स्वीकारताच संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या सुमारे १५०० दाखल्यांचे विशेष मोहीम राबवून तातडीने वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातून आणि बाहेरगावावरून येणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे धोरण आखले आहे. प्रशासकीय काळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल, मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण संवादात स्पष्टता ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, परंतु सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे. मुलांच्या प्रगतीमुळे…
