Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याच्या सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अत्यंत अतिसंवेदनशील आणि चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी महायुतीचा गड उद्ध्वस्त करत मोठा विजय मिळवला आहे. राजकीय प्रतिष्ठा आणि सत्तेचा प्रचंड जोर पणाला लागलेल्या या महासंग्रामात विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत गोकुळवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर राज्यातील सत्तेची नशा दाखवणाऱ्या महायुती प्रणित राजर्षी शाहू विकास आघाडीला अवघ्या ९ जागांवरच समाधान मानावे लागले असून, या निकालामुळे महायुतीचे कोल्हापुरात पानिपत झाले आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील या सर्वात मोठ्या निवडणुकीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्त्री शक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि मुलींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी श्रीरामपूर पोलीस विभागाने एक अनोखा व कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. गेल्या दोन वर्षांत छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तक्रार नोंदवणाऱ्या तब्बल एक हजार महिलांशी पोलिसांनी थेट फोनवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली आहे. या थेट संवादामुळे ९३ टक्क्यांहून अधिक महिला तक्रारदारांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. तर महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. श्रीरामपूर पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजुर, घारगाव, आश्वी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, लोणी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने शनिवारी (दि. १७) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चणेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतरोही तरुणाचा पत्ता लागलेला नसून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चणेगाव बंधाऱ्यावरून प्रवास करणाऱ्या काही ग्रामस्थांना एका व्यक्तीने पाण्यात उडी मारल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे एक दुचाकी आणि जवळच एक मोबाईल फोन पडून असल्याचे निदर्शनास आले. त्या गाडी आणि मोबाईलच्या आधारे सदर व्यक्ती सतीश आप्पासाहेब वाणी असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वाणी कुटुंबियांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मयुरी सुनील मखरे असे या दुर्दैवी आत्मघात केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा शहर परिसर तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी मखरे ही श्रीगोंदा शहरातील कन्या विद्यालय परिसरात एका अभ्यासिकेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि पोलीस भरतीची सातत्याने तयारी करत होती. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी राहत्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली. हा संपूर्ण प्रकार खोलीमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवून उपचारासाठी डॉ.…
आजचे राशिभविष्य- मेष – आज करिअरमध्ये प्रगती करण्याची उत्तम वेळ असून व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. संतानाच्या यशाने मन आनंदी राहील आणि पैशांची आवक वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहील, परंतु आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. वृषभ – आजचा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. पोटाशी संबंधित काही किरकोळ त्रास संभवतो, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. मिथुन – अनेक दिवसांपासून रखडलेली किंवा प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होती. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे योग असून प्रेम जीवन अतिशय आनंददायी राहील. वैवाहिक आयुष्यात थोडा ताणतणाव जाणवू शकतो, संयम ठेवावा. कर्क – जमीन-जुमले, बँकिंग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध कत्तलखान्यांवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये ४०० किलो गोमांस आणि तब्बल ४० जिवंत लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तैनात करण्यात आली होती. यादरम्यान तोफखाना आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची कत्तल व गोमांस विक्री…
प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला, की त्या संस्थेची आणि संस्थेच्या प्रमुखाची सखोल चौकशी करण्याची तरतूद कायद्याने करून ठेवलेली आहे. तक्रारी होतील असा कारभार घटनात्मक संस्थांनी करू नये, म्हणून संविधानाने खटले दाखल करून संबंधितांना शिक्षेचीही तरतूद करून ठेवली आहे. अशा संस्थेत मनमानी कारभार झाला, तर न्यायालयीन कारवाई ही संविधानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतूनच घेतलेले निर्णय मागे घेण्याची वा रद्द होण्याची आफत येते. ज्याने हे केले त्याच्याविरोधात फौजदारी खटलाही दाखल होऊ शकतो. किंबहुना पदावरून हटवण्याची घटनात्मक प्रक्रियाही राबवली जाऊ शकते. यापूर्वी न्या. व्ही. रामास्वामी यांच्याविरोधात १९९३ मध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपावरून महाभियोग चालवला…
मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामाऱ्या येऊ शकतात. मिथुन – भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल. कर्क – जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका. सिंह – प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन…
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. आज शनिवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला असून वाहनासह एकूण ११ लाख ८६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी वाहनाने अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, संजय माधव भागवत हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग मिळणार आहे. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा २०२६-२७ अंतर्गत संगमनेर बसस्थानक ते प्रवरा नदीवरील पूल या रस्त्याच्या नागरी सुविधांसह सर्वांगीण विकासासाठी १० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शहरवासीयांचा वाहतूक कोंडीचा आणि खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे. संगमनेर शहरातील बसस्थानक बांधकाम विभाग कॉर्नरपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली नाका आणि तीन बत्ती चौक मार्गे प्रवरा नदीच्या पुलापर्यंत जाणारा हा रस्ता शहराचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमाच्या व वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या रक्तरंजित आणि हाणामारीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धांदरफळ बुद्रुक गावातील बाजारतळावरील दांडियाच्या मंडपाजवळ घडली. नवनाथ भास्करराव देशमाने (वय ४१, रा. देशमाने मळा, धांदरफळ बु., ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रशांत बाळासाहेब कोल्हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे वीज बिल भरले नाही म्हणून रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद केल्याच्या कारणावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, दमदाटी करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गंभीर खटल्यात संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. पुराव्यांच्या अभावी आणि कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने सचिन बादशाह भोर, शिवनाथ रामभाऊ जगताप, विजय भाऊसाहेब चौधरी, गणपत शिवराम भोर आणि बादशाह भिका भोर या सर्व पाचही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, १ मार्च २०१८ रोजी सकाळी अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील मुळा नदीलगतच्या रोहित्र परिसरात महावितरणचे साहाय्यक अभियंता विठ्ठल परशराम हारक व त्यांचे इतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही म्हणून तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागायची आणि तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडणार असेल, तर सामान्य जनतेने न्यायासाठी नेमके कोणाकडे जावे? प्रशासनाची निर्मिती जनतेची सेवा करण्यासाठी झाली आहे की सामान्य माणसाला कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावण्यासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित करत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी तालुक्यातील गलथान आणि गैरजबाबदार प्रशासकीय कारभाराविरोधात ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ अभियान राबविण्याचा आक्रमक इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होण्याऐवजी केवळ कागदोपत्री माहिती, अहवाल आणि आश्वासनांचा खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे योग्य कौतुक होईल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस तुम्हाला घर, कुटुंब आणि आर्थिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहे. करिअरच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक आणि फायदेशीर राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून राज्य महामार्ग क्र. ७१ वरील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृतकाल रस्ते विकास आराखड्यांतर्गत एकत्रित तरतुदीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर बसस्थानक, पीडब्ल्यूडी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे दिल्ली नाकामार्गे प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा या प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या सुधारणेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना या निधी मंजुरीमुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या कामामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर) भव्य दसरा सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. शहराची तब्बल शंभर वर्षांची सीमोल्लंघनाची परंपरा जपत यंदाचा उत्सव अत्यंत दणक्यात साजरा केला जाणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, मनमोहक सजावट, भव्य पौराणिक देखावे, समूह नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि लक्षवेधी रावणदहन हे यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. विशेष म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करतानाच निसर्गाचे रक्षण व्हावे, या हेतूने उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मालपाणी फार्मतर्फे मोफत वृक्षभेट दिली जाणार आहे. दसरा म्हणजे विजय, मांगल्य आणि नव्या सकारात्मक संकल्पांचा उत्सव मानला जातो. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची परंपरा ही केवळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगाची हवा खाणाऱ्या आरोपीची न्यायालयाने अखेर निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर येथील जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय अ. देशपांडे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, बचाव पक्षाचे वकील अॅड. जे. एच. वामन यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि पुराव्यांमधील त्रुटी या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरल्या. संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेला ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन), ३७६(३) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर पडलेले आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मित्र तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. सुरुवातीला एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेला हा संपर्क व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत पोहोचला. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सवर एकमेकांना पाहताना नावे सांगून ओळख पटवावी लागली, मात्र या अनोख्या भेटीने प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले आणि मित्रभेटीची तीव्र ओढ निर्माण झाली. या भावूक ओढीतूनच ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉटेल वसंतसुत, भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी दोन दिवसीय भव्य गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात रंधा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील, या विश्वासाने शिवसेना-महायुतीचे आशिष कानवडे व भागवत कानवडे यांच्या पुढाकाराने गावातील असंख्य नागरिक व महिलांनी हा प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे, पूजा धराडे, राजू धराडे, निवृत्ती धराडे, अंकुश दिघे, रामनाथ भोजने, संतोष धराडे, संतोष दिघे, नामदेव धराडे, सखाराम दिघे, अमित कोरडे, रामा भुतंबरे, दीपक धराडे, गणेश धराडे, संजय धराडे, जालिंदर धराडे, अर्जुन धराडे, सागर धराडे, सखुबाई धराडे, संगीता दिघे, संगीता कोरडे, चंद्रभागा कोरडे, नेहाबाई धराडे, मंगला कोरडे, हिराबाई दिघे, मंदाबाई कोरडे, सोनाबाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव याची १० महिन्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून, अद्याप डीएनए अहवाल न मिळाल्याचा युक्तिवाद बचावासाठी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरला. घटनेची पार्श्वभूमी अशी, डिसेंबर २०२५ मध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील आंबी खालसा परिसरात मुळा नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि वेगाने तपास करत या प्रकरणी डिसेंबर २०२५ मध्ये तीन संशयित आरोपींना…
