Author: Annant Ppangarkar
संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास डिग्रस ते ठाकरवाडी रोडवरील मेंगाळवस्ती येथे घडली. या कारवाईत दोन डंपर आणि वाळू असा एकूण २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जबाजी कर्डीले यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवळ संगमनेर शहरातच नव्हे तर संगमनेर तालुक्यात येथील यामुळे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरला अवैध धंद्यांनी पोखरले आहे. यातून गुन्हेगारी…
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली हानी सारा महाराष्ट्र आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या मागे विश्वासू राजकीय वारस नसेल तर त्या राजकीय पक्षाचं कसं होतं याचं उदाहरण म्हणजे दादांच्या पक्षाची होत असलेली वाताहत होय. दादांच्या जाण्याने निर्माण झालेला त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक गहिरा बनला आहे. दादा निर्णय घेताना जणू आपल्याच कानात पुटपुटायचे, ते आपल्याशी बोलायचे, ते आपले सल्ले घ्यायचे, अशी दावेदारी सध्या सुरू आहे. जो तो स्वार्थी पध्दतशीर आपली पोळी भाजून घेत आहे. ज्यांनी दादांना मदत केली त्यांना दावे करण्याचा जरूर अधिकार आहे. पण त्यांनी दादांना धमकावलं, त्यांच्या राजकारणाचा बट्टयाबोळ केला…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात व्यवसायात होऊ शकतो. मिथुन: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. सर्जनशील कामात रस वाढेल आणि मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. कामात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर…
संगमनेर, प्रतिनिधी – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण शक्यता निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याची पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात विशेष नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालकावर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घुलेवाडी परिसरातील ‘अमृता लॉन्स’ येथे नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी ‘जनता बँड’ मालकीचा डीजे संच कोणताही अधिकृत परवाना नसताना अत्यंत मोठ्या आवाजात वाजवला जात असल्याचे निदर्शनास आले. या…
संगमनेर/श्रीरामपूर: राज्यात नवीन फौजदारी कायदा ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, उत्तर नगर जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ सदृश कारवाईचा धडाका लावला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्याय संहितेचे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे केवळ ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावे लागणार असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती श्रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना,…
संगमनेर, प्रतिनिधी – टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात…
महाराष्ट्रातील प्रगतशील आणि सर्वांगीण विकसित तालुक्यांचा विचार केला, तर आज बारामतीपाठोपाठ संगमनेर तालुक्याचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतले जाते. संगमनेरची ही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती एका दिवसात झालेली नसून, त्यामागे १९८५ पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक परिश्रम आणि अविश्रांत कष्ट आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने संगमनेरचा कायापालट केला आहे, म्हणूनच त्यांना या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांचा आणि संघर्षाचा वारसा घेऊन बाळासाहेबांनी राजकारणात प्रवेश केला. एका दुष्काळी तालुक्याला सधन बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्याची सुरुवात १९८९ मध्ये…
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत काही चांगले व्यवहार होण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा, अन्यथा लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग असून त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या…
संगमनेर: संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे. ६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळा आणणाऱ्या आणि कामे जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरणारे काम आणि दर्जाहीन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ठेकेदारांनी कामांची मक्तेदारी निर्माण करून अनेक कामे हाती घेतली आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यास सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदलीचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होत्या, त्याला आता खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला आहे. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची साईमंदिर सुरक्षा कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे सोनई पोलीस…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तुत्वाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास घरात आनंदी वातावरण राहील. मिथुन: आज बोलण्यावर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांतीसाठी काढा. अचानक धनलाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. कर्क: आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब दादा आव्हाड (वय ६३ वर्ष, रा. निळवंडे, ता. संगमनेर) हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बाहेर गेले होते. दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेल्या बॅगेतून २३,००० रुपये रोख रक्कम आणि १६,५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम…
श्रीरामपूर, महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरात विनापरवाना आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली भागात राहणारी झैनब जाफर इराणी (वय २४) ही महिला कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय नायट्रोझेपम या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करत असताना रंगेहात पकडली गेली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वार्ड नं १ मधील इराणी गल्लीत एक महिला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला असून, आगामी काळात त्याला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन परिसराचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. वेल्हाळे येथे आयोजित हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जत्रेचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी देवस्थानच्या विकासकामांचा आढावा मांडला. ते म्हणाले की, यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि वसुलीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आता बाहेरील ठेकेदारांऐवजी पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाद्वारे बाजार कर संकलित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. दीपक साळुंके म्हणाले की, दैनंदिन बाजार कराची पावती फाडण्यासाठी सध्या खासगी ठेकेदारांची नेमणूक केली जाते. यामुळे अनेकदा ठेकेदारांकडून होणारा हस्तक्षेप वाढतो आणि महसुलाची गळती होण्याची शक्यता असते. जर नगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरून ही वसुली केली, तर जमा होणारा संपूर्ण महसूल थेट पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि वसुली प्रक्रियेत शिस्त येईल. शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर बोलताना साळुंके यांनी सर्व विक्रेत्यांची कायदेशीर नोंदणी करून…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर आपण यापुर्वी गांभीर्याने विधानसभेत आवाज उठवल्यामुळेच वसाहतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.काम टप्प्यात आले की श्रेय घेण्याची धडपड काहींची सुरू होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेली ३ अधिकारी निवासस्थाने व ६५ पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ही निवासस्थाने सन १९५९–१९६० व १९६८ या कालखंडातील असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पी.आर.बी. रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे. पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरणे, शौचालयांचे चेंबर व गटारी नादुरुस्त असणे अशा गंभीर समस्या असून, सार्वजनिक…
दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे आज थोडा गोंधळ उडू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, पण घाईघाईने कोणताही करार करू नका. कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भावूक असेल.…
