Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत काही चांगले व्यवहार होण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा, अन्यथा लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग असून त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या…

Read More

संगमनेर: संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे. ६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळा आणणाऱ्या आणि कामे जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. जनतेला वेठीस धरणारे काम आणि दर्जाहीन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ठेकेदारांनी कामांची मक्तेदारी निर्माण करून अनेक कामे हाती घेतली आहेत, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यास सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदलीचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होत्या, त्याला आता खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला आहे. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची साईमंदिर सुरक्षा कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे सोनई पोलीस…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तुत्वाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास घरात आनंदी वातावरण राहील. मिथुन: आज बोलण्यावर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांतीसाठी काढा. अचानक धनलाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. कर्क: आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब दादा आव्हाड (वय ६३ वर्ष, रा. निळवंडे, ता. संगमनेर) हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बाहेर गेले होते. दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेल्या बॅगेतून २३,००० रुपये रोख रक्कम आणि १६,५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम…

Read More

श्रीरामपूर, महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरात विनापरवाना आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली भागात राहणारी झैनब जाफर इराणी (वय २४) ही महिला कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय नायट्रोझेपम या गुंगीकारक गोळ्यांची विक्री करत असताना रंगेहात पकडली गेली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वार्ड नं १ मधील इराणी गल्लीत एक महिला नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या हरीबाबा मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या देवस्थानला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला असून, आगामी काळात त्याला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊन परिसराचा कायापालट करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. वेल्हाळे येथे आयोजित हरीबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जत्रेचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी देवस्थानच्या विकासकामांचा आढावा मांडला. ते म्हणाले की, यापूर्वीच मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि वसुलीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आता बाहेरील ठेकेदारांऐवजी पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाद्वारे बाजार कर संकलित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. दीपक साळुंके म्हणाले की, दैनंदिन बाजार कराची पावती फाडण्यासाठी सध्या खासगी ठेकेदारांची नेमणूक केली जाते. यामुळे अनेकदा ठेकेदारांकडून होणारा हस्तक्षेप वाढतो आणि महसुलाची गळती होण्याची शक्यता असते. जर नगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरून ही वसुली केली, तर जमा होणारा संपूर्ण महसूल थेट पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि वसुली प्रक्रियेत शिस्त येईल. शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर बोलताना साळुंके यांनी सर्व विक्रेत्यांची कायदेशीर नोंदणी करून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर आपण यापुर्वी गांभीर्याने विधानसभेत आवाज उठवल्यामुळेच वसाहतीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.काम टप्प्यात आले की श्रेय घेण्याची धडपड काहींची सुरू होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेली ३ अधिकारी निवासस्थाने व ६५ पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ही निवासस्थाने सन १९५९–१९६० व १९६८ या कालखंडातील असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पी.आर.बी. रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे. पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरणे, शौचालयांचे चेंबर व गटारी नादुरुस्त असणे अशा गंभीर समस्या असून, सार्वजनिक…

Read More

दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे आज थोडा गोंधळ उडू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, पण घाईघाईने कोणताही करार करू नका. कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भावूक असेल.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याचे भूषण आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने रविवारी, (८ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. त्यांच्या या समर्पित जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण तालुका सरसावला आहे. हा सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा येत्या बुधवारी, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर येथील बी.एस.टी. कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी आमदार डॉ. सुधीर तांबे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर आणि छात्र…

Read More

अकोले, प्रतिनिधी – लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी प्रसंगी सरकार नसले तरी चालेल, परंतु मुक्त पत्रकारिता असणे ही काळाची नितांत गरज आहे. ज्या समाजात मुक्त पत्रकारिता नसते, तो समाज आंधळा ठरतो, असे परखड प्रतिपादन ‘न्यूज १८ मराठी’चे वृत्त संपादक विलास बढे यांनी केले. अकोले तालुका पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहत्रे आणि श्रीनिवास रेणूकादास यांच्यासह अन्य…

Read More

मुंबई, प्रतिनिधी –  राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या वसाहतीच्या निर्मितीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात आमदार तांबे यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी (IPS) यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यामुळे संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, शहरात आधुनिक आणि सुसज्ज पोलीस वसाहतीची निर्मिती होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस वसाहतीच्या कामाला गती देण्याबाबत आग्रही मागणी केली. संगमनेरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उत्तम दर्जाची निवासस्थाने मिळावीत, यासाठी या वसाहतीचा आराखडा अत्यंत…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित येणी वसूल होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करावा. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीच्या कामांमुळे थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांनी कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्र-मैत्रिणींसोबत मजेत जाईल. मिथुन: बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल असून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल.…

Read More

शिर्डी: तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण कामगाराने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर असून त्याचे वय अंदाजे २२ वर्षे होते. विशाल हा मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता आणि सध्या राहता तालुक्यातील गणेश नगर येथे वास्तव्यास होता. तो गेल्या काही काळापासून शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून सेवा बजावत होता. सोमवारी दुपारच्या सुमारास…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि परिसरात अनेक घरफोड्या व जबरी चोऱ्या करणाऱ्या कलीम-अलीम टोळीचा संगमनेर शहर तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात दिनांक १ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री २३:०० वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे ०२:३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या टोळीला रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे हे शासकीय वाहनाने रात्रगस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोल्हेवाडी रोड लगत काही इसम मोटारसायकलवर अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या साहित्यासह फिरत आहेत. बातमी मिळताच पोलिसांनी पंचांना बोलावून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – चंदनापुरी (संगमनेर) येथील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीच्या पादुका आणि एका भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या पादुकांसह, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की, २९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ च्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चंदनापुरी येथील साईबाबा मंदिराचे कडी-कोयंडा उघडून पालखीतील चांदीच्या पादुका चोरून नेल्या होत्या. तसेच परिसरात झोपलेले साक्षीदार संजय गाडेकर यांचा मोबाईलही लंपास केला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा…

Read More