Author: Annant Ppangarkar
आजचे राशीभविष्य: सोमवार, १६ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. नातेवाईकांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा, जेणेकरून मतभेद टाळता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल,…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – संगमनेरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवकांचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी प्रस्तावित नर्सिंग कॉलेजला तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती करत हे महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आरोग्य व्यवस्थेला हक्काचे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मांडला. मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, औषधांचा अपुरा साठा आणि डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांमुळे सर्वसामान्यांना उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संगमनेरचा विस्तार पाहता स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारांसाठी…
मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजवले असून, यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामतीचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. आयोगाच्या या घोषणेमुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३० मार्च २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली असून, ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील साकूर शिवारात एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी घडली आहे. पाराजी धोंडीबा देवगिरे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण साकूर आणि देवगिरे वस्ती परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाराजी देवगिरे हे साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते. त्यांची बोराटे वस्ती परिसरात शेती असून तिथे त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी अलीकडेच नवीन शेततळे उभारले होते. रविवारी (१५ मार्च) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते शेतीच्या कामासाठी या शेततळ्यावर गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेवटी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ अवघ्या काही दिवसांतच आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दलाने तातडीने हस्तक्षेप करत एका विद्यार्थिनीची छेडछाड रोखली, तर दुसऱ्या घटनेत मंगळसूत्र चोरांना जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या दलाच्या कामगिरीमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेने हे विशेष सुरक्षा रक्षक दल कार्यान्वित केले आहे. शुक्रवारी (१३ मार्च) हे दल अकोले बायपास परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेत व्यस्त असताना, एसटी बसस्थानक परिसरात काही…
संगमनेर, प्रतिनिधी- रोटरी क्लब संगमनेर आणि दीपक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत “रंग बरसे रंगोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दि. ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनी रंग खेळत आनंद वाटण्याचा अनोखा आणि भावनिक क्षण अनुभवला. रंगांच्या उधळणीत विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान पवनकुमार वर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या ताज्या सफरचंदांसह विविध फळाहाराचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटेरियन दीपकजी मणियार (दीपक इंडस्ट्रीज) यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी…
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील चौकशीच्या अहवालांनी आता राज्यातल्या जनतेची मतीच गुंग होऊ लागली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एकीकडे अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल मौन साधून तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रोहित पवारांना खोटं पाडण्याकरता कामाला लागले आहेत. रोहित पवार यांनी पुराव्यानिशी व्यक्त केलेल्या संशयाने अपघाताची जागा घातपाताने केव्हाच घेतली आहे. पण तो घातपात नाही, असं म्हणणारे ना स्वत:हून याचा खुलासा करत ना त्यांच्या यंत्रणेकरवी तपास करत. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताची अशी स्थिती होणं हे अजिबात स्वीकारार्ह…
दैनिक राशिभविष्य: १५ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, तरीही आहारावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन ओळख निर्माण होईल, परंतु घाईघाईने कोणतेही वचन देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे कल राहील. जोडीदाराशी संवाद साधताना संयम…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराचा १४३ जणांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली. धावपळीची जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि असंतुलित आहार यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्वतंत्र विभाग करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडले. एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त…
अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त ७३ पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा १५ मार्च २०२६ रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत होणार होती, मात्र आता ती त्याच दिवशी म्हणजे रविवारी दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ही लेखी परीक्षा ‘न्यू कॉमर्स बिल्डिंग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल गेट, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर’ या केंद्रावर पार पडणार आहे. परीक्षेच्या बदललेल्या वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षेच्या दोन तास आधी म्हणजेच दुपारी २.०० वाजेपर्यंत…
अहिल्यानगर: न्यायालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे अल्पावधीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सामंजस्याने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित पक्षकार आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-३…
संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी उडी घेणारे आणि आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा व मनाचा सच्चेपणा जपणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाज विकासासाठी झटणारे एक ‘कृतीशील संत’ होते, असे गौरवपूर्ण उद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या…
मुंबई: राज्यातील बळजबरीने, आमिष दाखवून आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना कायमचा लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ सादर केले असून, यामुळे बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील १० वे राज्य ठरणार आहे. राज्यात गेल्या काही काळात प्रलोभने आणि फसवणुकीतून धर्मांतर केल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा मुद्दा सरकारने अधोरेखित केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या दोषी व्यक्तीने पुन्हा असाच अपराध केला,…
आजचे सविस्तर राशिभविष्य: शनिवार, १४ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा प्रभाव पडेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ योग्य आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस फलदायी ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी असलेले मतभेद मिटतील आणि घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. संध्याकाळचा वेळ मित्रपरिवारासोबत आनंदात जाईल. मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. मनातील द्विधा अवस्थेमुळे…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातून बेपत्ता असलेल्या वृद्ध पित्याचा त्यांच्याच मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चाणाक्षपणे तपास करत या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे यानेच मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले कनेक्शन या मुद्द्यांवरून आक्रमक होत युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण विभागाच्या कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यभरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवेळी आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसारख्या अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने…
संगमनेर, प्रतिनिधी- मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार आवाज उठवला. संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची गरज याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार खताळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये पोलीस निवासस्थानांच्या दुरवस्थेचा प्रश्न अत्यंत कळीचा ठरला. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीही हा प्रश्न शासनासमोर मांडूनही अद्याप ठोस आर्थिक तरतूद न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…
आजचे सविस्तर राशिभविष्य: शुक्रवार, १३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल आहे, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवल्यास कठीण प्रसंगातून मार्ग काढणे सोपे जाईल. अनावश्यक…
संगमनेर, प्रतिनिधी – सध्या समाजामध्ये वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून शनिवारी (दिनांक १४ मार्च) एकविरा फाउंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी आणि एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली असून जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – देशात सध्या निर्माण झालेली भीषण गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारवर कडक टीका करत तातडीने दरवाढ कमी करण्याची मागणी केली. संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू…
