Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज- जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. केवळ पिंजरे लावून किंवा गस्त घालून बिबट्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याने, वन विभागाने पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांच्या सहकार्याने ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेली ही यंत्रणा आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही यंत्रणा गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन काम करते. यामध्ये प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ आणि ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’चा वापर करण्यात आला आहे. अनेकदा शेतातील सामान्य सेन्सर वाऱ्यामुळे हलणारी…
मेष- उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. वृषभ- आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असून कुटुंबासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. मिथुन- नोकरीत सकारात्मक बदलाचे संकेत असून मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि प्रवासाचे योग येतील. बोलण्यावर संयम ठेवा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. कर्क- तुम्हाला उद्या मानसिक शांतता लाभेल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामाचा…
संगमनेर | अनंत पांगारकर राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक गोंधळात सापडले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून संगमनेरने अनेक बाबतीत विकासाची मोठी भरारी घेतली आहे. एकीकडे शांत आणि संयमी असे थोरात-तांबे यांचे नेतृत्व राज्यभरात ओळखले जाते. या अनुषंगाने संगमनेरने शांत आणि सुसंस्कृत शहराचे स्वतंत्र असे अस्तित्व राज्याच्या पटलावर…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि नवीन प्रकल्पांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. आर्थिक आवक चांगली असली तरी संध्याकाळपर्यंत अनपेक्षित खर्च वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडे जागरूक राहा, विशेषतः डोकेदुखीचा त्रास संभवतो. कौटुंबिक जीवनात भावंडांशी असलेले जुने वाद मिटल्याने घरात आनंदी वातावरण राहील. वृषभ – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने कठीण कामेही वेळेत पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक केली असल्यास आज मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, बाहेरचे अन्न खाणे टाळावे कारण पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. जोडीदारासोबत धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. मिथुन -…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये सोमवारी रात्री एका नगरसेवकासह १७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा नवनिर्वाचित नगरसेवकाकडून अशाच घटनेची पुनरावृत्ती आज (मंगळवारी) पुन्हा झाल्याचा नवीन प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. मिरवणुकीतील गुलाल धुऊन काढण्यासाठी व कचरा काढण्यासाठी फिर्यादीने नगरपालिकेचे वाहन बोलावले या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिला आणि साक्षीदारांना नवनिर्वाचित नगरसेविकेसह काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सात आरोपींसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशोदा राजेंद्र अभंग (वय…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच भारतनगर भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.नवनिर्वाचित विजयी सदस्य नूर महंमद शेख यांची मिरवणूक सुरू असताना एका कुटुंबावर लोखंडी रॉड, चॉपर आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या खळबळजनक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी रिक्षा चालक मुजीब शमशुद्दीन शेख (वय ४०, रा. भारतनगर, संगमनेर) हे आपल्या घरी असताना, यावेळी नवनिर्वाचित विजयी उमेदवार नूर महंमद शेख यांची मिरवणूक या भागातून जात होती. मिरवणूक फिर्यादींच्या घरासमोर आली असता, आरोपींनी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- शहरातील मदिनानगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली असून, तब्बल ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जनावरे, मांस आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मदिनानगरमधील गल्ली क्रमांक चारमध्ये काही इसमांनी गोवंश जनावरे आणि वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, बारवकर यांनी तातडीने पोलीस पथकासह रविवारी रात्री…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा झेनॉन पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आश्वी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक संशयास्पद टाटा कंपनीची पिकअप गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता ऋषिकेश…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – आज तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्क – मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सिंह – तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. कठीण कामे सहज पूर्ण होतील.…
