Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निळवंडे धरण आणि त्याचे डावे व उजवे कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले आहेत. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच मोठा संघर्ष केला असून, या धरणातील ६० टक्के पाणी हे संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशन काळामध्ये ११ तास वीज मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. या हक्कासाठी गरज पडल्यास कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी आणि नागरिकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर/संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि क्रूर कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील तीन सराईत आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’च्या कलम १११ अन्वये संघटित गुन्हेगारी अंतर्गत वाढीव कलम लावून कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोलिसांच्या या कठोर पावलामुळे संगमनेर व परिसरात गो-तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर येथील गल्ली नंबर ६, जमजम कॉलनी भागातील एका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्यंगचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच हौशी व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी व्यंगचित्रांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, व्यंगचित्राच्या माध्यमातून शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर अचूक भाष्य करता येते. एक प्रभावी व्यंगचित्र हजारो लोकांच्या समस्यांना थेट वाचा फोडण्याचे काम करते, हाच बाळासाहेबांचा खरा वारसा आहे. तर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी सर्व स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे खोटे निरोप देऊन केवळ गर्दी जमवण्यासाठी प्रशासकीय बैठकीला बोलावल्याचा आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महायुतीमधील अंतर्गत बेबनाव पालकमंत्र्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी आमदारांच्या संपर्क कार्यालयातून ही खेळी खेळली गेल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. रविवारी सुटीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर महायुतीच्या…

Read More

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, ज्या तुम्ही तुमच्या कौशल्याने सहज पूर्ण कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहणे फायदेशीर ठरेल. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. न्यायालयीन कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: साकुर पठार भागातील विविध गावांसह साकुर ते बिरेवाडी आणि रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात, ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नसून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करावे, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे. बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शेटे बोलत होत्या. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम बाळासाहेब थोरात यांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते. तसेच साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा करणाऱ्या फिर्यादीला न्यायालयात आपला अधिकृत व्यवसाय सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची गुन्हातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर मधील एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी हा निवाडा केला. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी समीर रमेश महाले (रा. जयभारत चौक, संगमनेर) यांचा सोन्याचा व्यवसाय असून आरोपी संतोष यादवराव काळे (रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्याशी त्यांची मैत्री होती. फिर्यादीच्या दाव्यानुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे…

Read More

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा देशप्रेमाचे उमाळे येऊ लागले आहेत. राजाने काही सांगावे आणि प्रजेने थुंकी गिळल्याप्रमाणे त्याचा अंमल करावा, असे मजेशीर पण खऱ्या देशभक्ताला उबग येईल असे उद्योग सुरू झाले आहेत. ‘बघूया कोण आधी…’ अशी ही स्पर्धा! या स्पर्धेत स्वतःच्या मागे हुशारीचा मुलामा लावलेला महाराष्ट्र पुढे आहे हे पाहून कपाळावर हात मारावा की काय, असे वाटू लागले आहे. जगभर कोविडची साथ आली, तेव्हाही आपल्या अनपढ प्रजेने तेच केले जे अर्धवट राजाने त्यांच्या डोक्यात भरवले होते. आताही तेच सुरू आहे; फरक इतकाच की राजाचा खोटेपणा पचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तेव्हा ते करायची आवश्यकता पडली नव्हती, कारण…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि प्रलंबित कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फले मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध सौहार्दाचे राहतील. बोलण्यावर ताबा ठेवल्यास विनाकारण होणारे वाद टाळता येतील. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर व नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेलचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खंदरमाळवाडी येथील किशोर बाळाजी डोके यांच्या ‘हॉटेल निलायम बार’चे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी ३ लाख ६ हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या गंभीर आरोपावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मोठा निर्णय घेत, लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंचासह एकूण पाच सदस्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे केवळ घुलेवाडीतच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, घुलेवाडी येथील सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येतील, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र खर्च करताना थोडे नियोजन करणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. घरात एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. मिथुन: दिवसाची सुरुवात थोड्या धावपळीची होऊ शकते, पण…

Read More

वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेरात वृत्तपत्र संपादकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरेश थोरात यांची समाजमाध्यमे आणि वृत्तपत्राद्वारे बदनामी केल्याप्रकरणी ‘बांधीलकी जनहिताची… नायक’ या सायं दैनिकाचे संपादक गोरक्षनाथ मदने आणि कार्यकारी संपादक शाम तिवारी यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, ९ मे २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे सिद्धार्थ नितीन कुमार या २७ वर्षीय तरुणाला मृत अवस्थेत आणण्यात आले होते. डॉ. थोरात यांनी कर्तव्यावर असताना मृतदेहाची तपासणी केली असता, मृताच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याचे आणि…

Read More

संगमनेर : अवघ्या महाराष्ट्रात तमाशा कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या 25 मे रोजी देशाच्या अतिशय प्रतिष्ठित अशा पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने अवर गृहसचिव कमलेश रबिदास यांनी आज (दि. 15 मे) या सोहळ्याचे तपशील पाठवले आहेत. 25 मे रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळ्याची रंगीत तालीम होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रपती भवनात पाच वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांना पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची अस्सल लोककला अशी ओळख असलेल्या लोकनाट्य तमाशा क्षेत्रात रघुवीर खेडकर हे पद्म पुरस्कार मिळवणारे पाहिले कलाकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवावी. टंचाई निवारण, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व यंत्रणांनी अधिक संवेदनशील होऊन आणि परस्परांमध्ये समन्वय राखून काम करावे, अशा कडक सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रवेशासाठी बंदी घालण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत अन्यायकारक असून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासणारा असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) केली आहे. राज्याचे आरक्षण ७२ टक्क्यांवर पोहोचल्याने खुल्या प्रवर्गातील स्पर्धा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा सरकार करत असले तरी, हा युक्तीवाद घटनाबाह्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. आरक्षणाचे तत्व हे केवळ ‘समान संधी’ देण्यासाठी नसून सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर राहिलेल्या घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे. सकारात्मक भेदभावाच्या सिद्धांतानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, मात्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आरक्षणाचा हा मूळ उद्देशच धोक्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: कत्तलीसाठी गोवंश निर्दयतेने अन्न पाण्यावाचून बांधून ठेवणाऱ्याविरोधात संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर भागात छापा टाकून पोलिसांनी २ लाख ६० हजार रुपये किमतीची एकूण १२ गोवंश जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गुरुवारी (दि. १४ मे) सायंकाळच्या सुमारास एका गोपनीय बातमीदाराकडून गोवंश कत्तलीसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर गल्ली नंबर १ मधील हावडा ब्रिज नाल्या शेजारी असलेल्या काटवनात सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ याने महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही गोवंश जातीची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या विशेष कामगिरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. जागतिक पातळीवर युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, इथेनॉल हा भविष्यातील इंधनासाठी एक सक्षम आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर आणि विचारांवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते, मात्र थोरात कारखान्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत दारू निर्मितीऐवजी इंडस्ट्रियल…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. वृषभ: आज मनावर थोडे दडपण राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात घाई करणे टाळावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. मिथुन: आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. तुमच्या संवादकौशल्यामुळे इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. कर्क: कामाच्या ठिकाणी आज तुमची प्रशंसा होईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, जी तुम्ही समर्थपणे पेलू शकाल. घरातील वातावरण…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्र्यांनीही बचतीची नाटकं सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून विधानभवनात बुलेटवरून पोहोचले तर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे बॅटरी कारने मंत्रालय गाठलं. आणखी एक मंत्री नितेश राणे मंत्रालयासमोरील बंगल्यातून चालत मंत्रालयात पोहोचले. मात्र या मंत्र्यांच्या इव्हेन्टबाजीची नेटकऱ्यांनी चांगलीच खेचली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना चांगलाच आरसा दाखवला. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये काटकसरीची एकच स्पर्धा लागली होती. स्वतः मुख्यमंत्री त्यात सहभागी झाल्याने तो एकच चर्चेचा विषय बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वर्षा निवासस्थानातून बुलेटवर प्रवास…

Read More