Author: Annant Ppangarkar
मेष : मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल आणि जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा काळ अनुकूल आहे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक वातावरण अतिशय आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील, मात्र बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळलेले बरे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत. आज दानधर्म केल्याने मानसिक…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरमध्ये चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून, सामान्य नागरिक आता घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. घुलेवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुलेवाडी येथील रहिवासी सुरेखा तुकाराम मधे यांचे घर चोरट्याने लक्ष्य केले. घराच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्याने घरातील पेटीचे कुलूप शिताफीने फोडले. या पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीच्या या सत्रामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सुरेखा मधे…
संगमनेर, प्रतिनिधी – मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक साहित्य आणि माहिती गहाळ झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही केवळ साहित्याची चोरी नसून बहुजन महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप करत, यासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) कार्यकर्त्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२० या दरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मंत्रालयातून गायब झाली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी जर ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पिंपरणेमध्ये (संगमनेर) प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ६० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण सात जणांना अटक केली आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, पिंपरणे गावच्या शिवारात नदीपात्राच्या दक्षिण बाजूला असलेल्या पुलाजवळ ताहीर शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करून चोरून वाळू वाहतूक करत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) पहाटे १२:४५ च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी नदीकाठी…
संगमनेर | अनंत पांगारकर संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आता नव्या कारभाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या टीम मध्ये ‘संगमनेर सेवा समिती’चे नूरमोहम्मद शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, स्वीकृत नगरसेवक म्हणून रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत हे निर्णय घेण्यात आले. विकासाचा नवा फॉर्म्युला आणि ‘संगमनेर २.०’ व्हिजन – माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या निवडी करताना शहराच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे.…
ओतूर – युद्धजन्य अशा जागतिक अस्थिर परिस्थितीतही भारत आर्थिकदृष्ट्या ‘रायझिंग स्टार’ असून २०२५-२०३० पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असा आशावाद ओतूर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. नाशिक येथील आर्थिक विश्लेषक समीर नाईक व सुनील कडलग यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रविवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी राज लॉन्स येथे आयोजित या चर्चासत्राची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वक्ते समीर नाईक, सुनील कडलग, डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. शशांक फापाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओतूर डॉक्टर असोसिएशनचे…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामाचा उत्साह टिकून राहील. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असून जुनी येणी वसूल होण्याची दाट शक्यता आहे. वृषभ: आज व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आज हिताचे ठरेल. मिथुन: तुमची कल्पकता आणि बुद्धिमत्ता आज कामाच्या ठिकाणी चमकणार आहे. मान-सन्मान वाढेल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेले निर्णय मार्गी लागतील. कर्क: आज सरकारी कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन…
संगमनेर/बोटा – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सिन्नर, अकोले आणि संगमनेर मार्गेच जावा, या मागणीसाठी आज बोटा (ता. संगमनेर) येथे विकास क्रांती सेना आणि विविध संघटनांच्या वतीने सुमारे अडीच तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण-पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रेडिओ दुर्बिणीच्या लहरींना अडथळा निर्माण होऊ शकतो, असे कारण सांगत रेल्वे प्रशासनाने हा मार्ग बदलून पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेर आणि…
नक्की तारीख आठवत नाही, पण तो २००६ चा काळ होता. शिक्षणाचे दिवस होते आणि मी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. कामाला लागून जेमतेम १०-१२ दिवस झाले असावेत. एक दिवस अचानक कामाचे नियोजन बदलले आणि गेस्ट हाऊस इन्चार्ज थिटमे साहेबांनी मला सांगितले, “तुला आज नाईट शिफ्ट करून उद्याची जनरल ड्युटीही सांभाळायची आहे.” मी होकार दिला. रात्रभर जागून सकाळी पुन्हा कामासाठी सज्ज झालो. साधारण साडेनऊची वेळ असेल, एका गाडीचा हॉर्न वाजला. मी धावतच बाहेर गेलो आणि गाडीचा दरवाजा उघडला. समोर साक्षात आदरणीय भाऊसाहेब थोरात (दादा) उभे होते! त्यांना इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ. पांढऱ्या…
संगमनेर: तालुक्यातील जोर्वे परिसरात अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,५९,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल गंगाधर बोरकर (वय ५६, रा. नवीन गावठाण, जोर्वे) हे दि. १० जानेवारी २०२६ च्या संध्याकाळी ६ ते दि. ११ जानेवारी २०२६ च्या सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घरी नसताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने बोरकर यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील शोकेसमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरीला गेलेल्या…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांच्यासह सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली. या निवडीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर २.० चा जाहीरनामा आणि शहराच्या विकासाचे एक विशेष व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती. यावर विश्वास ठेवून संगमनेरच्या ७० टक्के मतदारांनी सेवा समितीला मोठे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली असून कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत नगरसेवक…
संगमनेर, प्रतिनिधी- वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात उडी घेऊन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्त्वांची मूल्ये जपत निष्ठा, शिस्त, काटकसर आणि नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते निर्माण केले. सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर…
सौ. दुर्गा सुधीर तांबे (माजी नगराध्यक्षा, संगमनेर) महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्ती अशा असतात, ज्या केवळ एका पिढीचे नेतृत्व करत नाहीत, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी विचारांचा वारसा निर्माण करतात. माझे वडील, ज्यांना आम्ही सर्वजण आदराने ‘दादा’ म्हणायचो, म्हणजेच स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे अशाच प्रगल्भ नेतृत्वांपैकी एक होते. नेते, सहकारमहर्षी, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक विविध क्षेत्रांतील अभ्यासू नेतृत्व म्हणून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आमचा थोरात परिवार अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ‘जोर्वे’ गावचा. जोर्वे हे केवळ एक गाव नाही, तर ती एक प्राचीन संस्कृती आहे. ज्या संस्कृतीचा उल्लेख ताम्रपाषाणयुगीन कालखंडाशी जोडला जातो, त्या मातीत दादांचा जन्म १२…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभाचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, फक्त रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, कारण कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. मिथुन: व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक असून नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि मित्रपरिवारासोबत प्रवासाचे बेत आखले जातील, मात्र संवाद साधताना स्पष्टता ठेवा. कर्क: आज कामाचा व्याप वाढल्याने थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो, पण तुमची जिद्द तुम्हाला यश…
संगमनेर, प्रतिनिधी- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा माहितीअभावी अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. आमदार खताळ यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील अनेक लाभार्थी महिलांकडून या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून अज्ञानामुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे ‘घरामध्ये शासकीय कर्मचारी आहे’ हा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे संबंधित…
नाशिक: सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. किशोर दिनकर सोनवणे (वय २९, रा. महाकाली चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २ मे २०१९ रोजी नाशिकमधील सिडको परिसरातील साईबाबानगर, महाकाली चौक येथे घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी आरोपी किशोर सोनवणे याने घराच्या गच्चीवरून एक उशी खाली फेकली. मुलीला ती उशी घेऊन गच्चीवर येण्यास सांगून, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा…
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे. माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या…
अहिल्यानगर- कोपरगाव शहर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पथकाने कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस अंमलदार दीपक मेढे, राहुल द्वारके, राहुल डोके, सतिश भवर, सुनिल मालणकर आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे मनोज चंद्रकांत…
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राची लाज आणि शरम अक्षरश: रस्त्यावर आणली आहे. पत्रकारितेच्या 35 वर्षांच्या काळात निवडणुकांची इतकी अधोगती आम्ही पाहिली नाही. गडबड केली तर हातची उमेदवारी जाईल, आचारसंहिता भंग केला तर पोलीस कारवाई होईल, अशा संविधानिक दडपणात होणार्या राज्यातील निवडणुका म्हणजे देशातील निवडणुकांचा आदर्श मानला जाई. पण गेल्या दहा वर्षांपासून निवडणुकांचं झालेलं अवमुल्यन पहाता निवडणुका म्हणजे केवळ बाजार झालाय, असंच म्हणता येईल. निवडणुकांतील वाढता काळाबाजार हे लोकशाहीचं अध:पतनच ठरलंय. याआधी महाराष्ट्रासारख्या राज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन एव्हाना काहीसा बरा होता. पण विकासाच्या मुद्यापेक्षा लाळघोटेपणाला महत्व आल्यापासून महाराष्ट्र हे निवडणुकांसाठी नालायक राज्य ठरलं आहे. याची सर्वस्व जबाबदारी ही सत्ताधार्यांकडेच…
संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण भागात आणि वनक्षेत्राच्या लगत राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्याचा वावर हा आता केवळ भीतीचा विषय उरला नसून तो जीवघेणा ठरत आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावत असताना, शासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अभियंता किरण सोमनाथ मैंदड यांनी या गंभीर प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांपासून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन धाडले आहे. तंत्रज्ञान असतानाही दिरंगाई का?- आजच्या आधुनिक काळात जिथे आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांत करत आहोत, तिथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप्स’ आणि ‘मोशन सेन्सर’ यांसारख्या साध्या यंत्रणेचा वापर…
