Author: अनंत पांगारकर

संगमनेर: प्रतिनिधी मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच संगमनेर शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या चार-पाच गंभीर घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून, आता याविरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक झाली आहे. बंदी असलेल्या नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याला, कानाजवळ नायलॉन मांजा अडकून गळा, कान कापला जाण्याचे प्रकार घडले आहेत. नायलॉन मांजावर शासनाची बंदी असूनही शहरातील काही दुकानदार छुप्या पद्धतीने याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर…

Read More

घारगाव (अहिल्यानगर)-  संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा अपमान करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला शेतातून घरी परतत असताना, आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण याने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारे आक्षेपार्ह वक्तव्य करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर, पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असल्याचे माहित असतानाही तिला जातीवरून हीन वागणूक देत…

Read More

मेष – आजचा दिवस कष्टाचा परंतु फलदायी राहील. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. व्यापारात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सायंकाळी एखादी आनंदाची बातमी मिळेल. वृषभ – तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुमचे वर्चस्व राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखाल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, सावध राहा. मिथुन – आज मनात नवीन विचार आणि कल्पना येतील. बौद्धिक कामात रस वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखद ठरेल. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. कर्क – आज…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सहसा विजयोत्सवाचा धुरळा शांत व्हायला अनेक दिवस लागतात, परंतु संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी मात्र एक वेगळाच पायंडा पाडला आहे. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचा पदभार हाती घेतात कामाला सुरुवात केली आहे. तांबे यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाजाला भर न देता आभार दौऱ्याच्या निमित्ताने प्रभागनिहाय भेटी देण्याचे काम सुरू केले आहे. या भेटीदरम्यान ते केवळ नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह प्रभागात फिरत नाही तर मुख्याधिकारी आणि त्यांची सर्व प्रशासकीय टीम त्यांच्यासोबत प्रभागनिहाय दौरे करत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकाळात शहरात मोठी विकास कामे झाली. शहर स्वच्छतेचे काम या…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून विक्रीसाठी आलेला साठा जप्त करावा, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत.  आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत असून या जीवघेण्या मांजामुळे अनेक नागरिक आणि मुले जखमी होण्याच्या घटनांचे गांभीर्य मोठे आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. हा मांजा मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत असल्याने त्याचा वापर, साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नायलॉन मांजाची चोरटी विक्री रोखण्यासाठी शहरातील उपनगरांमधील सर्व दुकानदारांना सूचना देऊन त्यांच्यावर…

Read More

संगमनेर / अकोले-  नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरुवातीच्या सर्वेक्षणाप्रमाणे म्हणजेच अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. या भागातील जनभावनेची सरकारने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. ‘नांदूर खांदरमाळ’ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरल्यानुसार, सर्व तालुक्यांमध्ये ‘लेटर टू सी. एम.’ ही व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहणार चळवळ- रेल्वेची ही मागणी तळागाळातील जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही मोहीम अधिक आक्रमक केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या…

Read More

संगमनेर-  मराठी साहित्याचा गौरव करण्याची परंपरा जपत ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या वतीने सन २०२६ सालासाठी विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा कवितासंग्रह, गझल, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य, विनोद, चरित्र आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांसाठी एकूण १२ स्मृती पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्व. यशवंत चिंधू नेरे, स्व. विष्णूपंत माळोकार, स्व. सुंदर बोंगाळे, स्व. दिलीप दमाणे, स्व. रुक्मिणीबाई चवडेकर, शंकर घोरसे, स्व. भिमाई बाविस्कर, स्व. जयवंती तावडे, स्व. रत्नाबाई घोडके, स्व. शालिनी चिंचवडकर, ॲड. मदन फडणीस आणि स्व. पुष्पावती धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचा समावेश आहे. साहित्य पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी १५०१/- रुपये रोख, १०००/- रुपयांची पुस्तके,…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत असताना, मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अत्यंत घातक ठरणाऱ्या ‘चायनीज’ नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी संगमनेरकरांनी या मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे. चायनीज मांजा हा काच, धातू आणि विविध रासायनिक घटकांपासून बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तर शेकडो निष्पाप पक्षी आपले प्राण गमावतात. हा मांजा निसर्गतः लवकर नष्ट होत नसल्याने तो झाडाझुडपांमध्ये अडकून दीर्घकाळ पर्यावरणाला हानी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- भारतीय संविधानावर विश्वास ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व जिल्हाध्यक्ष युवक अहिल्यानगर उत्तर ॲड. पांडुरंग औताडे यांच्या आदेशानुसार, अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर श्रीरंग गवांदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष (युवक) ॲड. पांडुरंग केशव औताडे पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. ॲड. शेखर गवांदे हे उच्चशिक्षित वकील असून त्यांचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडाल. व्यापारात धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक आघाडीवर वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद मिटतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, मात्र कामाच्या गडबडीत विश्रांती घेण्यास विसरू नका. वृषभ – आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायायदे ठरेल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये अधिक गोडवा येईल.…

Read More