Author: Annant Ppangarkar

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला स्पष्ट बहुमत मिळालं असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटलं की, विकसित आणि समृद्ध बिहारसाठी जनतेने NDA ला २०१० नंतरचा सर्वात मोठा जनादेश दिला आहे. मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना नमन करून बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, पक्षाकडे देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन नसल्याचं सांगितलं आणि नकारात्मक राजकारण केल्याचा आरोप केला. या संवादात, सरकारने छठ पूजेला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं, ज्यामुळे…

Read More

मुंबई: ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुतणी सौ. गिरीजा पिचड-म्हात्रे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करून गिरीजा पिचड यांनी पक्षात प्रवेश केला, यावेळी सपकाळ आणि थोरात यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गिरीजा पिचड यांच्या पक्षप्रवेशामुळे आदिवासी समाजाला एक नवे आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याचे मत व्यक्त केले. त्या आदिवासी समाजाच्या न्याय-हक्काची लढाई लढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोणाच्या चुकीमुळे कोसळला, हे संगमनेर शहर आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही दुर्घटना घडली. जनतेचा तीव्र विरोध असतानाही, सत्ताधाऱ्यांनी एस.टी.पी (STP) गटारीचा जो वादग्रस्त आराखडा तयार केला, त्यातूनच या समस्येने मूळ धरले असल्याचे टीका शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे.  सध्या पालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी म्हणाले, तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे साहेब यांच्या निधीतून बांधलेल्या, अतिशय सुस्थितीत असलेल्या या पुलाचे गटारीचे…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, जिल्हा नियोजन व विकास समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यात तब्बल ११५० बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी आणि वन विभागाशी सतत संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून…

Read More

मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात यश आणि चांगला नफा मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. परदेशाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आज भाग्य 72% तुमच्या बाजूने आहे. वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. प्रेम जीवनात नवीनता आणि गोडवा येईल. मिथुन (Gemini): आज तुमचे मन अध्यात्माकडे आकर्षित होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी भेट देण्याची योजना होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस…

Read More

मेष (Aries): नवीन घर खरेदीसाठी दिवस चांगला आहे. कामावर तुमच्या बॉसकडून आश्चर्यचकित करणारी घटना घडू शकते. कायदेशीर प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा संवाद लोकांना प्रभावित करेल. वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो, त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. घरातील कामात केलेले बदल फायदेशीर ठरतील आणि तुमची निर्णयक्षमता सुधारेल. मिथुन (Gemini): व्यवसायात असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे, कारण तुम्ही तांत्रिक उपकरणे व्यवसायात समाविष्ट करू शकता. मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील, परंतु दूरच्या नातेवाईकांमुळे आईसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer): आजचा दिवस सुखसोयी आणि आनंद वाढवणारा आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे आनंद मिळेल. सर्जनशील कामांमध्ये रुची…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात मोठी कारवाई करत गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या आरोपींकडून तब्बल १२ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या या कत्तलखान्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गुन्हे शाखेला जमते ते स्थानिक पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस सुखद आणि रोमँटिक असेल. भौतिक सुखांचा आनंद घेता येईल. कुटुंबीयांची मदत मिळेल आणि लोकांसोबत चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. एखादी मोठी डील आज फायनल होऊ शकते. भाग्य ८८% राहील. वृषभ (Taurus): व्यापारात उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहीण आणि नातेवाईकांशी संपर्क साधता येणार नाही. सहकाऱ्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. तुमचे व्यक्तिमत्व आज कमकुवत राहू शकते. मिथुन (Gemini): तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधाऱ्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. बाहेरील कामे आज दमवणूक करणारी आणि ताणतणावाची असू शकतात. कर्क (Cancer): आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी किंवा व्यवहारांमुळे तुमच्या भावना दुखावतील. ताण वाढत आहे, त्यामुळे सावध राहा आणि…

Read More

संगमनेर – गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका, नगरपंचायतीसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांचा प्रचार समाज माध्यमातून सुरू झाला असला तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व माघारी नंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उलटलेल्या दोन दिवसांमध्ये अद्याप जिल्ह्यातील एकाही नगरपालिका, नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवाराने नगराध्यक्ष अथवा सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.  सध्या संभाव्य इच्छुकांनी समाज माध्यमातून आपल्या उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सध्या तरी संभाव्य नगरसेवक सोशल मीडिया पुरते मर्यादित राहिले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठीं समोर उमेदवारी देताना मोठे पेच…

Read More

संगमनेर – कांद्याला केवळ 180 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडगाव पान (ता. संगमनेर) येथे आज, (दि. ११ नोव्हेंबर) महायुती सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. वडगाव पान येथील शेतकऱ्यांनी सध्याचे महायुतीचे केंद्र आणि राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार असल्याचा आणि ते शेतकरी विरोधी असल्याचा थेट आरोप केला. राज्य सरकारकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचा दावा करत, संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी ही आमच्याकडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  राहुरी/अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी राहूरी तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘कदम टोळी’वर अत्यंत कठोर कारवाई केली आहे. खून, दरोडा, आणि शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम याच्यासह एकूण चार सदस्यांना जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 अंतर्गत ही कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम (रा. धामोरी खुर्द) सोबतच स्वप्नील रमेश बोरुडे (रा. चिंचविहिरे), गणेश नामदेव जाधव (रा. बारगांव नांदूर), आणि नितीन दत्तात्रय हरिश्चंद्रे (रा. तमनर आखडा) यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनुसार, नितीन कदम आणि त्याच्या…

Read More

मेष (Aries): कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल आणि जुन्या योजना पूर्ण होतील; आर्थिक स्थैर्य राहील, तर कुटुंबात वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वृषभ (Taurus): व्यवसायात विस्ताराच्या चांगल्या संधी मिळतील आणि कामातील अडथळे दूर होतील; उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे आणि जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. मिथुन (Gemini): कामात जोडीदाराची चांगली साथ मिळेल आणि नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात; खर्चाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच प्रवासात घाई करणे टाळा. कर्क (Cancer): नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि कामे वेळेत पूर्ण होतील; गुंतवणूक लाभदायक ठरू शकते आणि कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. सिंह (Leo): मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल आणि करिअरमध्ये यश मिळेल;…

Read More

संगमनेर – शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे संगमनेर शहर आता ड्रग्स माफीयांच्या रडारवर आले असून शहरात नशेच्या इंजेक्शनचे सर्रासपणे बेकायदा विक्री होत असल्याचे पोलिसांनी समोर आणल्याने शहरात ड्रग्सचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) नव्या पोलीस निरीक्षकांची नुकतीच भेट घेत त्यांचे स्वागत करत ही मागणी केली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेत आर जी एस एस च्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती मात्र देशमुख यांची बदली झाली. त्यामुळे त्यांच्या जागी आलेले नवे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी या प्रकरणी लक्ष घालत सखोल तपास करण्याची…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी आगामी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजीत तांबे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. संगमनेरचा निवडणुकीचा जाहीरनामा आता जनतेच्या थेट सहभागातून तयार होणार आहे. ‘संगमनेर २.०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा ठरवला जाणार आहे. गंगामाई घाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार तांबे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा! आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी संगमनेर शहराच्या आजवरच्या प्रगतीचे पुनरावलोकन केले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभाग या तत्त्वांवर आदर्श विकासाचे मॉडेल उभे केले. आज संगमनेरमध्ये निळवंडे…

Read More

अमरावती/मुंबई: जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी विखे पाटलांवर घणाघाती हल्लाबोल करत त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलून लावण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर जो कोणी विखे पाटलांचे वाहन फोडेल, त्याला प्रहारकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा कडू यांनी केली आहे. “नाव कृष्णाचे आणि कृत्य कंसाचे! अशा मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडेन!” असं देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. काय होते विखे पाटलांचे वक्तव्य? – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

Read More

संगमनेर: काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये नशेचे इंजेक्शन्स (ड्रग्स) विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता शहरातील ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अकोले नाका परिसरातील एका संकुलातील ‘कॅफे’वर छापा टाकून ही गंभीर बाब समोर आणली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अकोले नाका परिसरातील संकुलातील कॅफेमध्ये मुला-मुलींना अश्लील कृत्यांसाठी जागा दिली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. ०८) दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास ही धडक…

Read More

मेष (Aries) – दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कामात सुधारणा होईल. जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता. वृषभ (Taurus) – सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात विस्तार होण्याचे संकेत आहेत. बोलण्यात लवचिकता ठेवा. मिथुन (Gemini) – तुमचे बोलणे आणि मन वळवण्याचे कौशल्य वाढेल. नवीन विचारांमुळे यश मिळू शकते. पारंपरिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. कर्क (Cancer) – दुपारी भावनिक संतुलन आणि संवेदनशीलतेवर लक्ष केंद्रित होईल. चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मन तयार राहील. सिंह (Leo) – तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. कामातील मंद गतीमुळे थोडा मानसिक ताण येऊ शकतो. कन्या (Virgo) – सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा.…

Read More

देशातील सामाजित वातावरण चांगलं आहे, असं म्हणण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही. धर्माच्या आड अधार्मिक कृत्य करणार्‍यांवर कोणताच अंकुश नसल्याने धर्माचा आधार घेत अनेकजण देशातील सलोखा बिघडवण्याचा उघड प्रयत्न करत आहेत. अशांवर प्रशासनाचं काहीही नियंत्रण नाही. उलट पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसारखे नेते अशांना फॉलो करत असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. यामुळे देशात हिंदू वगळता इतर धर्मांतील व्यक्तींना सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांना सत्ताधार्‍यांची फूस असल्याने यंत्रणाही जणू त्यांच्यासाठीच राबत असल्याचं चित्र आजकाल आहे. यामुळे देशातील सलोख्याचं काय होईल, याची चिंता आहे. हे केवळ हिंदूतेरांबाबत घडतं असं नाही. जे सत्ताधारी भाजपच्या धर्मिक भूमिकेला विरोध करतात…

Read More

मेष (Aries) आजचा दिवस उत्तम असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना फायदा होऊ शकतो किंवा पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लागू शकते. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. वृषभ (Taurus) आज घाईने निर्णय घेणे टाळा. नवीन कामासाठी लगेच पुढे जाऊ नका. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सारासार विचार करूनच पुढे जाणे हितकारक ठरेल आणि कुटुंबाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini) व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक पातळी संतुलित राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer) आज मानसिक…

Read More

संगमनेर – एकेकाळी ‘सुसंस्कृत व वैभवशाली शहर’ म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेले अवैध धंदे आणि ड्रग्जसह अमली पदार्थांची तस्करी यामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, पालक आणि महिलांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. शहराच्या शांतता व सुरक्षिततेला या घटनांमुळे मोठा धक्का बसला आहे. शांतता, सुरक्षितता, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण केंद्र, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि समृद्ध बाजारपेठ यांमुळे संगमनेरने राज्यात आपला लौकिक निर्माण केला होता. मात्र, मागील एक वर्षापासून तालुक्यात दडपशाही आणि दहशत वाढत असल्याची भावना निर्माण झाली असून, शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मुंगसे यांनी चिंता व्यक्त…

Read More