Author: Annant Ppangarkar

संगमनेर – ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन डीजे वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही डीजे वाहने जप्त केली असून, आयोजकांचाही शोध सुरू आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कठोर भूमिका घेतली असून, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कोणताही लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना आवाजाची पातळी (डेसिबल मीटर) आणि वेळेचे नियम पाळणे आवश्यक असते. मात्र, काल शहरात आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिसांकडून लाऊड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –  सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्याजवळ रात्रीच्या वेळी एका लॅब टेक्निशियनला मारहाण करून १५,००० रुपये लुटणाऱ्या तिघांना वावी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या घटनेतील चौथा आरोपी मात्र अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मागील महिन्यात ही घटना घडली होती. वावी येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करणारे सुधाकर सोपान वक्ते (वय ३५) हे आपले काम संपवून रात्री ८ च्या सुमारास जेऊर कुंभारी (कोपरगाव) येथील आपल्या घरी परत जात असताना चोरट्यांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील १५,००० रुपये हिसकावून चोरट्यांनी शिर्डीच्या दिशेने पळ काढला होता. या घटनेनंतर सुधाकर वक्ते यांनी तात्काळ पोलिसात…

Read More

अहिल्यानगर-  जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) दिलीप संजय मिसाळ (वय ३९, रा. खेटाकळी, ता. शेवगाव) या ग्रामसेवकाला अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) या व्यक्तीने अडवले. आरोपी गवळीने ग्रामसेवक मिसाळ यांना बंदुकीचा धाक दाखवून, ऐ ग्रामसेवक, माझ्याकडे बंदूक आहे, यातील सहा गोळ्या तुझ्या… घालीन, अशी धमकी दिली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास, आता आमचे नेते खासदार आहेत, आम्ही फक्त तुमची आणि विरोधकांची जिरवणार, असे धमकावले. या घटनेची माहिती…

Read More

मेष (Aries)- आज तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये असलेले नाते अधिक घट्ट होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्ही शांत आणि आत्मविश्वासाने कामाला सुरुवात कराल. तुमचे छुपे शत्रू किंवा विरोधक तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पणाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहांचा आशीर्वाद मिळेल. मिथुन (Gemini)- आज तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये व्यस्त असाल, परंतु तुम्ही उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधण्यास देखील सक्षम असाल. तुमची…

Read More

संगमनेर:  सकल मराठा समाज, शहर आणि तालुका यांच्या वतीने मंगळवारी (९ सप्टेंबर) संगीता वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाणार आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजातील महिला आणि पुरुष हे निवेदन देणार आहे. संगीता वानखेडे यांनी केलेल्या मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानांचा निषेध करत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या निवेदनानंतर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल…

Read More

संगमनेर:  गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेरच्या पठार भागातील साकुर मध्ये दोन सख्या चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्या पाठोपाठ संगमनेर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.  पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात घडली. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी संजय खांबेकर (वय २२) आणि तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) यांचा अंत झाला. वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही जय जवान चौकातील घरात राहत होते. या संदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली…

Read More

संगमनेर-  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय आयुष आणि 10 वर्षीय सारंग या दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आमदार सत्यजीत तांबे यांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘बिबट्या नसबंदी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला असून, ही लढाई बिबट्यांविरोधात नसून शेतकऱ्यांच्या आणि माणसांच्या जगण्याच्या हक्कासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मुलांचा असाच बळी जात राहणार का? बिबट्याच्या हल्ल्यात नाशिकच्या वडनेर दुमाला येथील 3 वर्षीय आयुषच्या मृत्यूनंतर त्याच्या आईचा आक्रोश आजही डोळ्यासमोर आहे आणि कालच सिन्नर…

Read More

संगमनेर –  सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर ते रविवार, १४ सप्टेंबर २०२५ या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी आणि कामगार अशा सर्वांचा विकास झाला असून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील नवीन प्रशासकीय…

Read More

संगमनेर –  जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या “मनातलं पानावर” हे पुस्तक वाचकांना आनंद देईल आणि जीवनातील दु:ख विसरून आनंदी राहण्यास मदत करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या “मनातलं पानावर” या पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर येथे सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अनिल देशपांडे,…

Read More

मुंबई-  राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला. धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी…

Read More

मेष (Aries)- आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ किंवा उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला नवीन कल्पना किंवा प्रकल्प सुरू करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. हा दिवस शिकण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी चांगला आहे. नातेसंबंधांमध्ये, मोकळेपणाने संवाद साधा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. मिथुन (Gemini)- तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती दिसून येईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. कर्क (Cancer)- आजचा दिवस सामाजिक कामांसाठी आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी उत्तम आहे.…

Read More

संगमनेर- यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरून निर्माण झालेल्या वादावर मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव (आप्पासाहेब) खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी मानपत्रावरून नाराजी व्यक्त करत मिरवणुकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद समोर आला होता. रंगारगल्लीतील १३० वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते. संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळाने दोन्ही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती. दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आरती व्यवस्थित पार पडली. मात्र, त्यानंतर…

Read More

श्रीरामपूर –  गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे. महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला. गणेश विसर्जन…

Read More

गेल्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणानंतर सुरू झालेल्या चर्चा प्रचंड अस्वस्थ करणार्‍या आहेत. जरांगेंचं उपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारने ठेवलेल्या प्रस्तावाचा स्वीकार मराठा समाजातील असंख्य बांधवांना विशेषत: प्रस्तावाची चिकित्सा करणार्‍या अनेक मान्यवरांना अमान्य वाटतो आहे. न्यायालय आणि कायद्याची भीती दाखवून मुंबई खाली करण्यासाठी सरकारने सरकारने मनोज जरांगेंना गळी पाडलं, असा आरोप केला जातो आहे. अशा आंदोलनाचा राजकीय फायदा उपटता येईल, असे प्रयत्न सत्ताधारी भाजपने पध्दतशीर केले. आंदोलनाचा एकनाथ शिंदेंना यापूर्वी झालेला फायदा आता होऊ नये, म्हणून पध्दतशीर फिल्डिंग लावली गेली. 16 ऑगस्ट 2011 या दिवशी दिल्लीच्या रामलिला मैदानात आमरण उपोषण पुकारून अण्णा हजारेंनी सार्‍या…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. संयम ठेवा, यश निश्चितच मिळेल. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास करण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer) – आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, पण…

Read More

संगमनेर :  गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. साकुर गावातील बन परिसरात दोन सख्ख्या चुलत बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दोन मुलींची नावे तन्वी अजय सगळगिळे (वय १७) आणि मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १५) अशी आहेत. दोघीही चुलत बहिणी होत्या. रविवारी दुपारी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आणि पुढील तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दोन तरुणींनी आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. या गणेशोत्सवाचा समारोप एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली या युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मदत केली आणि प्रवरा नदीकाठची स्वच्छता करून निर्माल्य संकलन केले. या उपक्रमासाठी एकविरा फाऊंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रवरा नदीकाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.  डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाचशे युवक-युवतींनी नागरिकांना विसर्जनासाठी मदत केली आणि…

Read More

संगमनेर- शहरातील गणेश नगर येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती गंगाधर गोरडे (वय ७३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती गोरडे यांची सप्तशृंगी देवीवर अपार श्रद्धा होती. त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील योगदान मोठे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा मोठा परिवार आहे. गुंजाळवाडी येथील माजी उपसरपंच रामदास रामचंद्र राहणे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ राहणे यांच्या त्या भगिनी होत्या. तसेच, सेवानिवृत्त सहायक निबंधक ॲड. अनिल भांगरे यांच्या त्या सासू होत्या.

Read More

संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीची छायाचित्रे…

Read More

जामखेड: शहराच्या शिवाजीनगर भागात एका 15 वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरात शोककळा पसरली आहे.  भक्ती गणेश गायकवाड (वय 15, रा. शिवाजीनगर, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. भक्तीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नातेवाईक तुकाराम मोरे आणि इतरांनी तिला तातडीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव…

Read More