Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली नगर जिल्ह्यात राजकारण सुरू असून दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मंजूर झालेली विकास कामे काही मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी थांबविली जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला अहमदनगर जिल्ह्याचा एवढा राग का आहे असा प्रश्न उपस्थित करत थोरात म्हणाले, सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याचे खरे विरोधक आहे. नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य सुरू आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रद्रोही विधान करत आहेत, या विरोधात राज्य सरकारची नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान, वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निषेध करत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर टप्प्याटप्प्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयात प्रलंबित असलेली राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई नव्या वर्षातही सुरूच राहणार असल्याचे दिसते. न्यायालयाने सत्तासंघर्षाची सुनावणी आता एकत्रित घेतली जाईल, असं स्पष्ट करत पुढील तारखेची घोषणा केल्याने आता १३ जानेवारी २०२३ चा मुहूर्त मिळाला आहे. शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तापालट झाला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर पुढील महिन्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबरोबर न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा असतील. नव्या वर्षात संक्रांतीच्या अगोदर दोन दिवस होत असलेल्या या सुनावणी दरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे येथील बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोमांस वाहतुकीच्या टीप आता वरिष्ठांना दिल्या जाऊ लागल्या आहे. अशाच एका टीप वरून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई एक हजार किलो गोमांसासह साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला आहे. शंकर चौधरी, संतोष लोंढे, भाऊसाहेब साळुंखे, विनायक चव्हाण व बबन बेरड या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना संगमनेरमधून जनावराच्या मांसाची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यांनी ही माहिती वस्तीवरील पथकाला देत कारवाई करण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे. खासदार राहुल गांधींचं चारित्र्यहनन कधीपासून आणि कुणी सुरू केलं?’ याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. भारत छोडो यात्रेच्या लोगोसह शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत राहुल गांधीचा राजकारणात प्रवेश झाल्यापासून कशा आणि कोणत्या घटना घडल्या याचीही माहिती देतानाच भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओ सोबत थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की “राहुल गांधींची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झालं आणि कुणी केलं? व्हिडीओ नक्की बघा असं म्हटलं आहे. https://twitter.com/bb_thorat/status/1599018449430523907?t=9KmJLVd8kYR8HnoeZ2xHMQ&s=19 थोरात यांच्या पाठोपाठ स्वतः राहुल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लहान बालकांमध्ये राज्यभरात गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये गोवर लसीकरण व गोवर आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलीस मित्र फाउंडेशनचे संगमनेर शहराध्यक्ष मन्सूर चांदभाई शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. राज्यभरात बालकांमध्ये गोवर साथीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नवजात बालकापासून पाच वर्षे वयोगटातील बालकांना याचा सर्वाधिक धोका आहे. यात अनेक बालकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे संगमनेर शहरासह तालुक्यात सर्वत्र लहान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज घरामध्ये चहा करणाऱ्या महिलेला पाठीमागून येत आरोपीने कवळी घालत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच दुसऱ्या महिलेने संबंधित महिलेला चावा घेत लाथा बुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी तालुक्यातील नान्नज दुमाला येथील दोघा आरोपींविरोधात विनयभंग व मारहाणीचा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसत तिला पाठीमागून कवळी घालत शारीरिक संबंधाची मागणी केली फिर्यादीने आरोपीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीची साडी ओढून तिच्याशी पुन्हा लज्जास्पद वर्तन करण्यास सुरुवात केल्याने फिर्यादीने त्यास विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीचा आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या दुसऱ्या महिला आरोपीने फिर्यादीच्या हनुवटीवर…

Read More

कंपनीच्या प्राध्यापकासह चार जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज संस्थेची माहिती विद्यापीठाकडे विचारल्याचा राग आल्याने तरुणाला प्राचार्यांच्या दालनात अडीच तास डांबून ठेवत दमबाजी करण्यात आल्याने तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने विद्यार्थी बेशुद्ध पडला व त्याला पालकांच्या ताब्यात देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकी दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पारेगाव येथील बाप कंपनीच्या प्राध्यापकांसह काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनी संबंधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील बाप कंपनीमध्ये पाथर्डी तालुक्यातील हनुमान अण्णा गर्जे या बावीस वर्षे तरुणाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील एका डॉक्टरने संस्थेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून डॉक्टर विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजता गोल्डन सिटीमधील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी संस्थेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोपीने या मुली बाथरूममध्ये जावून काय करतात असे विचारणा करत तिचा विनयभंग केला तसेच उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करणार असे म्हणत चल माझ्या गाडीत बस, असे विचित्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केले. निमित्त होते, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीच्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाच्या पाहणीचे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडल वरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाड यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात सुरू असलेली वादाची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे हा वाद भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पेटला आहे. छत्रपती विषयी अवमानकारक बोलणाऱ्या भाजपच्या वाचाळवीरांमध्ये आता प्रसाद लाड यांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. राज्यपाल पदावरील…

Read More

रविवार विशेष एसएमबीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. या पेटंटचे पुढील २० वर्षांपर्यंत ‘एसएमबीटी’कडे अधिकार राहणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लहानपणी घरातील वृध्द आजीबाई काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी…

Read More

महाराष्ट्रात भाजपाने शिंदे गटाशी युती केल्यानंतर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने विधान केले, खरंतर त्यांनी समान नागरी कायदा हा लोकसंख्या नियंत्रणाच्या कामी गरजेचा असल्याचे म्हटले आहे. गुजरात निवडणूकीनंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचे संकेत दिले. भारतात गोवा राज्यामध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. उत्तराखंड राज्यांमध्ये सदर कायदा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. हा कायदा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंतर हा कायदा काय आहे, त्याबाबत अनेक अफवा, समज- गैरसमज…

Read More

रविवार विशेष । प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) अभिसार शर्मा, प्रसुनकुमार बाजपेयी, राजदीप सरदेसाई, आशुतोष, नवीनकुमार, अजित अंजूम, निखिल वागळे या दिग्गजानंतर आता वेळ आलीय रविश कुमार यांची. सत्तेला जे पचत नाही त्यांना मुळासकट उखडून टाकण्याचा बाणा मोदी सरकारने हाती घेतलाय. या बाण्याचे देशातील पत्रकारांमधले सत्तरावे बळी ठरलेत रविश कुमार. सारी माध्यमं सरकारपुढे लोटांगण घालत असताना जाब विचारणाऱ्या एनडीटीव्हीला टाळं ठोकण्याचा पराक्रम मोदी सरकारने करून पाहिला. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिकांवर नको-नको ती बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपला आवाज एनडीटीव्हीने तेवत ठेवला. रविश कुमार यांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडलं.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची घोषणा करत २०६३ पदांची भरती केली जाणार आहे. खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखीने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा, मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबईत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली. दिव्यांगांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राष्ट्र ठरले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात स्वतंत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामावर असलेल्या सुरक्षारक्षकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी गजाने मारहाण करून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यास तब्बल पाच महिन्यानंतर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. ऋषिकेश सदाशिव वाव्हळ (वय २३ वर्ष) या तरुणाला पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र होंडा शोरूम च्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लक्ष्मण चांगदेव फटांगरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. यावेळी त्यांच्यासह आणखी एक सहकारी होता. ५ जुलैला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना हालचाल जाणवली, त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला हटकले असता तेथे असलेल्या लोखंडी गजांची चोरी करण्याचा प्रयत्न असलेल्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात गजाने प्रहार केला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोघेही तरुण नात्याने चुलत भाऊ असून तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी आहे. आकाश विलास कुळधरण आणि ऋषिकेश विजय कुळधरण अशी या दोघा मृत भावंडांची नावे आहेत. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूने वडगाव पान गावात हळहळ व्यक्त होत आहे. लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत असलेली पिकअप आणि मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. याच दरम्यान दुचाकीवरून जात असलेले दोघे तरुण या अपघातात सापडले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर नजीक असलेल्या रायतेवाडी फाटा येथे एसटी बस आणि हुंडाई कारच्या झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहे. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातासंदर्भात अधिक माहिती अशी, नासिक येथील मित्तल कुटुंबीय गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हुंदाई कारमध्ये संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांची कार रायतेवाडी फाटा येथे आली असताना समोरून पुण्याहून संगमनेर कडे येणाऱ्या एसटी बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात अजयकुमार राजेंद्रकुमार मित्तल, त्यांची पत्नी दीपशिखा अजयकुमार मित्तल, मुलगा शिखर अजय कुमार मित्तल आणि सून आहण शिखर मित्तल (सर्व रा. फ्लॅट नंबर ८, साईप्रसाद…

Read More