Author: Annant Ppangarkar

संगमनेर – संगमनेर शहरामध्ये एका कॉलेजमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीतून समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या संदर्भातील अधिक माहिती समोर येणार आहे.  एका तीस वर्षीय वयाच्या महिलेने या संदर्भात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून आरोपीचे पूर्ण नाव अद्याप उपलब्ध झाले नाही. या संदर्भात मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत चांगुलपणाचा आव आणीत तिचा गैरफायदा घेत तिचे सोबत 4 एप्रिल 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 यादरम्यान पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले…

Read More

श्रीरामपूर – १२ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान निर्मळ पिंपरी येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने देश-परदेशातून जमलेल्या लाखो भाविकांची हातसफाई करत त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्यीय टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ महिलांसह २६ आरोपींना अटक केली. यांच्या विरोधात लोणी (राहाता), शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. कथेदरम्यान भाविकांचे मौल्यवान दागिने वस्तू चोरी जात असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक…

Read More

संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित समस्या आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांच्या व्यापक हितासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रभावी पाठपुरावा केला. या भेटीत बाजार समितीच्या एकूण कार्यप्रणालीत अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बदल घडवून आणण्यासाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. आमदार तांबे यांनी बाजार समितीच्या आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता बोलून दाखवली, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर आणि थेट फायदा मिळेल अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. त्यांनी विशेषतः बाजार समितीतील व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणणे, हमाल-माथाडी कामगारांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे, व्यापाऱ्यांसाठी सुलभ आणि…

Read More

अहिल्यानगर: ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना पत्र सादर करून राजीनामा दिला आहे. फाळके यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २०१८ मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जवळपास सात वर्षांच्या काळात त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. घाईगर्दीत कोणताही निर्णय घेणे टाळा. वृषभ (Taurus): आज तुम्ही भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील आणि कामे पूर्ण झाल्यामुळे आनंदी राहाल. मिथुन (Gemini): कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने झुकू शकतात. तुमचे सकारात्मक आणि संतुलित विचार समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कामात उत्साह वाटेल. व्यवसायामध्ये नवीन…

Read More

संगमनेर – आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सच्चा शिवसैनिकांचा सन्मान करत उमेदवारी दिली जाणार आहे. विरोधकांना या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ताकद दाखवून दिली जाईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाणार असली तरी आघाडी झाली नाही तर सर्वत्र संपूर्ण ताकतीने उमेदवार दिले जाणार असून त्यांच्या विजयासाठी पराकाष्टा केली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन होते यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळते जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पक्षाने पदावरून हटविल्यानंतर शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. नवनियुक्त दोन्ही जिल्हा प्रमुखांनी मंगळवारी…

Read More

नाशिक – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी नाशिकमध्ये एक धक्कादायक फसवणूक केली आहे. न्यायव्यवस्थेचा धाक दाखवून ७२ वर्षीय सेवानिवृत्त वयोवृद्धास ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल ७२ लाख रुपये आरटीजीएसव्दारे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी ही मोठी रक्कम लाटण्यात आली असून, शहर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक गंगापूर रोड परिसरात राहतात. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्यांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी सप्टेंबरच्या अखेरीस सरन्यायाधीश नाशिकमध्ये आले असतानाच, चोरट्यांनी त्यांच्या नावाचा वापर केला. चोरट्यांनी वयोवृद्धाच्या दैनंदिन बँक खात्याची…

Read More

अकोले – अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय निरागस मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कुमारी कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे देवठाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवठाण शिवारातील हिवरगाव रस्त्यावर लहानू गांगड यांचे कुटुंब राहते आणि एका शेतकऱ्याकडे ते जमीन वाट्याने कसत आहेत. मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड हे शेतात गेले होते, तर त्यांची आई घरात होती. घरातून बाहेर अंगणात कविता एकटीच खेळत असताना, सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तिला उचलून नेले. घटनेची…

Read More

मेष – आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे. चंद्र गोचर तुमच्यासाठी शुभ योग घेऊन येत आहे, ज्यामुळे तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. विशेषतः बँकिंग आणि आर्थिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून असलेली एखादी चिंता किंवा अडचण आज दूर होऊ शकते. जीवनसाथीकडून तुम्हाला चांगले सहकार्य प्राप्त होईल. घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण मानसिक भटकावामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि आज तुम्हाला एखादे सुंदर उपहार मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शरीर आणि मनाने स्वस्थ आणि…

Read More

संगमनेर – काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना मोठी भेट दिली आहे. २०२४-२०२५ हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन २०० रुपयांप्रमाणे ऊस विकास अनुदान ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज, आणि कामगार बोनस अशा एकूण २५.१० कोटी रुपयांची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. ३२०० रुपये प्रति टन उच्चांकी भाव – कारखान्याने प्रति टन २०० रुपयाप्रमाणे रक्कम वर्ग केल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना यंदा प्रति टन…

Read More

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त…

Read More

अहिल्यानगर: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून प्रारुप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील एकूण सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी (सर्व प्रवर्गांमधील) आरक्षित ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप आरक्षणासंदर्भात कोणाच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे. पंचायत समितीशी संबंधित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – तुम्ही दररोज इतरांच्या घरात काम करतात. साफसफाई, स्वयंपाक, सेवा, मोठ्या-मोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता, पण स्वतःच्या राहण्यासाठी छत नाही, हे अन्यायकारक आहे. तुमचंही एक स्वप्न आहे ‘आपलं स्वतःचं घर असावं!’ हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असे आमदार सत्यजित तांबे यांनी महिलांना आश्वस्थ केले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार संघटनेच्यावतीने संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या…

Read More

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांनी प्रेरित आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने यंदाच्या दीपावली सणाच्या तोंडावर दूध उत्पादक आणि कामगारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. दूध संघाने दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत रक्कम, कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी अशा विविध बाबींसाठी तब्बल ४१ कोटी रुपये थेट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. रणजितसिंह देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सातत्याने प्रशंसनीय राहिली आहे. दूध व्यवसाय आता संगमनेर…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक असेल. तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह उच्च राहील, ज्यामुळे कामात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यापारात केलेल्या योजना यशस्वी होतील आणि सरकारी लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus): आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. मित्र आणि स्नेह्यांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे, तसेच वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न तुमच्या बाजूने सुटतील. कुटुंबातील काही व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. मिथुन (Gemini): कुटुंबात तुमचा मान वाढेल आणि तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. करिअर किंवा कुटुंबातील कार्यक्रमांसाठी प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे खर्च वाढण्याची आणि आर्थिक…

Read More

संगमनेर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या संगमनेरमधील नऊ जागांसाठी व तालुका पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद जागांसाठी अहिल्यानगर मध्ये तर पंचायत समितीच्या जागांसाठी संगमनेरमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे बहुतांशी गट आणि गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे तर राखीव जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे अनेक प्रस्थापितांचे साम्राज्य धुळीस मिळाले आहे. तसेच पुन्हा निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे. असे आहे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण…. समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तळेगाव – सर्वसाधारण महिला आश्वी बुद्रूक – नागरिकांचा…

Read More

अहिल्यानगर – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) रोजी पार पडली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी झालेल्या या सोडतीनुसार २९ गट खुल्या प्रवर्गासाठी, २० गट इतर मागासवर्गीय (OBC) (यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांचा समावेश आहे), अनुसूचित जमातीसाठी (ST) ९ गट, अनुसूचित जातीसाठी (SC) ७ गट व उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत. जिल्हा परिषदेची ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष निवडणुकीच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून प्रेमसंबंधातील त्रिकोणातून घडलेली एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि क्रूर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाने आणि संतापाने एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा निघृण खून केला आहे. वाढदिवस एकत्र साजरा केल्यानंतर प्रियकराने केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने प्रेयसीचा गळा चिरल्याची ही धक्कादायक घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत मेरी मल्लेश तेलगू या तरुणीचा खून झाला असून, तिच्या प्रियकर दिलावर सिंग (वय २५) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मृत मेरी मल्लेश तेलगू हे दोघे २०१७ पासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेरीचे…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जुनी कामे पुढे सरकतील. वृषभ (Taurus): पैशांचा वापर जपून करा. विनाकारण खर्च करणे टाळा. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता. मिथुन (Gemini): वैयक्तिक संबंधात इतरांच्या भावनांमध्ये अडकू नका. संवाद साधण्यासाठी चांगला दिवस. आरोग्याची काळजी घ्या. कर्क (Cancer): नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सिंह (Leo): कामाच्या ठिकाणी संयमी व्यक्तिमत्त्व ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रमोशन किंवा भाग्याची साथ मिळण्याचे योग. कन्या (Virgo): जास्त भावनिक होऊन विचार करू नका. बुद्धिमत्ता आणि विश्लेषण क्षमता कामात स्थिरता आणेल. तूळ (Libra): कामाच्या निमित्ताने…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. हा खून की घातपात, याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात रोज सकाळी भाविक दर्शनासाठी जातात. रविवारी सकाळी काही भाविक दर्शनासाठी गेले असता, त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त…

Read More