Author: Annant Ppangarkar

मेष – आज तुम्हाला थकवा आणि आळस जाणवू शकतो. उत्साह कमी राहील. प्रत्येक गोष्टीवर राग येण्याची शक्यता असल्याने कामे बिघडू शकतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या. वृषभ – आज तुम्हाला शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. मिथुन – भागीदारीच्या व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवन आनंदी राहील. कर्क – काहींचा कल मनोरंजनाकडे राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. सिंह – आर्थिक क्षेत्रात धाडस…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणगाव, शिवापूर, मेंढवन आणि सावरगाव तळ परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यांवरील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे, तसेच दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या संसाराला मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार खताळ यांना कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळल्याची माहिती मिळताच, त्यांनी कोणताही विलंब न करता अधिकाऱ्यांसमवेत कोकणगाव आणि शिवापूर येथील संजय भोसले यांच्या…

Read More

संगमनेर – परतीच्या पावसाने अहिल्यानगर व मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून नुकसानीने बाधित नागरिकांना धीर दिला. आता पंचनामे व इतर फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मोठी मदत करा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील सादतपूर, निमगाव जाळी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सोमनाथ जोंधळे, विवेक तांबे, अनिल थेटे, तानाजी जोंधळे, चिंचपूरचे सरपंच सागर तांबे, संदीप कडलग, लक्ष्मण डेंगळे, अनिल तळोले, विजय हिंगे, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी…

Read More

शिर्डी- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे आतोनात नुकसान झाले असून घरे व मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत, आपली सामाजिक बांधिलकी जपत, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे. संस्थानच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. साईबाबा संस्थानने नेहमीच धर्मदाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या या उदार मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या पीडितांना तातडीची मदत पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बळ मिळेल. श्री साईबाबा संस्थान केवळ एक धार्मिक…

Read More

पुणे – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहे. पवार कुटुंबाने गुंड पोसलेले आहेत आणि त्याच गुंडांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर शनिवारी (२७ सप्टेंबर) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दैत्यनांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना अरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडविली व हल्ला केला. या हल्ल्यात हाके यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्येही हल्ला झाल्याबद्दल चिंता व्यक्त…

Read More

आश्वी | प्रतिनिधी निळवंडे धरणाचा उजवा कॅनॉल पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे शनिवारी रात्री फुटला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी धास्ती पसरली आहे. कॅनॉलची भिंत फुटल्याने पाण्याचा प्रवाह वडनेरकडे वळला. सुदैवाने, या घटनेत निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान टळले असून, कोणतीही मानवी हानी झालेली नाही. मात्र, या प्रकाराने ग्रामस्थ हादरले असून भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी सरपंच शांताराम सिनारे, माजी सभापती भीमराज हरदे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सचिव माधव हारदे, शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव…

Read More

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी परिसरात ऑनलाईन फसवणुकीने थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ग्राहक सेवा केंद्र चालक, मेडिकल व्यावसायिक, शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनेकांना सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, आश्वी खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका ताज्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गावातील एका जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ‘भाडेकरू’ असल्याचे भासवून तब्बल १९,००० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. पीडित कर्मचारी जेवण करत असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने, मी तुमच्या रूमचा भाडेकरू बोलतोय, माझा फोन पे नंबर बंद आहे. माझा मित्र हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला अर्जंट…

Read More

पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर, थोरात यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) पाथर्डी येथील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना करत, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाहीये, यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सद्बुद्धी दे, अशी आर्त विनवणी केली. बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात करून त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त…

Read More

रविवार विशेष लेख — प्रवीण पुरो- केंद्रातल्या युती सरकारने नव्याने जारी केलेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या (GST) कर प्रणालीत सुधारणा करत देशभर जीएसटी बचत उत्सव साजरा करण्याचा नवा खेळ सुरू केला आहे. सात वर्षाच्या लुटीनंतर लोकांना वेडं बनवण्याचा हा नवा खेळ. याआधी नोटबंदीचा उत्सव, कोरोनात थाळ्या बडवण्याचा उत्सव साजरा करताना या सरकारने लोकांना अक्षरश: उल्लू बनवलं. नोटबंदी फसली आणि सत्ताधार्‍यांची स्वत:ची पुंजी वाढवली. कोरोनात थाळ्या वाजवल्या आणि पीएम केअर फंडाद्वारे हजारो कोटींची व्यक्तीगत कमाई केली. जीएसटी प्रणाली सुरू करताना त्यात असंख्य चुका आणि प्रचंड तक्रारींचा बोजा वाढला. या तक्रारींना जराही दाद न देणार्‍या या सरकारला आठ वर्ष उलटल्यानंतर…

Read More

मेष – व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. फॅशन, ग्लॅमर आणि डिझाइनिंगशी संबंधित लोकांना लाभ होईल. नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. कौटुंबिक जीवनात धार्मिक वातावरण राहील, पण आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. वृषभ – आज करिअरमध्ये नवीन बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता, ज्यामुळे धनलाभ होईल. तुमचा दांपत्य जीवन आनंदी राहील आणि तुम्ही जोडीदाराला भेटवस्तू द्याल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. तुमच्या कर्मक्षेत्रात विस्तार होईल आणि पदोन्नतीचा योग बनत…

Read More

अहिल्यानगर – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरात अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे. निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्र व धरणाच्या खालील परिसरातील पाण्याचा वेग व पातळी लक्षणीय वाढणार आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना म्हणून, नदीपात्र व जलाशय परिसरात असलेले कोणतेही साहित्य अथवा जनावरे तात्काळ हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होण्याची…

Read More

संगमनेर: नाशिक परिमंडळात अहिल्यानगर मंडळांतर्गत येणाऱ्या संगमनेर विभागातील वीज वितरण सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संगमनेर उपविभाग-१ आणि २ चे विभाजन करून नवीन ‘संगमनेर उपविभाग-३’ स्थापन करण्यास महावितरणने मंजुरी दिली आहे. नवीन उपविभाग-३ च्या पद निर्मितीसाठी वार्षिक १,२६,७३,०९२ इतका खर्च तसेच कार्यालय निर्मितीसाठी १२ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी मिळाली असल्याचे आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजातील अडचणी कमी व्हाव्यात, तसेच नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर भागात शेती पंपधारक, ग्राहक आणि व्यावसायिक यांची मोठी संख्या असल्याने वीज जोडणीस होणारा उशीर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माजी पोलीस उपअधीक्षक (DYSP) यांच्या मुलाने कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत, दोन तरुणी आणि त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून डांबून ठेवल्याची आणि त्यांच्यावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ या हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी हॉटेलचा चालक व सेवानिवृत्त DYSP संजय देशमुख यांचा मुलगा सौरभ देशमुख याच्यासह वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गंगापूररोडवरील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवून दोघींकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याचे फिर्यादीतून उघड झाले आहे. याप्रकरणी सौरभसह…

Read More

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धरण विसर्ग वाढल्याने नदीकाठी पूरस्थितीचा धोका- पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना विशेषतः सतर्क राहण्याचे आणि पाणीपातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर…

Read More

अहिल्यानगर – ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी राज्यभर दौरा करत असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आज (शनिवारी) अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हाके यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दगडफेकीत लक्ष्मण हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी सहकाऱ्यांसाठी जात होते. नगर जवळील अरणगाव येथे दौरा सुरू असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी सकाळी पाहणी करून राज्य सरकारला ‘बाकी सारे सोडा, पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी तात्काळ आणि विनाअट मदत देण्याची मागणीही केली. बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा- बिहारमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर, थोरात यांनी तातडीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकिन आणि टाकळी फाटा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, इसुफ शेख, रवींद्र…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासवर खड्ड्यांमुळे अचानक फुटले. सुदैवाने, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आणि डॉ. गोऱ्हे सुखरूप आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती तुमच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी दिली. सोलापूरहून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीपाठोपाठ प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटल्याने या रस्त्याच्या गंभीर स्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हे खड्डे लोकांच्या जीवावर बेतत असून ते तातडीने बुजविण्याची…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) सकाळी कंटेनर आणि टिप्परमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आदल्या दिवशी (गुरुवारी) झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते, तर एका महिलेचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, डी एन 09 एस 9484 क्रमांकाचा कंटेनर घेऊन जाणारा चालक मोहम्मद सलीम (रा. वेदराम कॉलनी, हरियाणा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याने एम एस 17 ए जी 5438 क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या टिप्परला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी…

Read More

मेष – व्यवसायात काही अनावश्यक बदलांना सामोरे जावे लागेल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. प्रवासात अडचणी येऊ शकतात.  वृषभ – प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तब्येत उत्तम राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील आणि अचानक धनलाभ संभवतो.  मिथुन – अपूर्ण कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनप्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होईल. कर्क – सक्रिय दृष्टिकोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवेल. वैयक्तिक जीवनात चांगला बदल आणि नात्यांमध्ये बहर येईल. मध्यस्थी करण्याची क्षमता वाढेल. सिंह – जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, पण कोणालाही पैसे उधार देणे टाळा. कन्या – आनंददायी परिणाम मिळतील आणि तुमची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढेल.…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या सभापती पदासाठी कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होतात याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया यामुळे सुरू झाल्याची मानले जात आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच…

Read More