Author: Annant Ppangarkar

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ- आज तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. मिथुन- आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार जपून करा. कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सिंह- आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल. कामाचे योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. तूळ- आज तुम्हाला आर्थिक…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद…

Read More

सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच…

Read More

संगमनेर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कात 20% वाढ केल्याच्या निषेधार्थ, ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने सोमवारी संगमनेरमध्ये आंदोलन केले आहे. ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले, पुणे विद्यापीठ खोटं बोलत आहे की त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही शुल्कवाढ केली नाही. पूर्वी 25,000 रुपये असलेले बीसीएचे शुल्क आता 40,000 रुपये झाले आहे. तसेच, 14,000 रुपये असलेली इतर अभ्यासक्रमांची फी 30,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारी आहे. घुले…

Read More

घोटी: महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेली २९ वर्षांपासून एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा जोपासत आहेत.  १९९७ पासून, हे गिर्यारोहक दरवर्षी न चुकता नवरात्रीमध्ये शिखरावर घटस्थापना करतात आणि विजयादशमीपर्यंत दररोज कळसुबाई मातेची पूजा-अर्चा करण्यासाठी शिखर सर करतात. या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला. यावेळी त्यांनी गिर्यारोहकांच्या श्रद्धा आणि साहसाचे कौतुक केले आणि नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.  या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि…

Read More

संगमनेर – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी निळवंडे धरण आणि कालवे प्रकल्प पूर्णत्वास नेला यामुळे पर्जन्यछायेतील संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी आली आहे. त्यांनी पूर्ण केलेल्या निळवंडे धरण आणि त्याच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून पाणी आल्याने, एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेल्या अनेक गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित झाला आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या चांगल्या पावसामुळे, डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून सतत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील नदी-नाल्यांवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. थोरात यांच्या प्रयत्नातून आता दुष्काळी भागात देखील पाणी फिरू लागले आहे. निळवंडे धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा असून, तो…

Read More

मेष: तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: आर्थिक बाबतीत थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येतील. मिथुन: नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामामध्ये नवीन संधी मिळतील आणि उत्साह कायम राहील. कर्क: आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, पण शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. सिंह: सर्जनशीलता वाढेल आणि प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कन्या: कामाचा ताण वाढेल, पण तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुळ: वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. वृश्चिक: महत्त्वाचे निर्णय घेताना संयम पाळा.…

Read More

बेलापूर (अकोले): बिबट्याच्या हल्ल्यात बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची अकोले तालुक्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. पप्पू बाळू दुधवडे (रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, अकोले) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतमजुराचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ समोर आली. या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू दुधवडे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी ते कामावरून घरी परतत असताना, रात्री त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी…

Read More

नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसोबत झालेल्या बैठकीत आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटील यांचा सहभाग आढळल्यामुळे ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.  काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे खून…

Read More

प्रवीण पुरो – महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गलाबोट लावणार्‍या विकृत जमातीने भाजपची चांगलीच उतरवली आहे. राज्याचा सर्वांगीण चांगुलपणा खड्ड्यात काम त्या पक्षात अविरत सुरू आहे. पक्षातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी विराधकांवर चिखलफेक करतो, अशी स्पर्धा सुरू आहे. सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्यांची अवस्था काय करू आणि काय नको, अशी झाली आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने या सार्‍यांचं धाबं दणाणलं आहे. यामुळे संधी घेत विरोधकांना चेपण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा पध्दतशीर प्रयत्न होतो आहे. भाजपवर संकट आलं की हे चवताळखोर कामाला लागतात. प्रवक्ते तर चेकाळले आहेतच. पण प्रवक्ते नसलेल्यांची अवस्थाही विचित्र झाली आहे. आपल्या पक्षात ज्यांना काडीची किंमत नाही,…

Read More

मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- आज तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. नवीन लोकांशी संपर्क साधल्याने फायदा होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने आनंद मिळेल. कर्क (Cancer)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल. शांत राहून काम करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला असून, कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तलवार, आणि इतर साहित्य असा एकूण ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई नगर-पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ रात्रीच्या वेळी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा निर्णय घेत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रशेखर चौकात उत्सव होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. यावर्षी पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, याच चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये…

Read More

संगमनेर – सीबीएसईच्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने आपला डंका वाजवताना दहा पदकांसह चार चषके पटकावली. शिर्डीच्या द्रोणा अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या एरोबिक्सपटूंनी सर्व गटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. वैयक्तिक सादरीकरणाच्या अकरा, चौदा आणि सतरा वर्षांखालील वयोगटात इशान उगले, राजवीर आवारी आणि स्पर्श घुले यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अनिका चांडक, लब्धी कटारिया, ऋद्धी दरडा, त्रिशा गांधी, आराध्या जोशी, गुंजल करवा व यशश्री लाहोटी यांच्या संघाने फिटनेस एरोबिक्समध्ये रौप्य पदकासह विजेतेपदही मिळवले. या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी विविध गटांमध्ये एकूण 10 पदकांसह चार चषकं पटकावले. कुलदीप कागडे यांनी मार्गदर्शन…

Read More

संगमनेर –  संगमनेर तालुक्यातील चिखली गावाच्या ग्रामपंचायतीने निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरून दडपशाहीने टाकण्यात येत असलेल्या 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत या संदर्भात केलेल्या ठरावानंतर ग्रामपंचायतीने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री’ या कंपनीने 7 मे 2024 रोजी चिखली सबस्टेशन ते वाडापूर आणि मेमाणे वस्तीपर्यंत वीज वाहिनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते. मात्र, 30 मे 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत, ग्रामपंचायतीने ‘चिखली सबस्टेशन ते वाडापूर ते…

Read More

संगमनेर –  संगमनेर शहर पोलिसांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज आणि १३२ केव्ही सबस्टेशनजवळ घडला. हा अपघात एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला. व्हिडिओमध्ये, यश अनुप अरगडे (वय २०), रा. गुंजाळवाडी, संगमनेर, हा त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (क्रमांक एमएच ०४ एलए २५३१) दुचाकीला मुख्य रस्त्याऐवजी भरधाव वेगात फूटपाथवरून चालवत होता. २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले. हा…

Read More

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले. कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित…

Read More

मेष (Aries): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुमच्या मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कामात यश मिळवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करा. मिथुन (Gemini): आज काही निर्णय घेताना सावध राहा. अनावश्यक वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवसभर थोडा तणाव जाणवू शकतो. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक…

Read More

संगमनेर –  घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असताना, रुग्णालयातील मेडिकल सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी घुलेवाडी येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयातील प्रशासनाचे काम समाधानकारक नसल्याचे पानसरे यांनी सांगितले. रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात…

Read More