Author: Annant Ppangarkar
देशाच्या लोकशाहीला झालंय काय, असा प्रश्न पडण्यारख्या असंख्य घटना उघडपणे घडत आहेत. या लोकशाहीला बळकट करण्यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड घालमेल करणारं मतचोरीचं प्रकरण एकीकडे आवासून उभं असताना आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या गुजरातमध्ये राजकीय पक्षांच्या नावावर 1400 कोटींची लूट करण्यात आल्याचा नवा घोटाळा पुढे आला आहे. यंत्रणांच्या नावावर देशवासीयांचे पैसे लुटून खाणार्या या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असं ना देशाच्या निवडणूक आयोगाला वाटत ना केंद्रातल्या मोदी सरकारला. गुजरात राज्य सरकार तर आमचा त्याच्याशी काय संबंध, असं सांगून हात वर करून मोकळंच झालं आहे. मतचोरीच्या घटनांचा मागोवा घेता घेता हा नवा घोटाळा बाहेर येऊनही निवडणूक आयोग मख्ख आहे. आयोगाने याची दखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मिथुन (Gemini): आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कल्पना इतरांना प्रभावित करतील. नवीन लोकांशी संपर्क साधाल. नातेसंबंध दृढ होतील. कर्क (Cancer): आज तुम्ही थोडे भावूक राहाल. कामामध्ये लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.…
नाशिक – पोलीस असल्याचा बनाव रचून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. अशाच एका घटनेत, पाथर्डी फाटा परिसरात एका वृद्धाला रोखून ‘आम्ही अँटी करप्शनवाले आहोत’ असे सांगत, त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम हातचलाखीने लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी आनंदराव सोनार (वय ६६, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आनंदराव सोनार दुपारी ३ वाजता त्यांच्या पत्नीसोबत पाथर्डी फाटा येथून पायी जात असताना, एका व्यक्तीने त्यांना थांबवले. काका, तुम्हाला खूप वेळ झाला आवाज देतोय, ऐकू आलं नाही का? असे म्हणून त्याने त्यांना बाजूला बोलावले. त्यानंतर त्या भामट्याने, आम्ही अँटी करप्शन विभागाचे अधिकारी आहोत.…
अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेला तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वडगाव गुप्ता परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून दोघांना अटक केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणली जात होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. रोडवर वडगाव गुप्ता गावाजवळ हॉटेल किनाराजवळ पोलिसांनी एक संशयित ट्रक (एम.एच. १४ जी. यु. २१११) थांबवला. यावेळी ट्रकची तपासणी केली असता, त्यात नवनाथ अंबादास मेटे…
अहमदनगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र; संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा आणि महादेवाचा देखावा ठरणार मुख्य आकर्षण संगमनेर – गेल्या 11 वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करत, यंदा मालपाणी उद्योग समूहाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक अधिक भव्य आणि शाही असणार असून त्यात विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश करण्यात आला आहे. ही मिरवणूक मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून सुरु होणार आहे. मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या एक दशकाहून अधिक काळ ही मिरवणूक काढली नव्हती. परंतु यंदा पुन्हा एकदा जुनी परंपरा सुरू…
आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात ‘आय लव संगमनेर’ ही चळवळ संगमनेरची संपन्नता वाढवणारी – आमदार सत्यजित तांबे महावादन सोहळ्यातून स्थानिक कलाकारांचा गौरव संगमनेर – शुक्रवारी गणेशोत्सवाच्या उत्साहात संगमनेर शहर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. ‘आय लव संगमनेर’ या चळवळीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महावादन सोहळ्यामध्ये तब्बल ४०० हून अधिक कलाकारांनी एकत्र येत अप्रतिम सादरीकरण केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीप पुंड, डॉ. मैथिली तांबे, नितीन अभंग यांच्यासह ‘आय लव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आज तुमच्यात भरपूर ऊर्जा असेल, जी तुम्ही कामात चांगल्या प्रकारे वापरू शकता. आर्थिक बाबींमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खास आणि मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि गोडवा जाणवेल. वेळेवर समस्या सोडवल्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला शांत आणि समाधानी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्थिर गतीने जबाबदाऱ्या सहज पूर्ण कराल. प्रियजनांसोबतचे क्षण तुम्हाला मानसिक शांती देतील. पैशांच्या बाबतीत घेतलेले योग्य निर्णय आत्मविश्वास वाढवतील. आरोग्यासाठी आराम करणे आणि नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल. मिथुन (Gemini): आज तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील बदल तुमच्यात सर्जनशीलता निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – बुधवारी रात्री शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिवल कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. तर पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत असून आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला 2 सप्टेंबर पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी दिल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर…
संगमनेर – एका हल्ल्याने तालुक्याचा आमदार बदलला आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन करत आपणही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, खताळ यांच्यावर झालेली घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. तसेच याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज, शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री…
संगमनेर – गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला प्रवरा नदीत वाहून गेलेल्या विजय संभाजी कुटे (वय ४२, रा. रंगार गल्ली) यांचा मृतदेह आज, शुक्रवारी सकाळी तब्बल चौथ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील खराडी गावाजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेने रंगार गल्ली आणि चव्हाणपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. विजय कुटे हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामावर जात असताना, संगमनेर खुर्दकडे जाणाऱ्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून नदीत फुले टाकत होते. याच वेळी त्यांचा तोल जाऊन ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर प्रशासनाने आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ (Taurus) आज तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळू शकते. मिथुन (Gemini) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कर्क (Cancer) आज तुम्ही भावनिकरित्या थोडे संवेदनशील असाल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.…
संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभावेळी ही घटना घडली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असताना, खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समजते. हा प्रकार अचानक घडल्याने एकच गोंधळ उडाला. आमदार खताळ यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला पकडले. त्याच वेळी मालपाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या गुळातील भेसळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले यांनी गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुळात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ या नावाने विकला जाणारा गुळ खरेदी केल्यानंतर या गुळामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर,प्रतिनिधी: संगमनेर शहरातील मेनरोडवर कोणत्याही सण, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजातील डीजे वाजवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना एक सामूहिक निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये, संगमनेर शहरातील मेनरोडवर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य मांडण्यात आले आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दुकानांमधील विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, आवाजाच्या कंपनामुळे अनेक घरांमध्ये वस्तू खाली पडून नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मेनरोडवर कोणत्याही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, प्रतिनिधी: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६) राज्यात लागू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. या कायद्यानुसार एसईबीसी प्रवर्गाला शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षण मिळाले आहे. तसेच, न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी (ओबीसी) जातीची प्रमाणपत्रे…
आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात ‘दैनिक प्रवरातीर’सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. धिरजचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मिथुन: आज तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे दिलासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रभा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. आमदार तांबे म्हणाले की, गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं. गणेशोत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. संगमनेरकर नागरिक हे दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक उत्साही असतात. यावेळी बोलताना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते. यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी…
