Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील आणि त्या तुम्ही समर्थपणे पेलू शकाल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर आहार घेणे आवश्यक आहे. ​वृषभ आज मनातील जुन्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. व्यापारात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि एखादे शुभ कार्य ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ आहे. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल. ​मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी या प्रकरणातील एकूण १४ आरोपींपैकी ११ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, संस्थापक मधुकर वाळे यांच्यासह तिघांचा अर्ज मात्र फेटाळून लावला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पतसंस्थेच्या अध्यक्षांनी आणि व्यवस्थापनाने त्यांना कर्ज देण्यासाठी शेतजमिनीचा गहाणखत करण्याऐवजी फसवणुकीने खरेदीखत लिहून घेतले. तसेच, काही कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर करत सहकार कायद्याच्या कलम १०१ अन्वये वसुलीची कारवाई केली व जामीनदाराची मालमत्ता जप्त केली. संबंधित प्रकरणात कर्ज वसुलीच्या वादातून फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) संगमनेर तालुका…

Read More

अहिल्यानगर – पारनेर तालुक्यातील निघोज येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन लोखंडी हत्याराच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंजाबमधील एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने चेहऱ्यावर रुमाल बांधून ओळख लपवत आत प्रवेश करून लोखंडी हत्याराचे सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

दरवर्षी युनेस्को या जागतिक संघटनेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक जागतिक दर्जाचे रंगकर्मी जगाला उद्देशून एक संदेश देत असत्तात. जागतिक रंगभूमी दिन संदेश २०२६: – मी एक अभिनेता आहे, जो प्रामुख्याने चित्रपट अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण माझी मुळे रंगभूमीशी खोलवर जोडलेली आहेत. मी १९७७ ते २००३ पर्यंत वूस्टर ग्रुपचा सदस्य होतो, जिथे मी न्यूयॉर्क शहरातील ‘द परफॉर्मिंग गॅरेज’मध्ये मूळ कलाकृतींची निर्मिती आणि सादरीकरण केले, तसेच जगभर दौरे केले. मी रिचर्ड फोरमन, रॉबर्ट विल्सन आणि रोमियो कॅस्टेलुची यांच्यासोबतही काम केले आहे. आता, मी व्हेनिस थिएटर बिएनालेचा कलात्मक संचालक आहे. ही नियुक्ती, जगातील घडामोडी आणि रंगभूमीवर परतण्याची माझी इच्छा, या…

Read More

आजचे राशीभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर भर द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखकर आणि लाभदायक ठरेल. मिथुन आज…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी- खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार किंवा कोणत्याही गैरकृत्याशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याची भूमिका त्यांनी पहिल्या दिवसापासून मांडली असून आजही त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुराव्याविना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचे सांगत, भविष्यात सत्य प्रखरतेने समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी चाकणकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली होती. तपासादरम्यान सर्व बाबी स्पष्ट होतीलच, असेही त्यांनी नमूद केले आहे. आज सकाळी आदरणीय सुनेत्रा पवार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांसाठी वापरलेली आणि चोरीच्या तपासात जप्त केलेली अनेक वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. सन २०१० मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यापासून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील वाहने आहेत: दुचाकी वाहने: MH 17 Q 8396, MH 17 AH 8488, MH 17 N 4920, MH 19 AF 2025, MH 17 DX 7285, MH 17 X 2175, MH 12 WY 0164,…

Read More

पाथर्डी: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौजे कासार पिंपळगाव येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत दोरीने बांधलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीजवळील कॅनॉलमध्ये एक संशयास्पद गोणी तरंगताना नागरिकांना दिसली. याबाबतची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल बंकट जवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडली असता त्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक, एकतर्फी आणि भेदभाव करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी (राजपूत) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. अमर कतारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने केवळ नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमणे हटवून गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे, मात्र शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. ज्या मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सुविधा नाही, अशा ठिकाणी धनदांडगे…

Read More

नाशिक/कोपरगाव: नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सध्या ‘विशेष तपास पथक’ (SIT) करत आहे. या तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असून, यामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणारी ही विकृती रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने तांत्रिक शोधमोहीम हाती घेतली आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या तपासाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावपर्यंत पोहोचले आहेत. कोपरगाव येथील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज मनासारख्या गोष्टी घडल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुनी थकलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. प्रवासाचे नियोजन आखाल मात्र वाहने चालवताना दक्षता घेणे गरजेचे आहे. मिथुन: आज आपणास संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली तरी संयमाने परिस्थिती हाताळावी. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कर्क:…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर शहरातील नाशिक पुणे रोड व कोल्हार घोटी रोडवरील नगरपालिका हद्दीतील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले असून शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीतील पुणे–नाशिक राज्य महामार्ग (SH 71A) व कोल्हार–घोटी राज्यमार्ग हे अत्यंत वर्दळीचे मार्ग असून या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दुकानदार, फेरीवाले तसेच काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेषतः 132 के.व्ही. सबस्टेशन ते पुणे रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रवरा नदी पूल तसेच तीन बत्ती चौक ते…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- निवडणूक आयोगाच्या ‘सिस्टिमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना, शहरातील काही बीएलओनी घरोघरी न जाता नागरिकांना कार्यालयात बोलावून मनमानी कारभार सुरू केला असल्याचा आरोप ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ने केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संगमनेरचे प्रांत अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार बीएलओ यांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमध्ये अनेक बीएलओ दूरध्वनीवरून नागरिकांना थेट नगरपालिकेत किंवा ठराविक ठिकाणी बोलावून घेत आहेत. या प्रकारामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. योग्य जनजागृतीच्या…

Read More

आजचे राशी भविष्य ​मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि ध्येयपूर्तीचा आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कठीण प्रसंगांवर सहज मात कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. ​वृषभ: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र फळांचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरेल. घरातील जुने वाद मिटवण्यास आज उत्तम संधी आहे. प्रियजनांच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. ​मिथुन: आजच्या दिवशी…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन हा घातपाताचा प्रकार असेल आणि त्यामागे कोणीही व्यक्ती कितीही शक्तीमान असेल तर आकाश पाताळ एक करून त्यांना बाहेर काढू. कोणाचीही मुलाहिजा न ठेवता त्याला शोधून काढू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाचं प्रकरण विधानसभेत उपस्थित केलं होतं. अजित पवार यांच्या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, असा स्पष्ट आरोप करत रोहित पवार यांनी सरकारला घेरलं होतं. या प्रकरणाची…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी श्रीरामपूर आणि अकोले पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत धामणगाव पाट येथील दरोडा प्रकरणातील टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीने नाशिक मधील दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढकांबे येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुरेगाव, ता. श्रीगोंदा येथील बाबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवि लाला भोसले हे या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्तवली आहे. १९ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास धामणगाव पाट येथील सुरेखा माधव भोर यांच्या घरी अज्ञात पाच इसमांनी प्रवेश करून घरातील सदस्यांना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिकच्या सिन्नर येथील स्वयंघोषित कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असतानाच आता त्याचे धक्कादायक संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. खरातने केवळ नाशिक वा इतर जिल्ह्यातच नव्हे, तर संगमनेरसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात खरातच्या मुलीच्या नावावर मोठी प्रॉपर्टी असल्याचे समोर येत आहे. या मालमत्तेमुळे आता तपासाची व्याप्ती वाढली असून, खरातच्या काळ्या साम्राज्याचा आणखी एक पदर उलगडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणावर सविस्तर निवेदन देताना खरातच्या कुंडलीतील सर्व काळेबेरे चव्हाट्यावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ नावाचाच नव्हे तर आपल्या ओळखीचाही मोठा खेळ…

Read More

नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे. आता खरात विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब शेतात घर बांधण्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी २०२१ मध्ये अशोक खरातला भेटले होते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीनुसार, खरातने शैक्षणिक सल्ला देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या आई-वडिलांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर, तांब्याच्या पेल्यात मंत्रोच्चार केलेले पाणी पिण्यास देऊन तरुणीला बेशुद्ध केले किंवा तिचे मानसिक नियंत्रण मिळवले. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर गावात ‘सीएल-३’ दारू विक्री परवान्यावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकरणी स्थानिक महिलांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावाची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासनाने ग्रामसभेच्या निर्णयाला दिलेली बगल आणि संशयास्पद कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, गुंजाळवाडी येथील दारू परवाना समनापूर येथे स्थलांतरित करताना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, अंतर नियम आणि ग्रामपंचायत कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने संबंधित परवान्याचा ठराव स्पष्टपणे नामंजूर केलेला असतानाही, तो परवाना मंजूर कसा झाला, हा संशोधनाचा…

Read More

मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधींचा असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारविहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ​वृषभ: आज आपल्या कामात काही अडथळे निर्माण होऊ शकतात, परंतु धैर्याने त्यावर मात करणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. धनलाभाचे योग आहेत, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रवासाचे योग असून प्रवासात सतर्क राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ​मिथुन: आजचा दिवस संमिश्र…

Read More