Author: Annant Ppangarkar

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वृषभ : आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग आहेत. नोकरीत बढतीची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, फक्त घाईत कोणताही निर्णय घेऊ…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राज्य सरकारने घरपट्टी शास्ती आणि दंड माफीचा निर्णय घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी संगमनेर नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अद्याप या सवलतीचा लाभ मिळालेला नाही. याउलट, सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत नागरिकांकडून जादा रक्कमेची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि सॉफ्टवेअर कंपनीवर कठोर कारवाई करून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारने शास्ती माफीचा जीआर काढल्यानंतर संगमनेरमध्ये याचे मोठे स्वागत झाले होते. अनेकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचेही प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या…

Read More

मेष: आज तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमची ऊर्जा आणि उत्साह पाहून सहकाऱ्यांमध्येही सकारात्मकता पसरेल. आर्थिक बाजूने विचार करता, जुन्या उधारीचे पैसे परत मिळू शकतात. घरातील मोठ्यांशी चर्चा करताना नम्र राहा, जेणेकरून कौटुंबिक शांतता टिकून राहील. जोडीदारासोबत संध्याकाळ मजेत जाईल. वृषभ: आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळताना दिसेल. विशेषतः जे लोक रिअल इस्टेट किंवा शेतीशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील एखाद्या मंगल कार्याचे नियोजन आज ठरू शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा जनसंपर्क वाढेल. मिथुन: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाच्या ठिकाणी काही गुप्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.  पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांच्या संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,…

Read More

शिर्डी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व गट-तट विसरून शिवसैनिकांची वज्रमूठ सहाही तालुक्यांत पक्षाला मोठा विजय मिळवून देईल, असा निर्धार शिवसेनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक आणि सत्कार सोहळा शिर्डी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेतील ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार अनिल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील काम करण्याच्या, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता याच्याशी कोणतीही तडजोड करू नका अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उड्डाणपुलाच्या कामदरम्यान नागरिकांना येत असलेल्या समस्यांची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आमदार खताळ यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या ठिकाणी ये-जा…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –  कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) रात्री १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर २ मधील एका पडक्या घराच्या आडोशाला काही गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत. या जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता केवळ कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना तिथे ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ५,४४,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी साहेबराव भिकाजी राहिंज (वय ४६, रा. पिंपरणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास पिंपरणे ते संगमनेर रोडवरील ‘हॉटेल गरीब’ येथे ही कारवाई…

Read More

संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास डिग्रस ते ठाकरवाडी रोडवरील मेंगाळवस्ती येथे घडली. या कारवाईत दोन डंपर आणि वाळू असा एकूण २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जबाजी कर्डीले यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवळ संगमनेर शहरातच नव्हे तर संगमनेर तालुक्यात येथील यामुळे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरला अवैध धंद्यांनी पोखरले आहे. यातून गुन्हेगारी…

Read More

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली हानी सारा महाराष्ट्र आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या मागे विश्‍वासू राजकीय वारस नसेल तर त्या राजकीय पक्षाचं कसं होतं याचं उदाहरण म्हणजे दादांच्या पक्षाची होत असलेली वाताहत होय. दादांच्या जाण्याने निर्माण झालेला त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न अधिक गहिरा बनला आहे. दादा निर्णय घेताना जणू आपल्याच कानात पुटपुटायचे, ते आपल्याशी बोलायचे, ते आपले सल्ले घ्यायचे, अशी दावेदारी सध्या सुरू आहे. जो तो स्वार्थी पध्दतशीर आपली पोळी भाजून घेत आहे. ज्यांनी दादांना मदत केली त्यांना दावे करण्याचा जरूर अधिकार आहे. पण त्यांनी दादांना धमकावलं, त्यांच्या राजकारणाचा बट्टयाबोळ केला…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात व्यवसायात होऊ शकतो. मिथुन: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. सर्जनशील कामात रस वाढेल आणि मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याचे बेत आखले जातील. कामात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण शक्यता निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याची पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात विशेष नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालकावर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घुलेवाडी परिसरातील ‘अमृता लॉन्स’ येथे नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी ‘जनता बँड’ मालकीचा डीजे संच कोणताही अधिकृत परवाना नसताना अत्यंत मोठ्या आवाजात वाजवला जात असल्याचे निदर्शनास आले. या…

Read More

संगमनेर/श्रीरामपूर: राज्यात नवीन फौजदारी कायदा ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, उत्तर नगर जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ सदृश कारवाईचा धडाका लावला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्याय संहितेचे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे केवळ ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावे लागणार असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती श्रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात…

Read More

महाराष्ट्रातील प्रगतशील आणि सर्वांगीण विकसित तालुक्यांचा विचार केला, तर आज बारामतीपाठोपाठ संगमनेर तालुक्याचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतले जाते. संगमनेरची ही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती एका दिवसात झालेली नसून, त्यामागे १९८५ पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक परिश्रम आणि अविश्रांत कष्ट आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने संगमनेरचा कायापालट केला आहे, म्हणूनच त्यांना या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांचा आणि संघर्षाचा वारसा घेऊन बाळासाहेबांनी राजकारणात प्रवेश केला. एका दुष्काळी तालुक्याला सधन बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्याची सुरुवात १९८९ मध्ये…

Read More

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत काही चांगले व्यवहार होण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा, अन्यथा लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग असून त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या…

Read More

संगमनेर: संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे. ६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे…

Read More