Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची शिर्डी येथे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील भांगरे आणि विखे-पाटील यांच्यातील ही दुसरी भेट असल्याने अमित भांगरे ‘तुतारी’ सोडून ‘कमळ’ हाती घेणार का, याबद्दल तर्क-वितर्कांना जोर आला आहे. भांगरे यांनी त्यांच्या आई सुनीता भांगरे यांच्यासह विखे-पाटील यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचीही उपस्थिती होती. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित…

Read More

आजचा दिवस संमिश्र फळे देणारा आहे. चंद्र आज रात्रीपर्यंत तूळ राशीत राहील. आज भाऊबीजचा सण आहे, ज्यामुळे भावनिक संबंध आणि नातेसंबंधांवर विशेष लक्ष असेल. मेष – घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. धार्मिक यात्रा यशस्वी होईल आणि समाधान मिळेल. काही मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता असल्याने सावध राहा. वृषभ – कामाच्या ठिकाणी मालमत्ता खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. कर्जाच्या बाबी अनुकूल राहतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मिथुन – काही काळापासून चाललेला तणाव दूर होऊन मनःशांती अनुभवाल. उत्पन्न आणि खर्चात योग्य समन्वय राहील. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. कर्क – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरातील वैदु वस्तीतील नागरिकांची मागणी पूर्ण करत, आमदार सत्यजीत तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. आ. तांबे यांनी यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून तब्बल १० लाखांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. नगरपालिकेच्या जागेवर हे अत्याधुनिक सभागृह विस्तारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच विवाह समारंभ, सामाजिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी एक आधुनिक, प्रशस्त आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी, संगमनेरसह मतदार संघातील प्रत्येक…

Read More

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. तालुक्यातील सहकारी संस्था व त्यांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून सभासद शेतकरी, उत्पादक, कामगार या सर्वांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण झाला असून, सहकारामुळे तालुक्याच्या जीवनात मोठी आर्थिक समृद्धी आली आहे, असे मत माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. थोरात कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून, नुकतीच उभी राहिलेली अद्ययावत प्रशासकीय इमारत अत्यंत सुंदर व वैभवशाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित लक्ष्मीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी माधवराव कानवडे, व्हा.चेअरमन पांडुरंग पा. घुले, कांचनताई थोरात,…

Read More

संगमनेर – दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे, असे प्रतिपादन संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी संलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजाची अनेक दिवसांपासूनची ‘सभागृहाची’ मागणी आता पूर्णत्वास आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे, याशिवाय राहुरीच्या टाकळीमिया येथील विद्यावर्धिनी ग्रामीण शिक्षण संस्थेला स्कूलबस खरेदी करण्यासाठी देखील वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निर्णयामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील नाभिक समाज हा आपल्या मेहनती आणि सामाजिक सक्रियतेमुळे ओळखला जातो. समाजाच्या या मूलभूत गरजेची जाणीव ठेवून आमदार तांबे यांनी निधी मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला…

Read More

संगमनेर: दिवाळी सणाच्या तोंडावर एका बाजूला शेजारील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, दूध संस्था आणि अमृत उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांनी तब्बल १५० कोटी रुपये बाजारात आणल्याने संगमनेर परिसरातील बाजारपेठेची अर्थव्यवस्था बळकट होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र शेजारच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याची वेळ आली आहे. थकीत ऊस पेमेंट आणि अपुरा बोनस यामुळे विखे पिता-पुत्रांच्या कारभारावर प्रवरा परिसरातील शेतकरी मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. थकीत ऊस पेमेंटमुळे शेतकरी संकटात – ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे आनंदाचा सण असतो. मात्र, अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या…

Read More

आज अमावस्या (दर्श अमावस्या) श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन, दीपावली, धनलक्ष्मी योग. आजचा दिवस अनेक राशींसाठी चांगला असून चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही राशींनी आरोग्याच्या आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. मेष (Aries) – कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि व्यापारामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मोठा व्यावसायिक ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील आणि प्रेम व संततीची स्थितीही उत्तम असेल. वृषभ (Taurus) – कामाची मागणी जास्त राहील, पण पुरवठा कमी होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. थोडा चढ-उतार असूनही अखेरीस विजय तुमचाच होईल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणे आवश्यक आहे. मिथुन (Gemini) – तुमच्या…

Read More

संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गाची दुरवस्था सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी ‘विकतचे दुखणे’ ठरत आहे. टोल भरूनही खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजित तांबे यांनी महामार्गाची समस्या आणि सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रवाशांना भेडसावणारा फटका तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसांत पुण्यात किंवा मुंबईत राहणारे संगमनेरकर किंवा नाशिककर याच महामार्गाचा वापर करतात. इतकेच नव्हे, तर समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारला जाणारे लोक देखील याच महत्त्वाच्या महामार्गाने जात आहेत. मात्र, आज या महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून, टोल भरूनही प्रवाशांना खड्ड्यांच्या…

Read More

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. विभागाने तब्बल ४७ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदांवर पदोन्नती दिली आहे.  या निर्णयामुळे महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही आनंदाची बातमी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या प्रलंबित होत्या, यामुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत होता. महसूल विभागाने यंदा दिवाळीपूर्वीच ही पदोन्नती देऊन अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या शासन आदेशानुसार, पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत…

Read More