Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हे घाट परिसरात मोठी कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रमांक एम.एच. ४६ एक्स. ४०४६) संशय आला. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला मोठा साठा मिळून आला. यामध्ये ६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा विमल पान…
संगमनेर, प्रतिनिधी – शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ किलो ४९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केली असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान सुकेवाडी येथील समनापूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २६, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय २१, रा. शिर्डी,…
संगमनेर, प्रतिनिधी – मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून ‘हे करावंच लागेल’ असे भीष्म गर्जना करणाऱ्या संगमनेर २.० च्या मोहिमेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी नेहमीच सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या नवीन नगर रस्त्यावर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईची फलनिष्पत्ती समोर येण्यासाठी संगमनेरकरांना काही दिवसाची वाट बघावी लागणार आहे. संगमनेर नगर परिषदेने आत्तापर्यंत केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमा अक्षरशः फार्स ठरल्या आहेत. अतिक्रमण आणि नवीन नगर रोड हे पालिकेच्या दृष्टीने एक समीकरण बनले आहे. शहरातील कोणत्याही गल्लीबोळातील अतिक्रमणांना हात न लावणाऱ्या नगर परिषदेसाठी कारवाईचा गाजावाजा करण्याकरता नेहमी नगर रोड प्राधान्य क्रमावर…
दैनिक राशीभविष्य: २ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला मोठी संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे, परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करताना मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वृषभ आज तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांना आज अपेक्षित नफा मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मनात असलेले जुने विचार बाजूला सारून भविष्याचा विचार करणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. मिथुन आजचा दिवस बौद्धिक कामांसाठी उत्तम आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण केली जात असून, भविष्यात स्थानिक तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या सुमारे एक कोटी रुपये निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या कामाचा आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह कपिल पवार, प्रमोद राहाणे, जनार्दन आहेर आदीसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विखे म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने…
एखाद्या संस्थेला किती महत्व द्यायचं याचं मापदंड नसल्याने बिनकामाच्या संस्थांचं महत्व कमालीचं वाढतं. पात्रता नसताना महत्व मिळाल्याने या संस्थांना आभाळ ठेंगणं होतं. आणि या संस्था देशाची इभ्रत रस्त्यावर घालवायला मोकळ्या होतात. सत्ताधार्यांनी मोठ्या गाजावाजाने प्रोजेक्ट केलेल्या गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीचं असंच काहीसं सुरू आहे. इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांना बदनाम करणं, त्या संघटनांविरोधी निदर्शनं करणं, त्यांच्यावर दगडं फेकणं असल्या राजकारणासाठी ज्यांचा वापर खुबीन केला जातो, अशा काही मोजक्या संस्थांमध्ये गलगोटीया युनिव्हर्सिटीचा अंतर्भाव होतो. विरोधकांना जो कोणी धडा शिकवेल त्यांच्यासाठी हिरवा गालीचा अंतरण्याचे उद्योग सत्ताधार्यांनी 2014 पासूनच सुरू केले आहेत. याची फळं गलगोटीया नावाच्या युनिव्हर्सिटीने नुकतीच देशवासीयांना चाखवली. हा केवळ राजकीय खेळ नाही. युनिव्हर्सिटी…
दैनिक राशीभविष्य: १ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा असेल. प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, तर व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्साहाच्या भरात कोणालाही वचन देताना विचारपूर्वक द्या. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यातील चिंता कमी होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन गुंतवणुकीचे विचार मनात असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला आज वाव मिळेल. मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. कामाच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – सत्ता आणि पद हे केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ते जनसेवेचे एक पवित्र माध्यम आहे, हाच विचार घेऊन संगमनेर नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी त्यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून उद्या येत्या १ मार्चपासून ते प्रभागातील प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. निवडून आल्यानंतर अनेकदा लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संपर्क कमी होतो, अशी तक्रार नागरिकांमध्ये असते. मात्र, योगेश जाजू यांनी याला छेद दिला आहे. मी तुमच्या मताने निवडून आलो असलो, तरी खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे,…
संगमनेर, प्रतिनिधी – शहर परिसरात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३२ किलो ८४५ ग्रॅम गांजा जप्त करून खळबळ उडवून देणाऱ्या पोलीस कारवाईला आता कायदेशीर प्रक्रियेत एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या परवेझ दाऊद शेख याला संगमनेरच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ११ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री संगमनेर शहर पोलिसांनी ‘गोल्डन सिटी’ परिसरात गुप्त माहितीच्या आधारे मोठी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३२ किलो ८४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या मोठ्या साठ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act)…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात रविवारी (१ मार्च) राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या दौऱ्यात चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच हिवरगाव पावसा येथील निळवंडे प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्यावरील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या सी.आर. एस्केप कामाचे लोकार्पण होणार असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यान बसवण्यात आलेल्या नव्या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.…
