Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज – एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना बोपदेव घाटात ६ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की, पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव यांनी त्यांना थांबवले. या दोघांनी विद्यार्थ्यांची बँग तपासली आणि हुक्क्याचे साहित्य त्यांच्याजवळ आढळल्याचे सांगितले. या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वडतीले आणि जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर, मध्यस्थीनंतर, केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोवंश कत्तलखाने सुरु असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धडक कारवाई करत ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सणाचे औचित्य साधून अवैध गोमांसाची खरेदी-विक्री व कत्तलीच्या घटना वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…
मोठा गाजावाजा करत नागपूर ते इगतपुरी दरम्यानच्या समृध्दी महामार्गाचं तिसरं उद्घाटन पार पडलं. महामार्गाचा हा अंतिम टप्पा असल्याने या उद्घाटनाला महत्व प्राप्त होणं स्वाभाविक होतं. हा महामार्ग हाती का घेण्यात आला याविषयी आजही कुतुहल आहे. महामार्ग झाला की असंख्य उद्योग विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागास भागात येतील, परिणामी शेतकर्यांच्या मुलांना उद्योग आणि नोकर्या उपलब्ध होतील, असा गुळाचा खडा सरकारने तिथल्या जनतेच्या हाताला चिकटवला होता. महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत सुरू करण्यात येऊन दीड वर्षांचा अवधी पुढे गेला. ज्या कारणासाठी महामार्गाची उभारणी करण्यात आली त्या विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग वाढीला चालना मिळालीच नाही. मागास भागाचा विकास होत असेल तर अशा महामार्गाला विरोध…
संगमनेर, प्रतिनिधी पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या…
मुंबई । प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी १०० अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांकडून स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत.…
संगमनेर / छत्रपती संभाजीनगर – श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला बीडच्या वडवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी संगमनेरच्या तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभवी शेटे (बनावट नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) आणि यमुनाबाई (मध्यस्थी) यांचा समावेश आहे. या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अनेक गरीब,…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील राहाणेमळा परिसरात असलेल्या हॉटेल सुरजच्या व्यवस्थापकाला चॉपरचा धाक दाखवून गल्ल्यातील सुमारे साडेअकरा हजाराची रोख रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणांनी हा प्रकार केला असून त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढीस लागले असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी असलेले धीरज राजेंद्र पावडे, अक्षय रामा भुजबळ आणि शुभम दिवे या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास राहाणे मळा येथील हॉटेल सूरजमध्ये प्रवेश केला. पावडे याने हॉटेलचे व्यवस्थापक हरीश थोरात यांना…
संगमनेर – प्रतिनिधी निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले. आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरणासह कालव्यांचे निर्माते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. घुलेवाडी येथे जलपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच निर्मला राऊत, भाऊसाहेब पानसरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, भास्कर पानसरे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक कार्यकर्ते तसेच घुलेवाडी विविध कार्यकारी…
संगमनेर, प्रतिनिधी: रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करावेत, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. महायुतीच्यावतीने संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवराज्याभिषेक दिन आमदार खताळ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना खताळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे रयतेच्या हितासाठी काम केले, त्याचप्रमाणे त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करून रयतेच्या भल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार झाल्यावर आपण संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती आणि उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते. त्यानुसार, संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती…
मुंबई – राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला हा निधी आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरला जात असल्याने या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय विभागाला वारंवार फटका… ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला होता. याआधी निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा त्यांच्या विभागातून ४१०.३० कोटी रुपये वळवण्यात आले आहेत, यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज, पुणे पुणे शहरातील महात्मा फुले मंडईजवळील मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने एका व्यक्तीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कातरड येथील रहिवासी रमेश प्रकाश सत्रे (वय २१) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. शहराच्या विविध भागांमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या सात दिवसीय शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यास खरी क्रांती घडते, असे प्रतिपादन केले. हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि हरी ओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. शिवगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना हिंदू धर्माचा…
प्रतिनिधी, संगमनेर – ऊस आणि दूध ही शाश्वत पिके असून, संगमनेर तालुका एक कुटुंब आहे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, आगामी काळात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीच्या पहिल्या मिल रोलर पूजनावेळी थोरात बोलत होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे,…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त बुधवारी (४ जून) निघालेल्या भव्य शोभायात्रेने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः केरळी बँड आणि माहेश्वरी महिलांच्या टाळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय माहेश्वरी समाज बंधू-भगिनींची आकर्षक वेशभूषा आणि शोभायात्रेतील नियोजनबद्धता हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. आमदार अमोल खताळ यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत माहेश्वरी बंधू-भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या. महेश नवमीनिमित्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी व शैलेश कासट आणि शिवानी व कृष्णा आसावा यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर लगेचच शोभायात्रेचा शानदार शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन आणि रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदरपणे केली…
संगमनेर, प्रतिनिधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले. चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेची…
मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता कधी देणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सन्मान निधीच्या वितरणाची माहिती दिली असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच आजपासून (५ जून) हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी जमा न झाल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी दिसून येत होती. निवडणुकीपूर्वी वेळेवर पैसे जमा करणाऱ्या सरकारकडून निवडणुकीनंतर या योजनेत दिरंगाई होत असल्याची चर्चा होती. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत महिलांना दिलासा दिला आहे. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये…
संगमनेर (प्रतिनिधी): माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज,…
विशेष प्रतिनिधी / मुंबई युती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. त्याने सांगितल्याशिवाय महाजन फाइल्सवर सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…
मुंबई, ४ जून २०२५: भाजप महायुतीचं सरकार जनतेच्या हिताऐवजी अदानी समूहाच्या फायद्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानींना दिल्या गेल्या असून, आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळच त्यांना देणं बाकी आहे का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईतील दोन्ही विमानतळे, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील ८.५ हेक्टर मदर डेअरीची जमीन आणि वांद्रे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानींना देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अदानींच्या घशात घालून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, असा प्रश्न त्यांनी…
