Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे. भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: नाशिकमधील एसएमबीटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘आरोग्यसाधना’ शिबिराचा नुकताच यशस्वी समारोप झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीच्या शिबिराने अनेक विक्रम मोडत यशाची नवीन उंची गाठली आहे. शिबिराची लक्षवेधी आकडेवारी गेल्या ३० दिवसांच्या कालावधीत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला आहे. दररोज सरासरी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे फक्त आकडे नाहीत, तर हजारो रुग्णांना मिळालेल्या उपचारांचे आणि आशेचे हे प्रतीक आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अत्याधुनिक उपचार आणि सेवा या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी ‘कोकेन’ म्हणून जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात कोकेन नव्हता. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 27 जुलै रोजी पहाटे खराडी येथील ‘स्टे बर्ड अझुर सूट’ हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये बनावट नोटा, त्यांना तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी आणि एक वाहन यांचा समावेश आहे. या प्रकरणी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आंबिलवाडी शिवारात दोन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ते पान टपरीवर ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव: एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: चारित्र्याच्या संशयातून एका 65 वर्षीय पतीने आपल्या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असून, आरोपी पती दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. घारगाव येथे राहणारे दगडू खंदारे हे शेती व्यवसाय करतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाने नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवणाच्या वेळी दगडू खंदारे यांनी पत्नी चंद्रकला यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्यासोबत वाद घातला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: भोजापूर चारीचे पाणी वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षासह ग्रामस्थांनी यासंदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून, ग्रामपंचायतीनेही याबाबत ठराव केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, वडझरी गावातील शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी नियमानुसार टेलपासून म्हणजे वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी अपेक्षित असताना, जलसंपदा विभागाची यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली चुकीचे काम करत आहे. हे पाणी आडमार्गे इतरत्र वळवले जात असल्याचा आरोप…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ शनिवारी, (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ पासून अमृत उद्योग समूह आणि विविध सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: कर्जदाराकडून कोरा धनादेश घेऊन तो कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करून धनादेशाचा अवमान झाला या कारणासाठी न्यायालयात कर्जदार महिलेविरुद्ध वसुली दावा दाखल करणाऱ्या संस्थेला संगमनेर न्यायालयाने दिलासा न देता कर्जदार महिलेची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. शारदा बाळू जगधने यांनी सन 2019 मध्ये मुंबईस्थित सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. या कंपनीच्या संगमनेरमधील कार्यालयाकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी 2,35,241/- रुपये झाली होती. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपी कर्जदार महिलेने संस्थेला सदरचा धनादेश दिल्याचे तसेच या खटल्यासाठी संबंधित कंपनीने व्यवस्थापकाला प्राधिकार पत्र दिल्याचे सांगत न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्यातील २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३० लाख अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळेल. या विशेष मोहिमेअंतर्गत ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित केली जातील, तर उर्वरित अतिक्रमणांवर बाजारमूल्यानुसार दंड आकारून ती नियमित केली जातील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेला गती आणि मालकी हक्काचे स्वप्न पूर्ण- या निर्णयामागे पंतप्रधान आवास योजनेतील ३० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी घराची मालकी असणे बंधनकारक आहे. अतिक्रमणे नियमित झाल्याने संबंधित व्यक्तींच्या नावावर जमीन होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेटसमोरील हॉटेल स्टेटसजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८ कोटी रुपये निधीतून साकारत असलेला हा उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांना आळा घालणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. माझे घर सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता, थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी मिळवला होता. सुरुवातीला एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी दुसऱ्या बाजूचे काम काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका हॅकरने प्रवेश करत एपीके (APK) फाईल शेअर केली. या फाईलवर क्लिक करताच एका पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल साडेसात लाख रुपयांना फसवणुकीचा फटका बसला आहे. सायबर भामट्याने त्यांच्या नावाने कर्ज काढून ती रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस आणि सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणारे एक पोलीस शिपाई सप्टेंबर २०२४ पासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार आणि…
मुंबई: नियंत्रक शिधा वाटप व संचालक कार्यालयातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम याला गॅस एजन्सी चालकाकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, (२९ जुलै) रंगेहाथ पकडले. निकमने मासिक ‘हफ्ता’ म्हणून ही रक्कम मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या नातेवाईकांची ठाण्यात गॅस एजन्सी आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर, तर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या ठाणे येथील गॅस एजन्सीवर कारवाई केली होती. १६ जुलै २०२५ रोजी निकमने तक्रारदारांना कार्यालयात बोलावले. १७ जुलै रोजी झालेल्या भेटीत निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर पुढील कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (आज) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. या निर्णयांमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करणे, १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणे, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, अशा विविध घोषणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने घेतलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे: * ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. एकूण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: आमदार सत्यजित तांबे मित्र परिवार आणि जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यावतीने संगमनेरकरांना नागपंचमीच्या शुभेच्छा देणारा फलक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार मंगळवारी पुन्हा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात राजकीय वर्चस्वातून फ्लेक्स फाडले जात आहेत की नशेडी, गंजडी हे प्रकार करत आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या मुक्त आशीर्वादाने संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू आहे. आम्हीच कसे समाजाचे उद्धारकर्ते आहोत हे फ्लेक्स च्या माध्यमातून दाखविण्याच्या नादात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अनंत पांगारकर – संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आमदार सत्यजित तांबे यांनी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीत कार्यरत असलेल्या तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील यांच्यासह समाजातील विविध घटकांचे ११४ प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या सर्व प्रश्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आणि आगामी काळात त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सोशल माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयूआय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अहिल्यानगर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा मोठ्या वादंगात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण आले असून, देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी आधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी संशयास्पद परिस्थितीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शनिशिंगणापूर आणि अहमदनगर जिल्ह्याभरात “देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि चौकशीच्या भीतीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. गावातील अनेक…
