Author: Annant Ppangarkar

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी –  छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी सांगितलेला मानवता धर्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिवादन केले. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गणेश मादास, रामहरी कातोरे, जीवन पंचारिया, धीरज टाक, डॉ. सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सुमित पवार,…

Read More

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शिवजयंती रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक अवधूत खोल्लम, संगमनेर शहर मंत्री हर्ष खोल्लम, संगमनेर शहर सहमंत्री प्रणव आसने, संगमनेर सहमंत्री मधुरा पोळ, संगमनेर कार्यालय मंत्री अक्षदा गोसावी, तंत्रनिकेतन अभियांत्रिकी प्रकल्प संयोजक वेदांत काळे, जिज्ञासा संयोजक विजय गडाख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. या वेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा…

Read More

अहिल्यानगर, दि. १९- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून…

Read More

अकोले, दि. १९ फेब्रुवारी – अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. ५ वर्षाच्या बालिकेला आपल्या घरी बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात पोस्को कायदा कलम ४, ८, १२, ०९ (एम), अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश कासार याने रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित पाच वर्षाच्या बालिकेला आईने घरी बोलावले आहे असे सांगून स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत…

Read More

संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे सुरू असलेल्या कादर शहावली संदल दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून सात जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापुर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. ज्यावेळी दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गॅरेज व्यवसाय करणारा पंकज गोरक्षनाथ नेहे (वय ३२, रा. चांडे वस्ती, निळवंडे रोड, समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) हा तरुण सोमवारी (१७…

Read More

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी – नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी बदल्या केल्या. यात आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा समावेश असून त्यांच्यावर पुण्यात आता मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून ते पुण्याचे नवे साखर आयुक्त असतील. सालीमठ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या… १) डॉ. विजय सुर्यवंशी (IAS: NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २) डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ३)…

Read More

अहिल्यानगर, दि. १८ फेब्रुवारी – खांबावर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संगमनेरमधील अकॅडमी चालकाविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील जाहिरात फलकांचा (फ्लेक्स) विषय चर्चेत आला आहे. अहिल्यानगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी संगमनेर येथील आर्य अकॅडमी चे सुनील खंडेराव फटांगरे (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम २९९६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी…

Read More

संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी –  सकल मराठा समाजाच्यावतीन गेल्या दहा वर्षापासून १९ फेब्रुवारीला संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे. शिवजयंती उत्सवावरून संगमनेरमध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्यावतीने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता.  यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य…

Read More

संगमनेर दि. १८ फेब्रुवारी –  वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला.  यावेळी बाबासाहेब…

Read More

मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी –  नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे…

Read More

संगमनेर, दि. १७ फेब्रुवारी –  अनेक गावांसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला आहे. तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील डाव करत आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल, असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदन देत प्रशासनाला दिला आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ६२ गावांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कार्यालयासमोर ‘जबाब दो’ म्हणत आंदोलन केले. यावेळी आर. बी. राहणे, भाऊराव रहाणे, शांताराम कढणे, सुभाष गुंजाळ, अरुण गुंजाळ, सिताराम…

Read More

अहिल्यानगर, दि. १७ –  जिल्हा नियोजन समितीने डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०२४-२५ अंतर्गत मदरशांमध्ये मूलभूत आणि आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.  इच्छुक मदरशांनी २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे सदस्य सचिव दीपक दातीर यांनी केले आहे. मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना मिळेल. एसपीक्यूईएम या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या मदरशांना ही योजना लागू राहणार नाही.  मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम राज्यशासनाच्या अन्य शाळांप्रमाणे राहील. तसेच, शिक्षकांचे प्रतिदिन ५ तासिका याप्रमाणे…

Read More

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी –  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवारी (१८ फेब्रुवारी) मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील.   काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते. या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर…

Read More

संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या संगमनेर मधील जोशी स्वीट होम वरील कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या युवा नेत्यामार्फत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.कच्चा आणि शिळा मिठ्ठावडा ग्राहकाला देऊन त्याच्याशी वाद घातल्याचा प्रकरणाचा व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर संगमनेर मधील जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. जोशी स्वीट होम मधील मिठाईसह अन्नपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी केली होती. तपासणी दरम्यान काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले होते. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळून आल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अन्न व औषध…

Read More

संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी संगमनेरकर नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करण्याचे तसेच कारवाई टाळण्याचे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे. कोकरे म्हणाले, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे. मार्च महिना जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे विशेष वसुली अभियानांतर्गत शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी करायची ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा थकबाकीदारांवर नळ जोडणे तोडण्याची, मालमत्ता जप्तीची, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तसेच शहरातील विविध भागात…

Read More

अहिल्यानगर दि. १६ –  महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक खासगी दवाखान्यातून रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने दोन्ही योजनांशी संलग्नित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालये संलग्नित करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अभिलाषा खरसडे, डॉ. अनिकेत भालसिंग, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, विठ्ठल वांढेकर, हर्षल साळवे, शरद कोंडा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी…

Read More

नवी दिल्ली –  नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री दहा वाजता झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला असून १० लोक जखमी झाले आहे. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर भाविक प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यामुळे महाकुंभला जाण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत. महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर मोठी गर्दी होती.…

Read More

दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उधळलेल्या स्तुती सुमनांनी राजकारणातील अनेकांची झोप उडवली आहे. त्यात सर्वाधिक गारद झाली ती अर्थातच महाविकास आघाडीतील शरद पवारांची सोबती शिवसेना. शिंदेंवरील स्तुती शिवसेनेला मानवली नाही. त्यांनी पवारांवर टीका डागली. ज्यांची पत नाही, तेही बोलले आणि ज्यांची आहे त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता टीकेची झोड उठवली. ज्यांना पवारांच्या अशा भूमिकेची जाणीव आहे, ज्यांना पवारांच्या स्तुतीमागची गणितं ठावूक आहेत, तेच पवारांना ओळखू शकतात. गेल्या चार वर्षांची सोबत असलेल्या उध्दव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेच्या नेत्यांनाही ते जमलेलं नाही, हे मान्य करावं…

Read More

अहिल्यानगर, दि. १५ –  जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. समितीने अर्जदार व…

Read More