Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केले. निमित्त होते, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीच्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाच्या पाहणीचे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडल वरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाड यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात सुरू असलेली वादाची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे हा वाद भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पेटला आहे. छत्रपती विषयी अवमानकारक बोलणाऱ्या भाजपच्या वाचाळवीरांमध्ये आता प्रसाद लाड यांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. राज्यपाल पदावरील…

Read More

रविवार विशेष एसएमबीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. या पेटंटचे पुढील २० वर्षांपर्यंत ‘एसएमबीटी’कडे अधिकार राहणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लहानपणी घरातील वृध्द आजीबाई काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी…

Read More

महाराष्ट्रात भाजपाने शिंदे गटाशी युती केल्यानंतर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने विधान केले, खरंतर त्यांनी समान नागरी कायदा हा लोकसंख्या नियंत्रणाच्या कामी गरजेचा असल्याचे म्हटले आहे. गुजरात निवडणूकीनंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचे संकेत दिले. भारतात गोवा राज्यामध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. उत्तराखंड राज्यांमध्ये सदर कायदा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. हा कायदा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंतर हा कायदा काय आहे, त्याबाबत अनेक अफवा, समज- गैरसमज…

Read More

रविवार विशेष । प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) अभिसार शर्मा, प्रसुनकुमार बाजपेयी, राजदीप सरदेसाई, आशुतोष, नवीनकुमार, अजित अंजूम, निखिल वागळे या दिग्गजानंतर आता वेळ आलीय रविश कुमार यांची. सत्तेला जे पचत नाही त्यांना मुळासकट उखडून टाकण्याचा बाणा मोदी सरकारने हाती घेतलाय. या बाण्याचे देशातील पत्रकारांमधले सत्तरावे बळी ठरलेत रविश कुमार. सारी माध्यमं सरकारपुढे लोटांगण घालत असताना जाब विचारणाऱ्या एनडीटीव्हीला टाळं ठोकण्याचा पराक्रम मोदी सरकारने करून पाहिला. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिकांवर नको-नको ती बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपला आवाज एनडीटीव्हीने तेवत ठेवला. रविश कुमार यांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडलं.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची घोषणा करत २०६३ पदांची भरती केली जाणार आहे. खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखीने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा, मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबईत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली. दिव्यांगांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राष्ट्र ठरले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात स्वतंत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामावर असलेल्या सुरक्षारक्षकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी गजाने मारहाण करून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यास तब्बल पाच महिन्यानंतर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. ऋषिकेश सदाशिव वाव्हळ (वय २३ वर्ष) या तरुणाला पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र होंडा शोरूम च्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लक्ष्मण चांगदेव फटांगरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. यावेळी त्यांच्यासह आणखी एक सहकारी होता. ५ जुलैला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना हालचाल जाणवली, त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला हटकले असता तेथे असलेल्या लोखंडी गजांची चोरी करण्याचा प्रयत्न असलेल्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात गजाने प्रहार केला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोघेही तरुण नात्याने चुलत भाऊ असून तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी आहे. आकाश विलास कुळधरण आणि ऋषिकेश विजय कुळधरण अशी या दोघा मृत भावंडांची नावे आहेत. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूने वडगाव पान गावात हळहळ व्यक्त होत आहे. लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत असलेली पिकअप आणि मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. याच दरम्यान दुचाकीवरून जात असलेले दोघे तरुण या अपघातात सापडले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर नजीक असलेल्या रायतेवाडी फाटा येथे एसटी बस आणि हुंडाई कारच्या झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहे. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातासंदर्भात अधिक माहिती अशी, नासिक येथील मित्तल कुटुंबीय गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हुंदाई कारमध्ये संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांची कार रायतेवाडी फाटा येथे आली असताना समोरून पुण्याहून संगमनेर कडे येणाऱ्या एसटी बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात अजयकुमार राजेंद्रकुमार मित्तल, त्यांची पत्नी दीपशिखा अजयकुमार मित्तल, मुलगा शिखर अजय कुमार मित्तल आणि सून आहण शिखर मित्तल (सर्व रा. फ्लॅट नंबर ८, साईप्रसाद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अल्पवयीन मुलीस रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथे हा प्रकार घडला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द येथे तक्रारदाराचे कुटुंबीय राहत असून ते मोलमजुरी करतात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कामावर जाण्यासाठी कुठले असताना त्यांची सोळा वर्षे सहा महिने वयाची मुलगी त्यांना अंथरुणावर झोपलेली दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात संगमनेर शहरात आणि नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला, मात्र ती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज न्यायालयात सुरू असलेल्या खून आणि मोका केस मधून तक्रारदाराच्या मावस भावाला सुटकेसाठी मदत करण्याकरिता सत्र न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकाने तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात हा लाचखोर लिपिक दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. सचिन अशोक देठे वय ३९ वर्ष असे या लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. लाच लुचपत विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. तक्रारदाराच्या मावस भावाविरोधात खून व मोका केसचा खटला पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून केस मधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगत सत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता. दोषारोप पत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला. अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  वाळू लिलावासाठी शासनाच्या नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळूचे डेपो उभे करून ऑनलाईन पद्धतीने वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वाळूचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महसूल यंत्रणेच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत मंत्री विखे बोलत होते. त्यांनी जनावरांच्या लम्पी स्किन संदर्भात देखील आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नंदूरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी महेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अनुवादित ‘सिटीझनविल’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 डिसेंबरला साडेतीन वाजता मुंबईमध्ये होत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ‘सिटीझनविल’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. प्रकाशनापूर्वीच तांबे यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी शहरांचा विकास नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेच झालंय, किंबहुना ती काळाची गरजच बनली. ही नियोजनबद्धता आणण्यासाठी हवा असतो एक वेगळा दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न.…

Read More