Author: अनंत पांगारकर
संगमनेर- यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरून निर्माण झालेल्या वादावर मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव (आप्पासाहेब) खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी मानपत्रावरून नाराजी व्यक्त करत मिरवणुकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद समोर आला होता. रंगारगल्लीतील १३० वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते. संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळाने दोन्ही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती. दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आरती व्यवस्थित पार पडली. मात्र, त्यानंतर…
श्रीरामपूर – गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे. महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला. गणेश विसर्जन…
गेल्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणानंतर सुरू झालेल्या चर्चा प्रचंड अस्वस्थ करणार्या आहेत. जरांगेंचं उपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारने ठेवलेल्या प्रस्तावाचा स्वीकार मराठा समाजातील असंख्य बांधवांना विशेषत: प्रस्तावाची चिकित्सा करणार्या अनेक मान्यवरांना अमान्य वाटतो आहे. न्यायालय आणि कायद्याची भीती दाखवून मुंबई खाली करण्यासाठी सरकारने सरकारने मनोज जरांगेंना गळी पाडलं, असा आरोप केला जातो आहे. अशा आंदोलनाचा राजकीय फायदा उपटता येईल, असे प्रयत्न सत्ताधारी भाजपने पध्दतशीर केले. आंदोलनाचा एकनाथ शिंदेंना यापूर्वी झालेला फायदा आता होऊ नये, म्हणून पध्दतशीर फिल्डिंग लावली गेली. 16 ऑगस्ट 2011 या दिवशी दिल्लीच्या रामलिला मैदानात आमरण उपोषण पुकारून अण्णा हजारेंनी सार्या…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. संयम ठेवा, यश निश्चितच मिळेल. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास करण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer) – आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, पण…
संगमनेर : गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. साकुर गावातील बन परिसरात दोन सख्ख्या चुलत बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दोन मुलींची नावे तन्वी अजय सगळगिळे (वय १७) आणि मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १५) अशी आहेत. दोघीही चुलत बहिणी होत्या. रविवारी दुपारी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आणि पुढील तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दोन तरुणींनी आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं…
संगमनेर – संगमनेर शहरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. या गणेशोत्सवाचा समारोप एकविरा फाऊंडेशनच्या साडेपाचशे युवा स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीमुळे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली या युवक-युवतींनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना मदत केली आणि प्रवरा नदीकाठची स्वच्छता करून निर्माल्य संकलन केले. या उपक्रमासाठी एकविरा फाऊंडेशन आणि संगमनेर नगरपालिका यांनी संयुक्तपणे प्रवरा नदीकाठी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाचशे युवक-युवतींनी नागरिकांना विसर्जनासाठी मदत केली आणि…
संगमनेर- शहरातील गणेश नगर येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती गंगाधर गोरडे (वय ७३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती गोरडे यांची सप्तशृंगी देवीवर अपार श्रद्धा होती. त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील योगदान मोठे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा मोठा परिवार आहे. गुंजाळवाडी येथील माजी उपसरपंच रामदास रामचंद्र राहणे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ राहणे यांच्या त्या भगिनी होत्या. तसेच, सेवानिवृत्त सहायक निबंधक ॲड. अनिल भांगरे यांच्या त्या सासू होत्या.
संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीची छायाचित्रे…
जामखेड: शहराच्या शिवाजीनगर भागात एका 15 वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरात शोककळा पसरली आहे. भक्ती गणेश गायकवाड (वय 15, रा. शिवाजीनगर, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. भक्तीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नातेवाईक तुकाराम मोरे आणि इतरांनी तिला तातडीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव…
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण घेऊ नका. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. मिथुन (Gemini) – आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कर्क (Cancer) – आजचा…
