Author: Annant Ppangarkar

विशेष प्रतिनिधी / मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा सहा वर्षानंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर दुसरा आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू…

Read More

शिर्डी (अहमदनगर) दि. ५ एप्रिल –  एकीकडे शिर्डीमध्ये रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना, दुसरीकडे एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे अज्ञात व्यक्तींनी दोघांची निर्घृण हत्या केली आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत साहेबराव भोसले (वय ६०) आणि त्यांचे पुत्र कृष्णा भोसले (वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. साहेबराव यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी घरात प्रवेश…

Read More

संगमनेर, दि. ५ एप्रिल – प्रतिनिधी छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागड किल्ल्याचे तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या पेमगिरी येथील विशाल वटवृक्षाच्या परिसराचा विकास करण्यासाठी मोठा निधी आणला जाईल, अशी ठोस ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडच्या विकासाचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच विधिमंडळात मांडून शासनाचे लक्ष वेधले. या प्रयत्नांबद्दल पेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने आमदार खताळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार खताळ यांनी सांगितले की, शहागड तसेच महाकाय वटवृक्षाचा समावेश पर्यटन विकास आराखड्यात करण्यासाठी आपण पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करत…

Read More

मुंबई, दि. ४ एप्रिल – विशेष प्रतिनिधी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एका गर्भवती महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याच्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी करूनही रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीत उपसचिव यमुना जाधव (मुख्यमंत्री सचिवालय प्रतिनिधी), सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी (धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष), सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य…

Read More

संगमनेर, दि. ४ एप्रिल –  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर सेवक संचालकपदाची नियुक्ती ३० दिवसांत कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आणि याचिकाकर्ते धनंजय भंडारे यांनी या संदर्भात माहिती दिली. उच्च न्यायालयाने नाशिक विभागाच्या सहकार खात्याच्या सहनिबंधकांना हे आदेश दिले आहेत. संघटनेने जिल्हा सहकारी बँकेवर विद्या अजय तन्वर आणि श्रीमंत घुले यांची, तर संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर वाघोबा शेलार आणि तुकाराम सांगळे यांची सेवक संचालक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित बँकांनी ही नियुक्ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. या विरोधात संघटनेने प्रथम नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे…

Read More

संगमनेर, दि. ४ एप्रिल – राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आतापर्यंतच्या दोन दिवसात केवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज साकुर, जोर्वे आणि सोसायटी मतदारसंघातून दाखल झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

नांदेड, दि. ४ एप्रिल –  नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी (दि. ४) पहाटे भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावातील महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चित्राबाई माधव पारदे, सिमरन संतोष कांबळे, सपना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३५), सरस्वती लखन बुरड (२५), ताराबाई सटवा जाधव (४०), धुरपता सटवा जाधव (१८) यांचा समावेश आहे. पार्वतीबाई बुरड (३५), पुरभाबाई कांबळे (४०) आणि सटवाजी जाधव (५५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुंज येथील १० महिला व एक पुरुष आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरने निघाले होते. आलेगाव शिवारात…

Read More

नवी दिल्ली, दि. ४ एप्रिल –  वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने मांडलेले वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ राज्यसभेत मंजूर झाले आहे. बारा तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर ९५ सदस्यांनी याला विरोध केला. यापूर्वी, लोकसभेत हे विधेयक २८८ मतांनी मंजूर झाले होते. दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यामुळे, आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. हे विधेयक अब्जावधी रुपयांच्या वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणेल, असा सरकारचा दावा आहे. वक्फ मालमत्तांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि मुस्लिम समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तथापि, विरोधी पक्षांनी या विधेयकावर चिंता व्यक्त केली आहे. या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई देशाच्या न्यायव्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची घोषणा सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका न्यायाधीशाच्या घरी आग लागल्यानंतर मोठी रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर या न्यायाधीशाची बदली करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकारचा निर्णय घेतल्यानं इतरही न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या संदर्भात असाच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण न्याय वृंदाच्या बैठकीत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. मालमत्तेची ही माहिती न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड कारण्याचंही ठरवण्यात आलं. १ एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर…

Read More

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी बुधवारी संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई दगावल्या होत्या, या ठिकाणी आमदार खताळ यांनी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच, शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नांदुरी दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली होती. या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात आमदार खताळ यांनी कांदा, द्राक्ष, डाळिंब,…

Read More

राहाता, दि. ३ एप्रिल –  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने खाजगी संस्थांनाही सदस्यत्व देण्यास सुरुवात केल्यामुळे, ही संस्था आता राजकीय अड्डा बनत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. या संस्थेने सहकारी संस्थांना बळकट करण्याचे धोरण अवलंबायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकारी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. शरद पवारांचे नाव न घेता, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली की, ‘जाणते राजे’ देखील दिल्लीत केवळ शिष्टमंडळ घेऊन जातात. सहकारी संस्थांचे प्रश्न न सुटल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या आहेत. कारखान्यांचे खाजगीकरण झाले आणि ते कवडीमोल भावाने विकले गेले. सहकारी संस्थांना…

Read More

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक असलेले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोरात यांनी गुरुवारी अनुक्रमे जोर्वे, साकुर आणि उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या तीन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी माजी मंत्री थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कारखाना निवडणुकीने पहिल्याच दिवशी वेग पकडला आहे. विरोधकांनी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून यावेळी निवडणूक रंगण्याची…

Read More

नवी दिल्ली, दि. ३ एप्रिल – नुकताच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव लोकसभेत मांडला. विरोधकांनी या विषयावर त्यांची मते मांडली, आणि अमित शाह यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर, आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदार अनुपस्थित होते. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी चर्चेची सुरुवात केली आणि मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदींनी एकदा मणिपूरला भेट द्यावी, अशीही मागणी केली. अमित शाह यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर…

Read More

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी काल (बुधवारी २ एप्रिल) संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्या. या घटनेमुळे घुले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आज तातडीने घुले कुटुंबीयांची भेट घेऊन याबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात यांनी दु:ख व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. डॉ. थोरात म्हणाल्या, “शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुधाचा…

Read More

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनी-मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही शोभायात्रा रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता संगमनेरमधील अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरातून निघेल. श्रीराम जन्मोत्सव रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता साजरा केला जाईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व बजरंग दल शाखा, प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. शोभायात्रेत भव्य धार्मिक देखावे, अयोध्येतील श्रीरामलल्लांची भव्य मूर्ती, महाबली हनुमानाची भव्य मूर्ती, केरळमधील पारंपारिक नृत्य आणि वाद्ये, श्रीराम…

Read More

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. २) दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील सावरगाव तळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी आणि कौठे धांदरफळ या गावांना मोठा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कौठे धांदरफळ येथे निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाईंवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, ओढे-नाले आणि डोंगर कड्यांवरून पाणी वाहत…

Read More

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार आणि पश्चिम भागात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी माजी महसूल आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर, धांदरफळ खुर्द या गावांना बुधवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे डोंगर भागातून पाणी वेगाने खाली आले आणि शेतात साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत…

Read More

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमणला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मदतीचा हा धनादेश सोमण कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला आहे.संगमनेरची सायकल पटू असलेल्या प्रणिता सोमण हिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंग मध्ये अनेक बक्षिसे मिळवत देशाचे नाव सर्वत्र उंचावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या प्रणिताचा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच डॉ. प्रफुल्ल सोमण यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी प्रणिताच्या वडिलांनी युरोपमधील प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याच खताळ यांना सांगितले. खताळ यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

शिर्डी, दि. २ एप्रिल –  थोरात कारखान्यापाठोपाठ, आता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी जाहीर केला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी ९ मे २०२५ रोजी मतदान होणार आहे, आणि १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे गुरुवारपासून (३ एप्रिल) ते ९ एप्रिल या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांचे कार्यालय, राहाता प्रशासकीय इमारत (राहाता तहसील कार्यालय) पहिला मजला, राहाता येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळतील आणि स्वीकारण्यात येतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता…

Read More

शिर्डी, दि. २ एप्रिल –  शिर्डीत शनिवारपासून (दि. ५) ते सोमवार (दि. ७) या काळात श्री साईबाबा संस्थानतर्फे ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १ लाख ७३ हजार भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या उत्सवात मुंबईच्या व्दारकामाई मंडळाने श्री गजमुख गणपतीचा देखावा सादर केला असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील एका साईभक्ताने फुलांची सजावट केली आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवात विविध ठिकाणच्या ८७ पालख्या सहभागी होणार आहेत.…

Read More