Author: Annant Ppangarkar
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल १३३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा मोठा समावेश असून विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. विरोधी उमेदवार मैदानात नसल्याने आणि विरोधकांनी कारखान्याविरोधात समाज माध्यमातून निर्माण केलेले चित्र संपुष्टात आल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा एकदा सोपी झाली आहे. कारखान्यावरील त्यांचे अधिपत्य कायम राहणार आहे. त्यामुळे कारखान्याची वाटचाल बिनविरोध निवडणुकीकडे असल्याच स्पष्ट होत आहे. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याचे निवडणूक लढविण्याचे…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष…
मुंबई, दि. ९ एप्रिल – महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार, शासनाचे महत्वाचे ऑनलाइन सेवा पोर्टल, ‘आपले सरकार’, येत्या १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) या पाच दिवसांच्या कालावधीत तात्पुरते बंद राहणार आहे. या काळात पोर्टलवर पूर्वनियोजित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांचे काम केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या हार्डवेअरमध्ये सुधारणा करणे आणि प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. यामुळे पोर्टलची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान पोर्टलवरील सर्व…
कोल्हापूर, दि.९ एप्रिल – राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज, ९ एप्रिल रोजी निर्णय येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. १२ एप्रिल रोजी कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार असून, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीन देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यावतीने वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले होते की, कोरटकरने पहिल्यांदा कॉल केल्यावर सावंत यांनी तो कट केला. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर वेगळी भाषा वापरल्याने सावंत यांनी संभाषण रेकॉर्ड केले. मात्र, कोरटकरने पोलिसांना…
मुंबई, दि. ८ एप्रिल – विशेष प्रतिनिधी राज्याच्या नव्या वाळू रेती धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यात सुरू असलेली वाळूची डेपो पद्धती बंद करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या डेपो येथील वाळू संपल्यावर बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घरकुल उभारण्यासाठी पाच ब्रास वाळू विनामूल्य देण्यात येईल तसंच प्रत्येक वाळू डेपोत दहा टक्के आरक्षण घरकुलासाठी असेल, असं जाहीर करण्यात आलंय. खाडीपात्रासाठी तीन वर्षांसाठी आणि नदीपात्रासाठी दोन वर्षांसाठी अशा लिलाव पद्धतीने वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात येईल. सरकारी विविध इमारतींच्या बांधकामामध्ये एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूचा वापर केला जाईल. तसंच पुढील कॅबिनेटमध्ये नैसर्गिक वाळू देण्याचं…
मुंबई, दि. ८ एप्रिल विशेष – प्रतिनिधी राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना नामक पक्षाच्या सुनील शुल्कांनी ही याचिका दाखल केली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान या शुक्लाचा बोलवता धनी हा भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदिप देशपांडे यांनी केला आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप सुनील शुक्लाने केला आहे. राज ठाकरेंविरोधात…
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उद्या (९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज दिवसभर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधकांनी देखील सक्रिय सहभाग दर्शविला असून, विद्यमान संचालकांनीही आपले अर्ज भरले आहेत. उद्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि…
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे ग्रामस्थांना दिला. अंभोरे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. या वेळी सप्ताह समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील गंभीर वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. खताळ म्हणाले, अंभोरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण नेहमीच तत्पर राहू. आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील. या कार्यक्रमाला संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर,…
मुंबई, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये राज्यातील विकासकामांना गती देणे, झोपडपट्टी पुनर्वसन अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध धोरणे निश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे. बैठकीतील प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे… * विकास प्राधिकरणांना शासकीय जमिनी हस्तांतरित: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांना हस्तांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे या प्रदेशांमधील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे. (नगर विकास) * राज्याचे नवीन वाळू-रेती निर्गती धोरण जाहीर: राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले आहे. (महसूल) *…
पुणे, दि. ७ एप्रिल पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिघी पोलिसांनी मोशीतील एका दगडाच्या खाणीत एका व्यक्तीचा हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून सीताराम ढाले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जेसीबी चालक होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीताराम ढाले २९ मार्च रोजी घरातून कामासाठी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते मोशीतील दगडाच्या खाणीच्या दिशेने जाताना दिसले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची…
संगमनेर, दि. ७ एप्रिल – विलास गुंजाळ शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नारायणगावकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे उड्डाणपुलाजवळ एका ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत नारायणगाव येथील सचिन पांडुरंग दरेकर या साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला, तर आशा नागनाथ दराडे (वय ५५) आणि अश्विनी शिवाजी बोराडे (वय ४५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघीही नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाविक (एम एच १४ जी यु २६४४) क्रमांकाच्या टेम्पोमधून शिर्डीहून दर्शनानंतर आपल्या गावी परतत होते. डोळासणे उड्डाणपुलाच्या उतारावर, रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी टेम्पो थांबला असताना, नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या (एम एच १५…
मुंबई, दि. ७ एप्रिल – विशेष प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र रिव्हॉल्वरवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात समोर आला होता. यानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर…
संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल संताजी कर्पे (वय ४७ वर्ष) याला संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता पोलीस चौकशीतून या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रविवारी रामनवमीच्या दिवशी पहाटे डॉ. कर्पे याने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आलेल्या डॉ. कर्पे याने अल्पवयीन मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत…
अकोले, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आणि बिगर सिंचनाचे पहिले एकत्रित पाणी आवर्तन आज, सोमवारी (७ एप्रिल) सकाळी ७:३० वाजता निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे आवर्तन तब्बल २५ ते २८ दिवस सुरू राहणार आहे. भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज सकाळी १६०० क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आले असून, यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहणार आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात ६९३४ दशलक्ष घनफूट (दलघफू) तर निळवंडे धरणात ३३३३ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. वाढत्या…
संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल कर्पे याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी आरोपी डॉ. अमोल कर्पे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने पोलीस उप अधीक्षक कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी डॉ. कर्पे याच्या रुग्णालयात जात निदर्शने केली. निवेदनात शिवसेनेने स्पष्टपणे म्हटले आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यातील आरोग्यसेवेच्या चांगल्या परंपरेला डॉ. अमोल कर्पे याच्या कृत्याने काळीमा फासला आहे. एका निष्पाप अल्पवयीन…
संगमनेर, दि. ७ एप्रिल सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि कवी नागराज मंजुळे यांनी व्यंगचित्रांच्या सामर्थ्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले, “व्यंगचित्र हे थेट आणि स्पष्टपणे समाजातील वास्तवाला लोकांसमोर मांडते. आपल्यातील त्रुटी आणि कमतरता स्वीकारायला कोणालाही आवडत नाही, परंतु व्यंगचित्र त्या नेमक्या चुकांवर बोट ठेवते. जेव्हा देशाचं आणि समाजाचं चित्र बिघडलेलं असतं, तेव्हा ते अधिक प्रभावीपणे व्यंगचित्रातून समोर येतं. त्याला कोणत्याही प्रकारचं ‘फिल्टर’ नसल्यामुळे ते अधिक परिणामकारक ठरतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि संपूर्ण समाजाला व्यंगचित्राची नितांत गरज आहे.” मंजुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालनात आयोजित ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
पुणे, दि. ७ एप्रिल – गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य शासनाच्या चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला होता, कारण प्रशासनाने अगोदर १० लाख रुपये भरण्याची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यावर तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता या पाच सदस्यीय चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात रुग्णालयाने ‘नर्सिंग होम अँक्ट’मधील नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. रुग्णाला…
संगमनेर, दि. ६ एप्रिल – प्रतिनिधी शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे यांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्याच्या टेरेसवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहरात राम नवमी उत्सवाची धामधुम सुरू असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉ. कर्पेवर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्याला दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर शहरातील कर्पे याच्या दवाखान्यात संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भागातील अल्पवयीन पीडित…
रविवार, दि. ६ एप्रिल – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (वय ५०) यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांच्या शासकीय बंगल्यावरील एका खोलीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली, तेव्हा ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले की, गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या…
पुणे, दि. ६ एप्रिल – लाचेची रक्कम स्वीकारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) पिंपरी न्यायालयाच्या बाहेर करण्यात आली. रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच घेणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या माहितीनुसार, त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्यांची डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होती. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्यायालयात न पाठवण्यासाठी आणि कोणताही दंड न आकारण्यासाठी पोलीस…
