Author: Annant Ppangarkar
मुंबई, दि. १८ मार्च: प्रतिनिधी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अर्ज छाननी दरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार – * दादाराव केचे (भाजप) * संजय केणेकर (भाजप) * संदीप जोशी (भाजप) * चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट शिवसेना) * संजय खोडके (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) महायुतीच्या या पाच उमेदवारा व्यतिरिक्त आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराने सादर केलेल्या अर्जात आवश्यक…
संगमनेर, दि. १८ – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी (२० मार्च) होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार मंत्री थोरात कारखाना साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव कारखान्याने देत शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन ३०००/- रुपये ॲडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. यावर्षीच्या…
अकोले, दि. १९ मार्च – प्रतिनिधी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील आंबड येथील गवनेर दामू सरोदे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ग्रामस्थांचा अकोलेकरांनी सोमवारी (17 मार्च) कोल्हार घोटी मार्ग बराच काळ रोखून धरला होता. दरम्यान या प्रकरणावरून अकोल्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदे याच्यावर कारवाईसाठी सामाजिक संघटना नेते कार्यकर्ते अंबड ग्रामस्थांचं अकोले सरांनी महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळत निषेध व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलग, मनसे अध्यक्ष दत्ता नवले, रोहिदास जाधव, रामदास भोर आदीसह नागरिक उपस्थित होते. महापुरुषांबद्दल…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने यापूर्वी केलेली मागणी विरळत नाही तोच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी मुख्यमंत्री हे अजित पवार असतील असं सांगायला सुरुवात केल्याने महायुतीतील भाजपमध्ये पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. “येत्या काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील,” असा दावा त्यांनी केला. पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” असं मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं. पुढं ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु,…
अहिल्यानगर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २५ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. सर्वांनी मतभेद विसरून एकत्र जयंती करावी ही आपली पद्धत राहिली. मात्र यावेळेस वेगळे चित्र पहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकांच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात,…
संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखविली. त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता असा सवाल उपस्थित खरंच शिवजयंती निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात, आमदार तांबे यांचे…
संगमनेर, दि. १६ मार्च – प्रतिनिधी छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे. मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारती संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयावर संगमनेरमध्ये मोर्चा काढला होता. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी संगमनेर नगर परिषदेत आले होते त्यावेळी मारहाणीची घटना घडली. मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची तक्रार देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी नोंदवलेली नाही. तसेच मारहाण…
रविवार, दि. १६ मार्च – राज्य सरकार येत्या आठवडाभरात नवे सर्वसमावेशक असे वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूरमध्ये केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची काम सुरू आहे. या घरकुलांच्या कामासाठी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मोफत वाळू उपलब्ध केली जाणार आहे. तसेच राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरच्या दगड बारीक करून वाळू तयार केले जाणार आहे. पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी यामुळे कमी होईल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाही आणि…
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणार्या सनातन्यांचा धीर दररोज चेपला जातो आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी खात्रीच त्यांना पटल्याने काहीही करायचा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेच आहे पण जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं ते महाराष्ट्रात घडू लागलंय याचं वैषम्य वाटू लागलं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिलं जात होतं ते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि त्यातही सार्या गृह विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना सनातनी ज्या पध्दतीने मान वर काढत आहेत, ते पाहिलं की राज्याचं काही खरं नाही, अशी भीती वाटू लागते आहे. देशभर सुरू असलेल्या होळीच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये घडलेल्या अघटीत घटनेने राज्याची मान शरमेने…
विशेष प्रतिनिधी / मुंबई विधीमंडळ सचिवालयाने “महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा” या विधानसभा विधेयकाद्वारे इंग्रज कायद्याप्रमाणे कृती केली जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विधेयकासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या विधेयकासंदर्भात सर्वसामान्य जनता, विधीमंडळाचे माजी सदस्य, संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि संस्था यांना आपले म्हणणे समितीपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करत सत्ताधाऱ्यांकडून इंग्रजांप्रमाणे कायदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी चाळीस वर्षाची विकास कामांची परंपरा आणि प्रगती नव्या आमदारांना तीन महिने ही सांभाळता आली नाही. माजी मंत्री थोरात यांनी आपल्या कारकीर्दीत संगमनेर तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला असल्याने राज्यातील विकसित तालुक्यांमध्ये या तालुक्याचे गणना होते. मात्र अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आमदार अमोल खताळ यांनी आपण पालकमंत्री विखे यांना नव्हे तर संगमनेरकरांना बांधील असल्याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने ज्यांना साधे नियोजन देखील करता येत नाही त्यांनी माजी मंत्री थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. प्रसिद्धी पत्रकात दिवटे यांनी म्हटले आहे…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी ठेकेदारी संस्कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. वर्षानुवर्षे या तालुक्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीवर टिका करण्यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा आणि नव्या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्याचे काम करु नका असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देत खताळ म्हणाले, चाळीस वर्ष ज्यांना कोणताच प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांचे प्रश्न फक्त ठेकेदार आणि माफीयांशी गुंतलेले होते…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहर प्रमुख पदी रवींद्र कानकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुखांच्या आदेशावरून सह संपर्कप्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांनी ही निवड केली आहे. कानकाटे यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, सध्याचे शहर प्रमुख असलेले आप्पा केसेकर यांनी पक्षविरोधी काम केल्याने तसेच तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणतीही जबाबदारी न घेतल्याने त्यांच्या पदाला आपण स्थगिती देत असल्याचे सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी म्हटले आहे. विद्यमान शहर प्रमुख यांच्या पदाला स्थगिती देत कानकाटे यांची प्रभारी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्रात म्हटले…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलावलेल्या शांतता समितीचीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट “कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमची इज्जत येथे घालवू नका” अशा शब्दात सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवळला. संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ मार्च) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती.…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी संगमनेरमध्ये घडला होता. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (१५ मार्च) माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते संगमनेरमध्ये येऊन धडकणार आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे दिसते. छात्र भारतीची राज्य कार्यकारिणी बैठक संगमनेरात… छात्र भारती महाराष्ट्र राज्य कार्यकारणीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून आज थेट संगमनेरातच भास्करराव दुर्वे स्मारक भवन येथे त्यांनी राजस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यात आंदोलनाची पुढील…
संगमनेर – प्रतिनिधी थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपले कुटुंब मानले. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. संगमनेर तालुक्याची विकासकामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे. हे वातावरण चांगले राहावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर आयोजित १५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, इंद्रजीत…
संगमनेर – तालुक्यात खंडणीचे उद्योग सुरू झाले आहेत, काम बंद पाडून लोकांना फोन जात आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने? भूसंपादनासाठी निधी वितरित झालेला असतानाही नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आत्ताच निर्माण होण्याचे कारण काय? अचानक नवीन मार्ग शोधण्याचे कारण काय? वीज पुरवठा सुरळीत होत नाही, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्याचे उत्तर काय? संगमनेर शेजारील गावे तोडून आश्वी बुद्रुकला अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा हेतू काय? याची उत्तरे लोकांना हवी होती, दुर्दैवाने ती मिळाली नाही, त्यामुळे आजची आढावा बैठक ही निव्वळ राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी होती का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.…
अहिल्यानगर, दि. १४ मार्च – प्रतिनिधी शनिवारी रात्री संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातून झालेल्या देवीच्या दागिने चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आहिल्या नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या पथकाने लोणी कोल्हापूर मार्गावर गुरुवारी सहा जणांचे टोळी पकडली असून संगमनेर सह आणखी काही गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण,…
संगमनेर, दि. १३ मार्च मंत्री पदाची संविधानिक शपथ घेतल्यानंतर देखील दोन धर्मीयात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री व आमदार बाहेर पडत असताना छात्र भारतीचे कार्यकर्ते मंत्रिमंडळातून नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी…
