Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  शहरातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  सहकार खात्याचे अधिकारी आर. एस. वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. यावेळी मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, मावळते व्हाईस चेअरमन संतोष चांडक यांच्यासह संचालक मंडळातील अनिल अट्टल, योगेश जाजू, श्रीकांत मणियार, ज्योती कासट, विशाल नावंदर, अनिल कलंत्री, निलेश बाहेती, योगेश रहातेकर, मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी आणि व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची आर्थिक संस्था म्हणून ओळख…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी:  राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून, सुमारे १७ लाख कर्मचारी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्याची अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आणि शासनासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर  वडगाव पान (संगमनेर) येथील दत्तधाम सरकार आश्रमाचा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार तात्काळ बरे करण्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी गडगेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याला अटक केली होती. सुरुवातीची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी २७ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत केली आहे. राजेंद्र गडगे याच्यावर आता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी संगमनेरमध्ये वास्तव्यास असताना तिची मकरंद गोडगे याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, सप्टेंबर २०२५ मध्ये मकरंदने तिला भेटण्यासाठी आपल्या खोलीवर बोलावले. तिथे गेल्यानंतर त्याने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’मार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत संगमनेरचे चित्रकार आनंद गायकवाड यांनी यश संपादन केले आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर त्यांनी रेखाटलेल्या चित्राची देशभरातील ७५ उत्कृष्ट कलाकृतींमध्ये निवड करण्यात आली आहे. प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे ललित कला अकादमीच्या सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात आनंद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, सांस्कृतिक कार्य विभागाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: लोकसभेत मांडण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या धोरणांविरोधात संगमनेर शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला. बसस्थानक परिसरात एकत्र येत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांनी हातात बांगड्या घेऊन आणि निषेधाचे फलक झळकावून परिसर दणाणून सोडला होता. नारीशक्ती वंदन अधिनियम हा केवळ कायदा नसून ती ‘मोदींची गॅरंटी’ आहे, ज्याद्वारे महिलांना सन्मान आणि समान संधीची खात्री मिळणार आहे. या विधेयकामुळे ग्रामीण भागातून नवीन आणि कर्तृत्ववान महिला नेतृत्व पुढे येण्यास मदत होणार असताना, काँग्रेसने मात्र महिला शक्तीला नाकारून केवळ घराणेशाहीला महत्त्व दिले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ आश्रमाचा सर्वेसर्वा भोंदू बाबा गडगेबाबा याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. पोलीस कारवाईत आश्रम सील झाल्यानंतर आता महावितरणनेही या भोंदू बाबाला दणका दिला असून, वीज चोरी प्रकरणी सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.  अधिकृत मीटरला बायपास करून ही वीज चोरी केली जात असल्याचे तपासात उघड झाले असून, आठवडाभरात दंडाची रक्कम न भरल्यास बाबावर वीज चोरीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. गेल्या तीन दशकांपासून अडल्या-नडल्या लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या या बाबाच्या काळ्या कर्तृत्वाच्या कथा आता एकामागून एक समोर येऊ लागल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पंचायत समिती मारहाण प्रकरणी अभिषेक थोरात आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी या प्रकरणातील सर्व चारही अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस पक्षाचे नेते शरद नाना थोरात व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, अर्जदारांच्या वतीने ॲड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, सातारा:  सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी शिवसेनेत सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमांकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपशी युती करून आपली पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी निवडून आणल्यानंतर, आमदार शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभा आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिले. या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधला. आपल्याला या कार्यक्रमाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये…

Read More