Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यात कुरण येथे अवैधपणे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील कत्तलखाने बंद असल्याचा दावा फोल ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संगमनेर तालुक्यातील कुरण येथील नादिर शेख याच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश प्राण्यांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक छापा टाकला. त्यावेळी, पोलिसांनी घटनास्थळी ३ ते ४ इसम गोवंश प्राण्यांची कत्तल करताना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आहे त्यामुळे, गोंधळलेल्या अवस्थेत न राहता रोखठोक भूमिका घ्यावी ऐनवेळी भूमिका बदलू नये, पराभवानंतरही अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचं सांगत जनतेच्या प्रश्नांवर कठोर आणि ठाम भूमिका घेऊन पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.   विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचा सल्ला देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या व जवळपास ११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवरील बदलीचे संकट टळले असले तरी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.  संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डीच्या साई मंदिरात मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागली आहे. साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे आता नवे पोलीस निरीक्षक असतील.  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस दलात फेरबदल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.जे. राय यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांना १०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे नागपूरमधील एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आले होते. त्यावेळी, हर्षवर्धन जाधव यांनी बैठकीच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु विशेष सुरक्षा विभागाचे निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना अडवले.  यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पराग जाधव यांच्यावर हात उचलला. या घटनेनंतर, सोनेगाव पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ४० लाखांहून अधिक मतदारांच्या याद्यांमध्ये संशयास्पद बाबी असल्याचं सांगत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रातील ४० लाख मतदारांचा घोटाळा? राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ४० लाख मतदार वाढले, जे गेल्या पाच वर्षांतही वाढले नव्हते. निवडणुकीच्या काळात, विशेषतः संध्याकाळनंतर मतदानाच्या टक्क्यांमध्ये झालेली अचानक वाढही संशयास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  शहरातील परदेशपुरा परिसरात एका १७ वर्षीय मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे (वय ५३) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुहास वाघमारे हे मूळचे सांगलीचे असून, कामामुळे ते संगमनेरमध्ये राहत होते. घटनेच्या रात्री ते परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोरून जात असताना एका १७…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, दि. ७ – शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील एका सेवाभावी संस्थेची बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाच्या युट्यूब चॅनेलच्या चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साळवे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्त धाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थे’चे कामकाज पाहणारे शिवम राजेंद्र गडगे (वय २१) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव साळवे (पूर्ण नाव माहित नाही रा. अकोले) असे असून, तो ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. गडगे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून साळवे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, महिला बचत गट कर्ज आणि खेळते भांडवलाचे अनुदान वाटप डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार खताळ यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: दुष्काळग्रस्त भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन जाहीर केले आहे. मागील १८ वर्षांत केवळ ५ कोटी रुपये खर्च झाल्याचा उल्लेख करत, त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत या कामांना गती देण्याची ग्वाही दिली. भोजापूर चारीच्या जलपूजन सोहळ्यात नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह…

Read More