Author: Annant Ppangarkar
शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार…
शनिवार, ३० नोव्हेंबर हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९५ वर्षीय योद्धा अर्थात डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. शरद पवारांनी घेतली भेट – दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आज उपोषण थांबविणार – डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,…
विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने एकच चर्चा होत आहे. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला मात्र गृहमंत्री पदावर दावा – विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे…
विशेष प्रतिनिधी | मुंबई अनेक अडथळे पार करत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू पाहणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नवाच अडथळा निर्माण झाला आहे. फडणवीस यांच्या विरोधात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शडडू ठोकला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपलं आंदोलन पुन्हा सुरु होईल, अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यावरून आक्षेप नोंदवला असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा व्हायला उशीर होत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम – राज्यात महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली असली तरी मुख्यमंत्रिपदावरून अजूनही पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा…
शुक्रवार २९ नोव्हेंबर – संगमनेर विधानसभा निवडणूक होताच संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची मिमांसा करत नव्या जोमाने कामाला लागतानाच निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला आहे. चिंतन बैठक – विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. थोरात यांची पारंपारिक विरोधक असलेली ठाकरेंची शिवसेना यावेळी थोरात यांच्या सोबत असतानादेखील थोरात यांचा पराभव आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेशाशी गद्दारी करत मतदार संघात विरोधी काम केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसैनिकांची चिंतन बैठक पार…
शुक्रवार, २९ नोव्हेंबर – संगमनेर देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २००२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्यावतीने स्पेशल…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाची नौतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठीनी फेटाळून लावला आहे. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र याला भाजपची बदमाशी कारण असल्याचं सांगत पटोलेंचा राजीनामा फेटाळण्यात आला. पटोले दिल्लीला – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेची गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. राजीनामा – त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे. व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने…
गुरुवार २८ नोव्हेंबर – अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र आदेश लागू – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २९ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हे आदेश लागू करण्यात आले आहे. यांना वगळले – जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्नाच्या मिरवणुका, प्रेतयात्रेच्या जमावास, याशिवाय पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह परवानगी घेतलेल्या मिरवणुकांना हे आदेश लागू राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास कारवाई – उर्वरित सर्व ठिकाणी हे आदेश लागू असून या…
महाराष्ट्र संवाद – गुरुवार, २८ नोव्हेंबर नाशिक – लासलगावच्या दत्तनगरमधील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिष दगडु ढगे (वय २४ रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बा. द. पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती बंगले यांनी काम बघितले. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करत फिर्यादीच्या १७ वर्षीय वयाच्या मुलीस ‘तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत का फिरते, अशी विचारणा करत यावरून वाद घालत कुरापत…
बुधवार, २७ नोव्हेंबर – संगमनेर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आलेल्या संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयी सभेत अज्ञात चोरट्याने अहिल्यानगरमधील व्यावसायिकाची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसात तक्रार दाखल – दरम्यान या संदर्भात हिंगणगाव जि. अहिल्यानगर येथील दीपक रामभाऊ सोनवणे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालपाणी लॉन्सवर घटना – संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांचा वाढदिवस होता. संगमनेरमधून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची विजयी सभा आणि विखे…
बुधवार २७ नोव्हेंबर – मुंबई मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता त्यात पुन्हा एका नव्या वादाची भर पडली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. पालकमंत्रीपदावरून ठिणगी – राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील चार दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू असतानाच आता पालकमंत्री पदावरून देखील वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली जात आहे. मंत्री ठरण्याआधीच पालकमंत्री – महायुती…
बुधवार २७ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पडझड झाल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहे. पटोले राजीनामा देणार देशमुख नवे प्रदेशाध्यक्ष – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत अगदी काठावर निवडून आलेले नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून त्यांच्या जागी अमित देशमुख यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटोले यांचा राजीनामा स्वीकारला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. देशमुख लातूरहून विमानाने दिल्लीला – अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस हाय कमांडच्या आदेशाने…
बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई निवडणूक आयोगाने आचारसंहिता समाप्तीची घोषणा करतात सरकारने पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची सोमवारी संध्याकाळी नियुक्ती केली. शुक्ला यांनीआपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुक्ला आता पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालक (डीजीपी) असतील. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांना पदावरून हटवत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांनी राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर झाल्यानंतर गृह विभागाने लगेचच शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपवत त्यांना पुन्हा काम करण्यास सांगितले.…
बुधवार, २७ नोव्हेंबर – मुंबई मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरूच असून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने ही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री पदावरील तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. निरीक्षक आज मुंबईत – दरम्यान भाजपाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपचे निरीक्षक आज मुंबईत येत असून मुख्यमंत्री पदा संदर्भातील रिपोर्ट ते दिल्लीला देणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहण्याची चिन्ह आहेत. अमित शहा मुंबईत – दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्माण…
प्रवीण पुरो | मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा वाढू लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यांच्याकडे सोपविला राजीनामा – राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. यावेळी या दोघांमधील दरी स्पष्ट दिसत होती. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादा भुसे उपस्थित होते. पण शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुराव्याचं दर्शन झालं. शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री – विधानसभेचा कार्यकाळ आज संपल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत…
मंगळवार २६ नोव्हेंबर – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र पशु गणनेचे काम २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेत पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची खरी माहिती देण्याचे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. यांची होणार गणना – या पशुगणनेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला मारलेल्या (टॅगिंग केलेल्या) जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची देखील गणना करण्यात येणार आहे. पशु गणनेसाठी यांची केली नियुक्ती – जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे. पशु गणना कशासाठी – पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट…
मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई तुतारी आणि ट्रॅम्पेटच्या साधर्म्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दोन्ही चिन्हातील गोंधळामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार पराभूत झाले असून या चिन्हाचा फायदा विरोधी उमेदवारांना झाला आहे. ९ जागांवर फटका – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ८६ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ १० जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर ९ जागांवरील उमेदवार ‘ट्रम्पेट’मुळे पराभूत झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’चे भाषांतर पिपाणी करण्यात आले होते. त्याचा दोन…
मंगळवार २६ नोव्हेंबर – संगमनेर छपराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण संसारात जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील जांबुत बुद्रुक या गावात घडली आहे. आगीमध्ये झोळीत असलेले छोटे बाळ तात्काळ बाहेर काढल्याने बचावले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार – मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जांबुत बुद्रुकच्या वैतागवाडीमधील देवराम आप्पाजी मेंगाळ मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली त्यावेळी घरामध्ये केवळ एक महिला आणि छोटे बाळ होते. बाळ बचावले मात्र आगीत संसार जळून खाक – आग लागल्याचे दिसताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत…
मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडलं ते शिवसेनेच्या बाबतीत घडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेत आपल्या सर्व विजयी झालेल्या आमदारांना मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले होते. या नवनिर्वाचित आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या मतदारसंघात परतू शकणार आहेत. आमदारांबाबत खबरदारी – विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दष्टीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. ताज लँड या…
