Author: अनंत पांगारकर

संगमनेर –  विश्वासाचा फायदा घेऊन जनावरे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता एका व्यापाऱ्याची ३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जुनेद अहमद कुरेशी, यासीन अहमद कुरेशी आणि अहमद अब्बास कुरेशी (सर्व रा. कळंब, ता. मुरबाड, जि. कल्याण) या तिघांविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जब्बार हसन शेख (वय ५०, रा. अलकानगर, संगमनेर) हे ग्रामीण भागातून शेळ्या-मेंढ्या खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचा व्यापारी जुनेद अहमद कुरेशी याने १ ऑगस्ट २०२४ रोजी शेख यांच्या शेडवर येऊन २ लाख रुपयांची जनावरे खरेदी केली. जुन्या…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. बस स्थानकावरील पाकीटमारी असो किंवा रस्त्यावरील चैन स्नॅचिंग, गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गणेश नगर भागात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे गंठण ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. राजापूर (संगमनेर) येथील रहिवासी नंदा हासे या गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले. त्यांनी संधी साधून नंदा हासे यांच्या गळ्यातील ३…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  तुम्ही मला कधीही फोन किंवा मेसेज करा, मी स्वतः त्याला उत्तर देईन. माझ्या आणि तुमच्या संवादामध्ये कोणताही पीए (खाजगी सचिव) येणार नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संगमनेरमधील भाजप कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. हल्ली कार्यकर्ते सभापतींचा फोनही उचलत नाहीत, असा मिश्किल टोला लगावत त्यांनी जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला. सोमवारी पुण्याहून कोपरगावला एका सोहळ्यासाठी जात असताना प्रा. शिंदे यांनी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात थांबून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील शंका दूर करत त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. सभापती असलो तरी आधी कार्यकर्ताच- निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षाने कामाची…

Read More

पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील एक मोठे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सुरेश कलमाडी यांनी पुण्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी पुण्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी मोठे निर्णय घेतले. पुण्याचा कायापालट करणाऱ्या अनेक उड्डाणपुलांच्या कामात आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकारणासोबतच क्रीडा…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. व्यवसायात प्रगतीचे योग असून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मानसिक शांततेसाठी तुम्ही अध्यात्माकडे वळाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्रांची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा. नोकरीत वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. अचानक धनलाभाचे योग आहेत, पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कर्क:…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पुण्याहून कोपरगावकडे जात असताना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सोमवारी संगमनेर येथे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः आमदार सत्यजीत तांबे यांच्या राजकीय प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या एका बड्या नेत्याने तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन केलेली ही अनौपचारिक चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रा. राम शिंदे संगमनेर येथे पोहोचले. त्यांनी सुरुवातीला शासकीय विश्रामगृहावर विश्रांती घेऊन भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर महायुतीचे (शिवसेना) आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांनी थेट इंदिरानगर येथील डॉ. सुधीर तांबे यांचे निवासस्थान…

Read More

अकोले- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलून तो पुणतांबामार्गे नेण्याच्या निर्णयाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध केला असून, मूळ आराखड्यानुसार देवठाण-बोटा स्टेशनसह रेल्वे सुरू करण्यासाठी ६७ गावांत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. अकोले येथील कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाने स्पष्ट केले की, रेल्वे मार्ग बदलल्यामुळे या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. रेल्वे झाल्यास युवकांना पुण्या-नाशिकसारख्या महागड्या शहरात राहण्याऐवजी गावातूनच नोकरी-व्यवसाय करणे सुलभ होणार असून उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे. या जनआंदोलनाला बळ देण्यासाठी किसान सभा, कामगार संघटना आणि विद्यार्थी-युवक संघटनांनी गावोगाव संपर्क सुरू केला आहे. दरम्यान, ९ जानेवारी रोजी देवठाण येथे होणारा इशारा मेळावा आणि बोटा…

Read More

संगमनेर: प्रतिनिधी संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करण्याऐवजी संगमनेर शहरात सध्या नायलॉन मांजामुळे घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातलेली असतानाही संगमनेरच्या बाजारपेठेत या मृत्यूच्या पाशाची सर्रास विक्री होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात या मांजाने अक्षरशः कहर केला असून, सलग झालेल्या चार भीषण अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे संगमनेरकरांच्या गळ्यावर आता नायलॉन मांजाचा सुरा फिरू लागला असून या अपघातांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शहरात नायलॉन मांजाचा विळखा इतका भयानक झाला आहे की, रस्त्यावरून प्रवास करणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. नाईकवाडपुरा येथील २३ वर्षीय तरुण हुजेब…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज आमच्या काही चुका झाल्या, हे मी जाहीरपणे कबूल करतो. आणि आमच्या याच चुकांमुळे आज तालुक्यातील सत्ता कोल्ह्या-कुत्र्यांच्या’ हातात गेली आहे. पण लक्षात ठेवा, हा शरद नाना एकटा नाही, तर माझ्यासोबत असंख्य वाघ उभे आहेत. जर आमच्या नादी लागाल, तर तालुक्यात फिरणं मुश्किल होईल, अशा शब्दांत शरद नाना थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार समारंभवेळी झालेल्या जाहीर सभेत जिल्हा परिषदेच्या जोर्वे गटाची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे शरद नाना थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याने नेहमीच प्रेमाची आणि विश्वासाची साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जो उत्साह दिसला, तो केवळ विजय नसून विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’ आहे. हाच करंट आता चुकीचं बोलणाऱ्यांना आणि सत्तेच्या जोरावर खोट्या केसेस करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. पिंपरणे (संगमनेर) येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नूतन लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआयचे नेते सुधाकरराव रोहम होते. या मेळाव्याला व्यासपीठावर संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख,…

Read More