Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाने शिर्डी-पिंपळवाडी मार्गावरील रुई शिवारातील ‘हॉटेल न्यू सनराज’ येथे मोठी धडक कारवाई केली आहे. या धाडीत मध्यप्रदेश बनावटीचा तसेच महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला देशी-विदेशी दारू व बिअरचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून, एकूण ६ लाख १९ हजार ७२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बेकायदेशीर प्रकरणी तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने रुई शिवारातील हॉटेल न्यू सनराज येथे ही कारवाई केली. यावेळी विवेक उर्फ जयनारायण मिसर (रा. गणेशवाडी, शिर्डी) याच्या ताब्यातून विविध नामवंत ब्रँडची देशी-विदेशी दारू, बिअर, मारुती सुझुकी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर – राज्यभरात दुष्काळाचे सावट गडद झाले असून शेतकरी आणि नागरिक पाण्याचा एक-एक थेंब जपून वापरण्यासाठी धडपडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे निळवंडे धरणातून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मागील तब्बल ४० दिवसांपासून निळवंडे धरणाचे आवर्तन अविरत सुरू असून, आतापर्यंत साडेचार टीएमसी म्हणजे तब्बल ४ हजार ४१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे. ऐन दुष्काळाच्या तोंडावर सुरू असलेल्या या बेजबाबदार कारभाराविरोधात अकोले आणि संगमनेर तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संतापाचा लाव्हा उसळला आहे. पाण्याच्या या भयंकर नासाडीमुळे येत्या कडक उन्हाळ्यात संपूर्ण परिसराला भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. असे असतानाही…
आजचे राशीभविष्य- मेष – आज आरोग्याच्या काही तक्रारी जाणवण्याची शक्यता असून तुमचे मनोबल थोडे कमी राहू शकते. खर्च जास्त झाल्यामुळे मनात काहीशी चिंता राहील, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती सर्वसाधारण राहील, मात्र व्यवसायातील भागीदारीमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता असल्याने शांत राहणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील किंवा जोडीदाराची चांगली मदत मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. वृषभ – आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील आणि जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला धनलाभ संभवतो. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या प्रतिष्ठेत आणि सन्मानात वाढ होईल. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरण गाजत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 500 कोटींच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोडलं आहे. एका माणसाला आधी स्वार्थासाठी जवळ केलं आणि मग बदनाम करण्यासाठी नियोजनावर प्रश्न उपस्थित करत पत्रकारांवरही या प्रकरणात दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भाजपाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भाजपाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या…
आजचे राशीभविष्य- मेष – आज तुमचे मन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात अधिक गुंतलेले राहील. समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक वेळेचा आनंद घ्याल आणि कुटुंबासमवेत मजेत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. मित्र आणि ओळखीच्या लोकांना भेटल्याने दिवस अधिक आनंददायी होईल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र परिणामांचा असेल. महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी संयम आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असेल. घाईघाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. प्रवासाचा योग बनत आहे, जो आनंददायक आणि फायदेशीर ठरेल. तुम्हाला मेहनतीचे योग्य परिणाम मिळतील, परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक असेल. मिथुन – आज घाईत महत्त्वाचे निर्णय घेणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील वस्तीजवळ सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे पसरणाऱ्या दुर्गंधी आणि माश्यांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित पोल्ट्री फार्मवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुक्काम ठोकून आंदोलन करण्याचा थेट इशारा स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत दिनकर दशरथ शेळके आणि शिवाजी खंडू लहामगे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी तहसीलदार राहता यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, आडगाव बुद्रुक येथील रहिवासी भागामध्ये सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याचबरोबर माश्यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार समोर आला असून, आता या प्रकरणी महसूल विभाग आणि नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीएसएनएल (BSNL) कार्यालयाशेजारी आणि पोलीस कॉलनीसमोर असलेल्या भूमापन क्रमांक ८६/४१ मधील प्लॉटवर पसरलेले अतिक्रमण हटवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासह नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमण संदर्भात शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात नमूद केल्यानुसार, सदर ८६/४१ हा प्लॉट जिल्हाधिकारी यांच्या नावे असून तो तहसीलदार, तलाठी आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील जागृत आणि सर्व समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या श्री आवजीनाथ बाबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. लोहारे येथे आवजीनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त दर्शन घेतल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी आमदार खताळ यांच्या हस्ते २० लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. खताळ म्हणाले, लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र असून सध्या या देवस्थानाचा समावेश ‘क’ वर्गात आहे. त्याला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होण्यास…
आजचे राशिभविष्य – मेष – आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कोणत्याही प्रकारच्या घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. कोणाचेही ऐकून घेण्यापूर्वी लगेचच कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नका. मात्र तुमची बौद्धिक क्षमता चांगली राहील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ – घर, कुटुंब तसेच कामाच्या ठिकाणी आज तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. सहकाऱ्यांसोबत जर काही मतभेद असतील तर ते दूर करण्यासाठी आपापसात संवाद साधणे अत्यंत गरजेचे ठरेल. आर्थिक नियोजन करताना आपल्या गरजा आणि वैयक्तिक खर्च यामध्ये योग्य संतुलन राखावे. मिथुन – बऱ्याच दिवसांपासून थांबलेली कोणतीही चर्चा आज पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्यावरील कामाचा भार वाढल्यामुळे तुम्हाला थोडा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यामध्ये दुष्काळाचे अत्यंत भीषण सावट पसरले असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. शेजारील कर्नाटक राज्याने दुष्काळाची तीव्रता ओळखून ज्याप्रमाणे तातडीने चारा छावण्या सुरू केल्या आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही विलंब न करता राज्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्य सरकारने केवळ घोषणा न करता शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीनसारखी पिके शेतातून काढण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “चांगल्याचा स्वीकार करणे आणि वाईटाचा पूर्णपणे त्याग करणे, हाच रावण दहनाचा खरा संदेश आहे,” असे उद्गार मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि वृक्षमित्र मनीष मालपाणी यांनी काढले. विजयादशमीनिमित्त संगमनेर येथील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. यंदाच्या या उत्सवाने आजवरच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढले असून, संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करून मालपाणी उद्योग समूहाच्या प्रांगणातील शमी वृक्षाचे पूजन करण्याची गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. या निमित्ताने संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई आणि पौराणिक व ऐतिहासिक देखाव्यांची सजावट उपस्थितांना प्रत्यक्ष इंद्रलोकाची सफर घडवून आणत होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातून अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक आणि नामांकित विधिज्ञ अमित धुळगंड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. नाशिक जिल्ह्यातील मनमाडनजीक असलेल्या ऐतिहासिक अंकाई गडावर दर्शनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. या आकस्मिक घटनेमुळे मांडवे बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ॲड. अमित धुळगंड हे धार्मिक वृत्तीचे असल्याने बुधवारी भल्या पहाटे अंकाई गडावर दर्शनासाठी गेले होते. अत्यंत उत्साहात गड चढून वर गेल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्या मर्जीनुसार आणि आनंदात जाईल. सरकारी किंवा खाजगी स्वरूपाच्या बाबी सहजतेने सुटतील. कुटुंबात सुख आणि शांती राहील. मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा भविष्याविषयी मनात थोडी चिंता राहील. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमचे बजेट काही प्रमाणात बिघडू शकते. सामाजिक कार्यात सहभागी होत असताना नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब राहा. वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ आणि अनुकूल राहू शकतो. कुटुंबातील परस्पर संमतीने एखादी जुनी समस्या सुटू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता असून आर्थिक परिस्थिती अधिक सुधारेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे किंवा मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, जास्त धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. मिथुन – आजचा दिवस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वर्षभर प्रत्येक जण कष्ट आणि धावपळ करत असतो. दसरा आणि दिवाळी हे आनंदाचे सण असून या काळात दैनंदिन अडचणी विसरून सर्वांनी आनंदाचे क्षण अनुभवावेत ही आपली परंपरा आहे. यंदा दुष्काळाचे सावट असताना तालुक्यासह राज्यातील सर्व जनतेचे दुःख दूर होऊन त्यांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी केली. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संगमनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिस्तबद्ध आणि भव्य पथसंचलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या संचलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते महायुतीचे संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ पाटील. त्यांनी सर्व पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून एका सामान्य स्वयंसेवकाच्या भूमिकेत या पथसंचलनात पूर्ण वेळ पायी चालत सहभाग नोंदवला. सकाळच्या सुमारास अकोले नाका येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात शेकडो स्वयंसेवक एकत्र जमले होते. यानंतर अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पथसंचलनाला प्रारंभ झाला. या संचलनात आमदार अमोल खताळ यांच्यासोबत संघाचे संघचालक सुभाष कोथमीरे, सोपानराव देशमुख आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. अकोले नाक्यावरून निघालेली…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तसेच नोकरीच्या क्षेत्रात देखील यश मिळेल. संभाषणात संयम ठेवा, कारण रागामुळे वाद वाढू शकतो. व्यवसायात छोट्या गोष्टी गांभीर्याने घ्या. वैवाहिक जीवन सुखद असेल. आज ॲलर्जी आणि त्वचेच्या समस्यांपासून सावध राहा. उपाय म्हणून शिवलिंगावर जलार्पण करा. वृषभ – आज आत्मपरीक्षण आणि नवीन कल्पनांचा विचार करण्याचा दिवस आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचा आदरही वाढेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्यांशी वाद टाळा. भागीदारीच्या व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. उपाय म्हणून पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. मिथुन – एखाद्या अनुभवी किंवा आध्यात्मिक व्यक्तीला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्याच्या सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अत्यंत अतिसंवेदनशील आणि चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी महायुतीचा गड उद्ध्वस्त करत मोठा विजय मिळवला आहे. राजकीय प्रतिष्ठा आणि सत्तेचा प्रचंड जोर पणाला लागलेल्या या महासंग्रामात विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत गोकुळवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर राज्यातील सत्तेची नशा दाखवणाऱ्या महायुती प्रणित राजर्षी शाहू विकास आघाडीला अवघ्या ९ जागांवरच समाधान मानावे लागले असून, या निकालामुळे महायुतीचे कोल्हापुरात पानिपत झाले आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील या सर्वात मोठ्या निवडणुकीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्त्री शक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि मुलींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी श्रीरामपूर पोलीस विभागाने एक अनोखा व कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. गेल्या दोन वर्षांत छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तक्रार नोंदवणाऱ्या तब्बल एक हजार महिलांशी पोलिसांनी थेट फोनवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली आहे. या थेट संवादामुळे ९३ टक्क्यांहून अधिक महिला तक्रारदारांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. तर महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. श्रीरामपूर पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजुर, घारगाव, आश्वी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, लोणी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने शनिवारी (दि. १७) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चणेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतरोही तरुणाचा पत्ता लागलेला नसून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चणेगाव बंधाऱ्यावरून प्रवास करणाऱ्या काही ग्रामस्थांना एका व्यक्तीने पाण्यात उडी मारल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे एक दुचाकी आणि जवळच एक मोबाईल फोन पडून असल्याचे निदर्शनास आले. त्या गाडी आणि मोबाईलच्या आधारे सदर व्यक्ती सतीश आप्पासाहेब वाणी असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वाणी कुटुंबियांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मयुरी सुनील मखरे असे या दुर्दैवी आत्मघात केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा शहर परिसर तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी मखरे ही श्रीगोंदा शहरातील कन्या विद्यालय परिसरात एका अभ्यासिकेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि पोलीस भरतीची सातत्याने तयारी करत होती. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी राहत्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली. हा संपूर्ण प्रकार खोलीमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवून उपचारासाठी डॉ.…
